धक्कादायक! परळीच्या बड्या नेत्याच्या मुलाने दारु पिऊन गाडी चालवत तरुणाला चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यु

September 01, 2021 , 0 Comments

श्रीमंत घरातील मुलं अनेकदा दारु पिऊन रस्त्यावर धिंगणा घालताना आपण चित्रपटांमध्ये बघितले आहे. आता अशीच एक घटना बीडच्या परळी तालुक्यात घडली आहे. एका श्रीमंत घरातील मुलाने दारु पिऊन रस्त्यावर अलिशान गाडी चालवली आणि एका तरुणाला चिरडले आहे. या घटनेत त्या तरुणाचा जागीच मृत्यु झाला आहे.

बीडच्या परळीमध्ये राहणारा हा मुलगा एका श्रीमंत घरातील बड्या नेत्याचा मुलगा आहे. त्याने दारु पिऊन रस्त्यावर गाडी चालवली. यावेळी त्याने एका दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली आहे. धडकेत तरुणाचा जागीच मृत्यु झाला आहे. त्यामुळे मृतक तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनी बड्या नेत्याच्या मुलावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या दुर्घटनेमध्ये प्रमोद तांदळे नावाच्या तरुणाचा मृत्यु झाला आहे. प्रमोदला धडक देणार तरुण हा परळी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षाचा मुलगा आहे. परळी शहरापासून दूर असलेल्या काही अंतरावर तळेगाव परिसरात तो दुचाकी चालवत होता.

त्यावेळी भरधाव वेगात येणाऱ्या एका अलिशान गाडीने त्याला धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता, की तो दूरवर फेकला गेला. त्यानंतर जमिनीवर कोसळताच त्याचा मृत्यु झाला आहे.

या घटनेची माहिती प्रमोदच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर कुटुंबातल्या काही सदस्यांनी परळी ग्रामीण पोलिस स्टेशन गाठले. तिथे त्यांनी ठिय्या आंदोलनही केले आहे. तसेच संबंधित गाडी चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

बड्या नेत्याने आपल्या मुलाला वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून एक अलिशान कार दिली आहे. पण लाखो रुपयांची त्याने दारु पिऊन चालवत एका तरुणाचा जीव घेतला आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता बड्या नेत्याच्या मुलावर पोलिस कारवाई करणार का? असा प्रश्न मृतकाच्या कुटुंबियांनी उपस्थित केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

इंडियन आयडल ११ चा विजेता सनी हिंदूस्तानीची लव्हस्टोरी आहे खुपच फिल्मी; वाचा त्यांची इंटरेस्टींग लव्हस्टोरी
बिग बॉस OTT मध्ये सनी लिओनीची एंट्री, सनी लिओनीने दिलेला टास्क पाहून नेटकरी संतापले..
चिमुकलीच्या जन्माच्या दिवशीच आई वारली; भावनिक आदरांजलीसाठी मुलीसोबत रिक्रिएट केले ‘ते’ खास क्षण


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: