१९ वर्षाच्या मुलीने केले १७ वर्षाच्या मुलाशी लग्न; मुलाच्या आईने मुलीवर लैंगिक शोषणाचा गुन्हा केला दाखल
तामिळनाडूच्या कोयंबटूरमधून एक हैराण करणारे प्रकारण समोर आले आहे. एका १९ वर्षाची तरुणी एका १७ वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पडली होती, त्यानंतर दोघांनी लग्नही केले होते. पण त्यानंतर जे झाले त्यानंतर सर्वांना धक्का बसला आहे.
लग्नानंतर त्या मुलीवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर तिला विशेष न्यायालयात हजर केले होते. आता तिला कोयंबटूर केंद्रीय तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
मुलगी १० वीमध्ये फेल झाली होती, त्यामुळे तिने शिक्षण सोडले होते. त्यानंतर ती पोलाचीमधल्या एका पेट्रोल पंपावर कामाला लागली. तिथेच १२ पास झालेला एक मुलगा काम करत होता. रोजच्या भेटीमुळे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ती मुलासोबत डिंडीगुल येथे चालल्या गेली.
डिंडीगुलमध्येच त्या दोघांनी लग्न केले. लग्नानंतर ते पुन्हा कोयंबटूरला परतले आणि भाड्याच्या घरात राहू लागले. त्यानंतर मुलाच्या आईने मुलीवर लैंगिक शोषणाचे आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर मुलीने आत्मसमर्पण केले आहे.
पोलिसांनी या तरुणीला अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. मुलाच्या आईने मुलीवर अल्पवयीन मुलासोबत लग्न केले आणि त्याचे लैंगिक शोषण केले असे आरोप केले आहे.
त्यामुळे तरुणीला पॉस्को कायद्या अंतर्गत पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून पॉस्को कलम ५ अंतर्गत गंभीर लैंगिक शोषण आणि कलम ६ अंतर्गत तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! परळीच्या बड्या नेत्याच्या मुलाने दारु पिऊन गाडी चालवत तरुणाला चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यु
इंडियन आयडल ११ चा विजेता सनी हिंदूस्तानीची लव्हस्टोरी आहे खुपच फिल्मी; वाचा त्यांची इंटरेस्टींग लव्हस्टोरी
मी जेव्हा गाडीत बसले, तेव्हा कळलं की माझे बोटं तुटली आहे; सहाय्यक आयुक्तांनी सांगितला ‘तो’ भयानक प्रसंग
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: