पंकजाताई २०२४ च्या निवडणुकीत मी तुमच्यासोबत काम करणार, धनंजय मुंडेंच्या पत्नीचे मोठे वक्तव्य
बीड । राज्याचे न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. यामुळे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता करुणा मुंडे यांनी फेसबूक लाईव्ह करत परळीत जावून पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगितले, यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
त्या म्हणाल्या की, धनंजय मुंडेंवरील सर्व आरोप सिद्ध करणार आहे. धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविरोधात षडयंत्र रचले असल्याचा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला. यामुळे आता त्या अजून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच पंकजा मुंडे यांना २०२४ च्या निवडणुकीत साथ देणार आहे. तुमच्या पाठिशी उभं राहणार आहे. माझ्या पतीने मला अनेक नेत्यांबद्दल सांगितले आहे. पण मला त्यांच्यात पडायचे नाही. पंकजा मुंडे या माझ्या नणंद लागतात. घरातल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणामुळे २०२४ ची निवडणूक धनंजय मुंडे यांना अवघड जाण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांच्या विरोधात काय षड्यंत्र आखले जात आहे? हे देखील मी माध्यमांसमोर मांडणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पत्नीबाबत अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे.
त्या म्हणाल्या, माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं पाळू नकोस. मी तिचं ऐकलं नाही म्हणून भोगत आहे, असंही यावेळी करुणा मुंडे म्हणाल्या. यामुळे येणाऱ्या काळात त्या काय गौप्यस्फोट करणार याकडे राजकीय वर्तुळातून चर्चा सुरू झाली आहे.
ताज्या बातम्या
आता शिवसेनेकडून लावा रे तो व्हिडिओ! शिवसेनेने लावला किरीट सोमय्यांचा ‘तो’ व्हिडिओ
जिद्दीला सलाम! हॉटेलमध्ये वेटर म्हणून करत होते काम, जिद्दीच्या जोरावर कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण
जिद्दीला सलाम! हॉटेलमध्ये वेटर म्हणून करत होते काम, जिद्दीच्या जोरावर कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: