आता शिवसेनेकडून लावा रे तो व्हिडिओ! शिवसेनेने लावला किरीट सोमय्यांचा ‘तो’ व्हिडिओ

September 04, 2021 , 0 Comments

सिंधुदुर्ग । गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका करत आहेत. अनेक नेत्यांवर ते भ्रष्टाचाराचे आरोप देखील करत आहेत. असे असताना आता ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी शिवसेनेकडून वेगळ्याच प्रकारे आंदोलन करण्यात आले. याची सध्या चर्चा रंगली आहे.

शिवसेनेकडून कणकवली शहरात किरीट सोमय्या यांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि केलेली टीका एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून दाखवण्यात येते आहे. अनेक नागरिक याठिकाणी थांबून ही व्हिडिओ बघत आहेत.

ज्या ठिकाणी किरीट सोमय्या यांची पत्रकार परीषद झाली. त्याच्या शेजारीच कणकवली शिवसेना शाखा आहे. या शाखेच्या बाहेर शिवसैनिकांनी मोठ्या LED स्क्रीनवर, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर केलेल्या आरोपांचे व्हिडीओ आवाज मोठा करून दाखवण्यात आला.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते. यावेळी शिवसेना आमदार वैभव नाईक शिवसेना शाखेत उपस्थित होते. यामुळे तणाव निर्माण झाला होता. सोमय्या येताच किरीट सोमय्या यांचे एक जुनं वक्तव्य स्क्रीनवर लावण्यात आले होते.

यामध्ये सोमय्या यांनी नारायण राणे आणि त्यांच्या परिवारावर आरोप केले होते. तोच व्हिडीओ शिवसैनिकांनी स्क्रीनवर लावला. यामुळे दिवसभर याचीच चर्चा सुरू होती. किरीट सोमय्या तुम्ही जे बोलला होता, त्याचे काय झाले आज सांगाल का? असा प्रश्न शिवसैनिकांनी यावेळी उपस्थित केला.

कणकवली शाखेसमोरील रस्त्यावर भाजप कार्यकर्ते सोमय्या यांचे स्वागत करण्यासाठी जमले होते. तर शिवसेना शाखेत आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसैनिक जमले होते. यावेळी पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात होता. या व्हिडिओकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

ताज्या बातम्या

परप्रांतीय भाजी विक्रेत्याची मराठी भाजी विक्रेत्याला मारहाण; डोबिंवलीतील धक्कादायक घटना

उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात हवंय आरक्षण; मंत्री म्हणतात तुमच्यासाठी मी शिफारस करतो

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर वाईट अवस्था झालीय शहनाज गिलची; अली गोनीने सांगीतला भयंकर अनुभव


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: