मनसेला चेकमेट करण्यासाठी शिवसेनेचा मास्टरप्लॅन; मनसेतून शिवसेनेत आलेल्या ‘त्या’ नेत्याची पुण्यात नियुक्ती

September 04, 2021 , 0 Comments

राज्यात लवकरच महानगरपालिकांच्या निवडणूका होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे पुण्याच्या महानगपालिकाच्या निवडणूकीवर भर देताना दिसत आहे.

अशात शिवसेना उपनेते सचिन अहिर आणि मनसेतून शिवसेनेत आलेल्या आदित्य शिरोडकर यांच्याकडे शिवसेनेने महत्वाची जबाबदारी दिली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: या नियुक्तीचे आदेश दिले आहे.

सचिन अहिर यांची पुणे संपर्कप्रमुख पदावर आणि आदित्या शिरोडकर यांची पुणे सहसंपर्कप्रमुख पदावर नियुक्त करण्यात आली आहे. मनसेत दिर्घकाळा कामाचा अनुभव असणाऱ्या शिरोडकरांना ऐनवेळी पुण्याची जबाबदारी दिलेल्या राज्यभरात चर्चांणा उधाण आले आहे.

२००९ मध्ये नितीन सरदेसाई यांना विधानसभेच्या निवडणूकीत उभे राहण्याची संधी दिली गेली. त्यावेळी आधी आदित्य शिरोडकरांना विचारण्यात आले होते, पण त्यांच्या वयामुळे ते पात्र नव्हते. पण त्यांनी ही निवडणूक खुप जवळून बघितली होती.

२०१२ मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये २९ नगरसेवक निवडणून आले होते. त्यानंतर ते आपल्या वडिलांसोबत काम करत असल्यामुळे ते या महानगरपालिकेचा एक भाग झाले होते. त्यानंतर २०१४ साली संपुर्ण महाराष्ट्रात त्यांनी शिक्षण परिषद घेतली होती.

मुंबईतील मनसे पक्षबांधणी माझ्या वडिलांनी आणि राज ठाकरे यांनी केली होती. प्रत्येकवर्षी आम्ही वेगवेगळ्या शहरात जाऊन वर्धापन दिन साजरा करायचो. त्यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम, तसेच शाळा व महाविद्यालातील विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा आयोजित करायचो, असेही आदित्य आदित्य शिरोडकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

पंकजाताई २०२४ च्या निवडणुकीत मी तुमच्यासोबत काम करणार, धनंजय मुंडेंच्या पत्नीचे मोठे वक्तव्य
आता शिवसेनेकडून लावा रे तो व्हिडिओ! शिवसेनेने लावला किरीट सोमय्यांचा ‘तो’ व्हिडिओ
उत्तर भारतीयांना महाराष्ट्रात हवंय आरक्षण; मंत्री म्हणतात तुमच्यासाठी मी शिफारस करतो


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: