गोकुळची मुंबईकडे झेप!; वार्षिक सभेत झाला मोठा निर्णय

September 25, 2021 0 Comments

कोल्हापूर: अडीच हजार कोटी वार्षिक उलाढाल असलेला गोकुळची सर्वसाधारण सभा आज पार पडली. या सभेत मुंबई आणि रायगडमधील ३२४ कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. तसेच दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने मृत्यू झाल्यास एक लाख रुपयांचा विमा देण्याची घोषणाही गोकुळचे चेअरमन यांनी केली. ( ) वाचा: ताराबाई पार्क येथील कार्यालयात ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या सभेत विषयपत्रिकेवरील अकरा विषयांना मंजुरी दिली गेली. सभेला ग्रामविकास मंत्री आणि पालकमंत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. सभेत सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. भोकरपाडा येथील सोळा एकर जागा गोकुळ दूध संघाला मिळवून देण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न केल्याबद्दल मंत्री मुश्रीफ आणि पालकमंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. वाचा: चेअरमन विश्वास पाटील यांनी गोकुळच्या वाटचालीचा आढावा घेतला. गोकुळचा विस्तार करण्यासाठी रायगड आणि मुंबई मधील जागा खरेदीचा निर्णय योग्य असल्याचा दावाही त्यांनी केला. ते म्हणाले, 'गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे. गोकुळ आणि, दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विमा योजना सुरू करण्यात आली आहे. दूध उत्पादकाने कोणत्याही बँकेकडून कर्ज घेऊन दुभती जनावरे खरेदी केली असतील अथवा त्या जनावरांचे दूध गोकुळ दूध संघास येत असेल त्यांच्यासाठी विमा योजना असणार आहे. दूभती जनावरे कोणत्याही आजाराने मृत्युमुखी पडल्यास एक लाख इतकी विम्याची रक्कम दूध उत्पादकाला मिळेल.' कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांनी आभार मानले. या सभेला गोकुळचे ससत्ताधारी आणि विरोधी आघाडीचे संचालक उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: