अमित शहांसोबत बैठक; मुख्यमंत्री ठाकरेंना पवारांनी काय सांगितलं?

September 25, 2021 0 Comments

मुंबई: शिक्षण विभागाशी संबंधित एक महत्त्वाचे सादरीकरण आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. या सादरीकरणाला मुख्यमंत्री यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे उपस्थित होते. या सादरीकरणानंतर दोन्ही नेत्यांमध्ये स्वतंत्रपणे चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे रविवारी केंद्रीय गृहमंत्री यांनी नक्षलवादावर बोलावलेल्या बैठकीसाठी दिल्लीत जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ( ) वाचा: राज्यातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी पावले टाकण्यात येत आहेत. त्याला अनुसरून एमकेसीएलने आज एक सादरीकरण सह्याद्री येथे केले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यात स्वतंत्रपणे बैठक झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ही बैठक अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जात आहे. वाचा: गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी नक्षलवादाच्या प्रश्नावर नक्षल प्रभावित राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी संबंधितांची बैठक घेऊन राज्यातील नक्षलग्रस्त भागांतील स्थितीचा आढावा घेतला आहे. असे असताना याच बैठकीबाबत शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आज चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळू शकलेला नाही. वाचा: दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे हे गेल्यावेळी पंतप्रधान यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह दिल्ली दौऱ्यावर गेले होते. राज्याशी संबंधित मुद्द्यांवर पंतप्रधानांशी चर्चा झाल्यानंतर स्वतंत्रपणे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाली होती. आताही गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री ठाकरे यांची स्वतंत्रपणे चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील आजच्या बैठकीबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: