धक्कादायक! किरकोळ कारणावरून शेजाऱ्याने सोडला 8 वर्षाच्या चिमुरडीवर कुत्रा; हल्ल्यात मुलगी रक्तबंबाळ

ग्वालियर। शेजारी म्हटलं तर बऱ्याचदा छोट्या मोठ्या कारणांवरून भांड्याला भांड लागत असतं. मात्र जरी मोठ्या व्यक्तींमध्ये वाद झाले तरी घरातील बच्चे मंडळी ही सर्वांशीच गोड बोलत असते. मात्र बऱ्याचदा हे वाद काही वेळानंतर विसरले जातात.

किंवा बहुतेकवेळा जर हे वाद विकोपाला गेले असतील तर त्यांच्यात हाणामारी किंवा पोलीस तक्रार इथपर्यंत जातात. मात्र या शेजाऱ्यांच्या भांडणात असो किंवा घरातील भांडणात असो लहान मुलांना यापासून लांब ठेवले जाते. मात्र सध्या अशी एक विचित्र आणि धक्कादायक घटना घडली आहे की सर्वांनाच धक्का बसला आहे.

छोट्या वादावरून शेजाऱ्याने एका 8 वर्षांच्या मुलीवर पाळीव कुत्रा सोडल्याचा प्रकार घडला आहे. व या कुत्र्याच्या हल्लात ही मुलगी रक्तबंबाळ झाली आहे. सुदैवाने तिच्या सोबत लहान बहीण होती मात्र ती वेळेत लपल्याने तिला कोणतीही इजा झालेली नाही.

ही घटना मध्यप्रदेशच्या ग्वालियरमधील एका सोसायटीतील आहे. या सोसायटीमध्ये दीपक कुमार जैन हे कुटुंबासह राहतात. त्यांना 8 वर्षांची आणि 5 वर्षांची अशा दोन मुली आहेत. काही दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या अनिल शर्माचं दीपक जैन यांच्यासोबत भांडण झालं.

अनिल यांनी त्यांच्याकडे असणारा कुत्रा गच्चीवर सोडू नये कारण तिथं लहान मुलं खेळत असतात, असं दीपक यांनी सांगितलं होतं. व त्यावरून हा वाद पेटला होता. या वादानंतर गच्चीवर नेहमीप्रमाणे 8 वर्षांची परी आणि तिची 5 वर्षांची छोटी बहीण खेळत होत्या. व तेव्हा संधी साधून अनिल आपल्या कुत्र्याला घेऊन आला आणि त्याने परीच्या अंगावर कुत्रा सोडला.

या हल्ल्यात तिच्या अंगाचे लचके तोडायला सुरुवात केली. व ती रक्तबंबाळ झाली. बरीची छोटी बहीण घाबरून कूलरच्या मागे जाऊन लपली. काही वेळानंतर परीचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय आणि इतर शेजारी धावत गच्चीवर आले आणि त्यांनी परीची कुत्र्याच्या तावडीतून सुटका केली.

व त्यानंतर कुटुंबीयांनी परीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. व त्यानंतर घडलेल्या घटनेनंतर अनिलला जाब विचारला असला त्याने दीपक यांनाच ठार मारण्याची धमकी दिली. पुढच्या वेळी छोट्या मुलीवर कुत्रा सोडेने, अशी धमकी दिली व त्यानंतर दीपक यांनी पोलीस तक्रार केली व आता या घटनेनंतर पोलीस तपास करत आहेत.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी रुग्णालयात दाखल; उपचारा दरम्यान धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई। प्रत्येकजण आपलं घर चालावं तसच आपल्या नोकरीसाठी धडपड करत असतो. दिवसभर मेहनत घेत असतो. त्यामुळे कलाकार असो किंवा सर्व सामान्य नोकरी करणारा कर्मचारी असो सर्वच दिवसरात्र मेहनत घेत असतात. मात्र बऱ्याचदा या सर्वांमध्ये आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होत व आपण आजारी पडतो.

अशातच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक माहिती समोर येत आहे. श्वेता तिवारील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या महितीनुसार श्वेताच्या प्रकृती अस्वाथ्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार श्वेताच्या टीमने सांगितले की, ” काही काळापासून श्वेता सतत प्रवास करत असून तिला पुरेशी विश्रांती मिळत नव्हती, त्यात हवामान बदल या कारणामुळे तिलाा त्रास झाला”. पुढे टीमने हे ही सांगितले श्वेता आता बरी आहे आणि लवकरच तिला घरी सोडण्यात येईल.

त्यामुळे आता श्वेता तिवारी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. श्वेता एक लोकप्रिय अभिनेत्री आहेच मात्र ती एक उत्त्तम आईदेखील आहे. ती आपल्या मुलांना खुप चांगल्या पद्धतीने सांभाळत असून तीच मुलांसोबत बॉंडींग देखील खूप चांगल आहे.

श्वेता तिवारी गेल्या ११ वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करत आहे. ती अभिनयासोबतच विविध कारणांमुळे कायम चर्चेत असते. नुकताच श्वेता ‘खतरों के खिलाडी ११’ ची स्पर्धक होती. या शोमध्येही तिने आपल्या खेळाडूंवृत्तीनं चाहत्यांची मन जिंकून घेतली.

ती लवकरच ‘बिग बॉस १५’ मध्ये जमाती लीडर म्हणून सामील होणार आहे. व तिने मालिकांमध्ये काम केले आहे. श्वेता तिवारीने खूप संघर्ष करून इंडस्ट्रीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. तिने दोन विवाह केले, पण तिची दोन्ही विवाह अपयशी ठरले.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पुण्यात शरद पवार यांचा नऊ फूट उंचीची पुतळा, सुप्रिया सुळे यांच्यांकडून कौतुक..

पुणे । देशाचे माजी कृषिमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा मोठा राजकीय प्रवास आहे. राज्याच्या आणि देशाच्या जडणघडणीत त्यांचे योगदान मोठे आहे. आता त्यांचा पुर्णाकृती पुतळा पुण्यात साकारला जात आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

शिल्पकार सुप्रिया शिंदे हे शरद पवारांचा ९ फुट असलेला मेटलचा पुतळा साकारत आहेत. हा पुतळा पुण्यातील आंबेगाव परिसरात साकारला जात आहे. या पुतळ्याची नुकतीच सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली आहे. यामुळे आता याची चर्चा सुरू आहे. सुप्रिया शिंदे बनवत असलेल्या शरद पवारांच्या मेटलच्या पुतळ्यासाठी दीड टन मेटलचा वापर करण्यात आला आहे.

तसेच शरद पवारांचा हा पुतळा साकारण्यासाठी त्यांना आठ महिन्यांचा कालावधी लागला आहे, तसेच दररोज दहा तास काम करून हा पुतळा साकारला आहे, अशी माहिती सुप्रिया शिंदे यावेळी दिली. हा पुतळा कुठे बसवण्यात येणार याबाबत माहिती दिली गेली नाही.

याची पाहणी करताना सुप्रिया सुळे यांनी शिल्पकार सुप्रिया शिंदे यांचे तोंडभरून कौतूक केले आहे. शरद पवारांचा पुतळा बनवण्याचा निर्णय लॉकडाऊनमध्ये झाला होता. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ बघून हा पुतळा साकारला गेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले आहे. वर्कशॉपमध्ये सुप्रिया शिंदे करत असलेले काम थक्क करणारे आहे. तसेच त्यांनी बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे देखणे शिल्प साकारले आहे, असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. अनेक लोकं ते बघण्यासाठी येत असतात.

आता हा पुतळा कुठे बसवण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

…म्हणून शिवलीला पाटील बिग बॉसच्या घराबाहेर! चर्चांना उधाण

मुंबई । सध्या बिग बॉस मराठी कार्यक्रमाची चर्चा सगळीकडे आहे. कार्यक्रमाच्या या पर्वातील सदस्यांना देखील प्रेक्षकांचे भभरून प्रेम मिळते आहे. या कार्यक्रमाची सुरुवातीपासूनच चर्चा झाली. कारण
या पर्वामध्ये दोन सदस्यांची नावं गाजली आणि ती म्हणजे कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि कीर्तनकार शिवलीला पाटील.

कार्यक्रमाच्या या पर्वातील प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांच्या मनावर एक छाप सोडली आहे. असे असताना आता शिवलीला यांची प्रकृती अचानक ढासळली. आज बिग बॉस यांनी जाहीर केल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांकरिता काही काळ त्यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावे लागले. त्यामुळे आजपासून व्होटिंग लाईन्स देखील बंद राहतील.

शिवलीला यांनी सांगितले इथला प्रत्येक माणूस माझा असेल, त्यांनी सदस्यांबरोबरच प्रेक्षकांची मने देखील जिंकली. सोशल मीडियावर ज्यांची कीर्तने प्रसिद्ध आहेत. शिवलीला यांच्या कीर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. यामुळे त्यांच्या कार्यक्रमाची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

संत साहित्य, संस्कृती आणि सद्य विषयांवर शिवलीला कीर्तन करतात. त्या बिग बॉसमध्ये आल्याने त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती. नुकतेच बिग बॉसमध्ये पार पाडलेल्या नॉमिनेशन कार्यात घरातील सदस्यांनी एकूण सात सदस्यांना घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट केले गेले.

घरातील योगदान, घरातील वावर, टास्कमधील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या निकषांवर त्यांना नॉमिनेट केले होते. यामध्ये शिवलीलाचाही समावेश होता. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मी आठ दिवस जरी राहिले, तरी ज्यादिवशी मी घरातून बाहेर पडेन, त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल, असे शिवलीला नॉमिनेट झाल्यानंतर म्हणाली होती. मला गेम कळायला थोडा वेळ लागला. पण इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा सहभाग दिसेल, असेही तिने म्हटले आहे.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

भाजप नेत्यांची यादी आम्ही देतो, त्यांच्यावर ईडी कारवाई करणार का?; जयंत पाटलांचा सवाल

मुंबई। सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांना ईडीच्या नोटिसा येत आहेत. महाविकासातील अनेक नेत्यांना चौकशीसाठी बोलवण्यात येत आहे.

ईडीच्या करवाईमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब, प्रताप सरनाईक , आनंद अडसूळ, व आता भावना गवळी यांनादेखील ईडीचा समन्स आला आहे. व त्यामुळे आता राजकारणात मोठी खळबळ सुरू आहे.

दरम्यान आता या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तसेच जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ईडीच्या होणाऱ्या कारवाईवरून भाजपवर घणाघात केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे आणि हे जाणीवपूर्वक सुरू आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद माध्यमांशी संवाद साधला.

जयंत पाटील म्हणाले की, भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजुला राहिले आणि ज्यांच्यावर केंद्रीय एजन्सीने ठपका ठेवला ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांचं काय झालं? हे एकदा ईडीने जनतेला सांगावे, असं पाटील म्हणाले आहेत.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काहीही चुकीचे केले नाही. पण त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचे काम सुरुये. असेच इतर मंत्र्यांच्याबाबतही घडत आहे. जे खरे मनी लॉण्ड्रींग करीत आहेत, त्यांना सोडून देण्यात येत आहे. आणि जे करत नाहीत, त्यांना या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवले जात आहे.

अशा प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, मात्र ते भाजपात गेले आहेत, त्यांचे काय झाले? राज्यात असे अनेक लोक आहेत, जे सध्या भाजपत आहेत. ज्यांना ईडीने नोटिसा दिलेल्या आहेत. त्यांच्या चौकशीचे काय झाले? असा प्रश्न पाटील यांनी विचारला आहे. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही कोणतेही पैसे घेतले नसून त्यांनादेखील यात गोवण्यात आलं अस पाटील म्हणाले आहेत.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अनिल देशमुख प्रकरण: ईडीच्या चौकशीचा फेरा मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांपर्यंत

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कथित मनी लॉण्ड्रिग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) आता राज्याच्या गृहविभागाचे उप सचिव यांना समन्स बजावलं आहे. चौकशीसाठी आजच ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. (ED summons Maharashtra deputy home secretary ) गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर सीबीआयनं सुरू केलेल्या तपासाच्या आधारे 'ईडी'नंसुद्धा देशमुख यांची चौकशी सुरू केली आहे. 'ईडी'नं आत्तापर्यंत देशमुख यांना पाच वेळा चौकशीचे समन्स बजावले. मात्र, देशमुख अद्यापही हजर झालेले नाहीत. त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीसही बजावण्यात आली आहे. वाचा: अनिल देशमुख यांच्या शोधासाठी 'ईडी'नं आत्तापर्यंत १२ ते १४ वेळा त्यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले आहेत. 'ईडी'ची तीन पथकं एकाचवेळी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या शोधार्थ कार्यरत आहेत. लूकआऊटमुळं लवकरच परराज्यात देखील 'ईडी'कडून शोध सुरू होईल, असं सूत्रांनी स्पष्ट केलं. असं असूनही अद्याप अनिल देशमुख ईडीसमोर आलेले नाहीत. त्याऐवजी त्यांनी न्यायालयात जाण्याचा मार्ग पत्करला आहे. अनिल देशमुख ईडीसमोर आले नसले तरी त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची चौकशी ईडीनं सुरू केली आहे. देशमुख यांच्या स्वीय सहाय्यकाचीही चौकशी झाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सोमवारी ईडीनं चौकशी केली. आता ईडीनं कैलाश गायकवाड यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

गरीब देशात एसीची कंपनी चालणार नाही असं म्हटलं जायचं, ब्ल्यूस्टारने ते खोटं ठरवलं

१९६९ साली बॉंबे स्टॉक एक्स्चेंजमध्ये रजिस्टर होणारी पहिली वातानुकूलित [ ac ] आणि रेफ्रिजरेशन कंपनी म्हणजे ब्ल्यू स्टार लिमिटेड. हॉस्पिटल, फार्मसी, फूड सप्लाय चेन, नाशवंत वस्तूंचे गोदाम अशा ठिकाणी सगळ्यात जास्त सेवा हि ब्ल्यू स्टार लिमिटेड कंपनी देते. पण या कंपनीचा सुरवातीचा प्रवास कसा होता याबद्दल जाणून घेऊया.

१९४३ मध्ये मोहन टी अडवाणी यांनी दोन कर्मचारी आणि सुरवातीचं भांडवल २००० रुपयांच्या जीवावर ब्ल्यू स्टारची सुरवात केली. सुरवात झाली ती रेफ्रिजिरेटर आणि एअर कंडिशनरच्या पुनर्निर्मितीपासून. पुढे काही वर्षातच आईस कँडी मशीन, बाटली कुलर आणि वॉटर कुलर तयार करणारी ब्ल्यू स्टार हि इंटरनॅशनल कंपनी बनली. मग हळूहळू इंटरनॅशनल स्तरावर मान्यताप्राप्त कंपन्यांशी त्यांनी पार्टनरशिप केली. 

१९५४ मध्ये हनीवेल वितरक म्हणून ब्ल्यू स्टारची निवड करण्यात आली ज्यामुळे त्यांना व्यावसायिक इलेकट्रोनिक क्षेत्रात प्रवेश करता आला. व्यावसायिक एसीमध्ये त्यांची चांगली प्रगती झाली आणि लोकांकडूनसुद्धा ब्ल्यू स्टारला चांगला प्रतिसाद मिळू लागला. १९६० पर्यंत ब्ल्यू स्टारचे उत्पन्न हे १ कोटीच्या घरात गेलं होतं. पुढच्या काही दशकात ब्ल्यू स्टारने अत्यंत यशस्वी उपक्रम राबवले.

ब्ल्यू स्टार हेवलेट पॅकार्डचे वितरक बनले आणि मुंबईतील नरिमन पॉईंट येथील एअर इंडिया बिल्डिंग, एक्स्प्रेस टॉवर्स आणि हॉटेल ओबेरॉयचे एसीचे करारसुद्धा ब्ल्यू स्टारने मिळवले. ब्ल्यू स्टार १९९० आणि २००० साली बऱ्याच उपक्रमांमध्ये सहभागी होती.

२००१ पर्यंत ब्ल्यू स्टार एसी क्षेत्रात कार्यरत होते आणि त्याची निर्यातसुद्धा करत होते. पण कंपनीने लवकरच इलेकट्रीकल काँट्रॅक्टिग, प्लम्बिंग आणि फायर फायटिंग सेगमेंटच्या व्यवसायात प्रवेश केला. सेंट्रल एअर कंडिशनर आणि रूम एअर कंडिशनर या दोन प्रकारात ब्ल्यू स्टार कार्यरत आहेत. सोबतच एसी क्षेत्रात सगळ्यात मोठा ब्रँड म्हणून ब्ल्यू स्टारचं नाव आहे. हॉटेल्स, शॉपिंग मॉल, विमानतळ, रुग्णालये, चित्रपटगृहे, बँका अशा बऱ्याच ठिकाणी ब्ल्यू स्टारचे एसी आपल्याला पाहायला मिळतात आणि यावरूनच ब्ल्यू स्टारची लोकप्रियता कळून येते. 

२०११ नंतर ब्ल्यू स्टारने ग्राहकांना घरपोच एसीची सेवा देण्यास सुरवात केली. ब्ल्यू स्टारने व्यावसायिकदृष्ट्या स्वयंपाक घर उपकरणे आणि हेल्थकेअर रेफ्रिजरेशन क्षेत्रात प्रवेश केला पण एसी हीच त्यांची मेन ओळख झाली. त्याच्या उत्पादनाच्या श्रेणीमध्ये रूम एअर कंडिशनर्स, एअर प्युरिफायर्स, एअर कूलर – कॅसेट, मेगा स्प्लिट आणि व्हर्टिकूल एअर कंडिशनर्स, वॉटर प्युरिफायर्स, वॉटर कूलर, सेंट्रल एअर कंडिशनिंग सिस्टम्स, कोल्ड स्टोरेज, कमर्शियल रेफ्रिजरेशन आणि मॉर्च्युअरी चेंबर्स सारखी विशेष उत्पादने समाविष्ट आहेत.

ब्लू स्टारची नाविन्यपूर्ण आणि ऊर्जा-कार्यक्षम उत्पादन श्रेणी सुमारे २९०० चॅनेल भागीदार आणि ७६५ सर्व्हिस असोसिएट्सच्या मजबूत नेटवर्कद्वारे उपलब्ध आहे, ८०० पेक्षा जास्त शहरांमधील ५००० स्टोअरमध्ये ग्राहकांना सेवा देत आहे. उत्पादन, विपणन आणि विक्रीचा पाठपुरावा करण्यासाठी त्याच्याकडे विक्रीनंतरचे विश्वसनीय कर्मचारी आहेत. यामुळे त्याच्या विभागातील एक मार्कर लीडर म्हणून त्याचे स्थान पक्के झाले आहे. 

ब्लू स्टारने विमानतळ, मेट्रो स्टेशन आणि संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि साउथ ब्लॉकमधील सरकारी प्रतिष्ठानांवर अनेक महत्त्वाचे आणि जटिल वातानुकूलन आणि शीतकरण प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. हे सार्क, आशियान प्रदेश आणि उत्तर आफ्रिकेतील बाजारपेठांमध्ये आपली उत्पादने निर्यात करते. त्याची वार्षिक कमाई ५ हजार ४०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते.

ब्लू स्टारच्या जाहिरात आणि जाहिरात धोरणात टेलिव्हिजन, प्रिंट मीडिया, होर्डिंग्ज आणि इंटरनेटचा समावेश आहे. क्रिकेटर विराट कोहली २०१९ मध्ये त्याचा ब्रँड अम्बेसेडर बनला. तो ग्राहकांच्या भेटींमध्ये गुंतवणूक करतो, व्यापार कार्यक्रमांना प्रायोजित करतो आणि प्रदर्शनांमध्ये भाग घेतो. 

२००८ मध्ये फोर्ब्ज आशियाच्या २०० बेस्ट अंडर अ बिलियनच्या यादीत समाविष्ट असलेल्या २० भारतीय कंपन्यांपैकी ब्ल्यू स्टार एक होती. आज घडीला बऱ्याच लोकांना रोजगार देण्याचं कामसुद्धा ब्ल्यू स्टार करत आहे.

हे हि वाच भिडू :

The post गरीब देशात एसीची कंपनी चालणार नाही असं म्हटलं जायचं, ब्ल्यूस्टारने ते खोटं ठरवलं appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

आईच्या स्वप्नासाठी जिने ‘मदर्स डे’ सुरु केला, तिनेच तो बंद करण्याची मोहीम सुरु केली होती

‘मदर्स डे’ आपल्या आईविषयी प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. जगभरात ५० पेक्षा जास्त देशात हा दिवस साजरा केला जातो. हा पण प्रत्येक ठिकाणी वेगवगेळ्या दिवशी. खास करून मार्च ते मे महिन्यातं. यात भारत मे महिन्याच्या पहिल्या रविवारी मदर्स डे साजरा होतो.

आता तुम्ही म्हणाल यावर्षीचा ‘मदर्स डे’ झाला कि, त्याचं आता काय. तर भिडू आपल्याला ‘मदर्स डे’ची थीम आणणाऱ्या सहसंस्थापिका अ‍ॅना  जार्विस यांचा एक किस्सा सापडलाय. 

तर १०७ वर्षांपासून सुरु असलेली ही मदर्स डेची परंपरा अ‍ॅना मारी जार्विस यांनी सुरु केली. अ‍ॅना मारी जार्विसने आपल्या आई अ‍ॅन जार्विसला हा दिवस समर्पित केला होता. ज्यादिवशी त्यांची पुण्यतिथी असते.

खरं तर, मदर्स डेची सुरुवात अ‍ॅना मारी जार्विसची आई अ‍ॅन जार्विसला करायची होती. यामागे त्यांचा उद्देश होता कि, आईंसाठी एका अश्या दिवसाची सुरुवात करायची, ज्यादिवशी त्यांच्या  अतुलनीय सेवेसाठी त्यांना सन्मानित केले जाईल. पण अ‍ॅन जार्विस यांचे १९०५ मध्ये निधन झाले आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांची मुलगी म्हणजे अ‍ॅना मारी जार्विसने घेतली.

पण, अ‍ॅनाने या दिवसाच्या थीममध्ये  किंचित बदल केला. त्यांनी म्हंटल कि, या दिवशी लोकांनी आपल्या आईच्या बलिदानाची आठवण केली पाहिजे आणि त्यांचे कौतुक केले पाहिजे. लोकांना तिची कल्पना फार आवडली. यानंतर १९०८ मध्ये म्हणजे अ‍ॅन जार्विसच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यात आला.

जेव्हा जगात पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यात आला, तेव्हा अ‍ॅना जार्विस एक प्रकारे याची पोस्टर गर्ल होती. तिने त्या दिवशी आपल्या आईच्या आवडते पांढरे कार्नेशन फुल महिलांना वाटले, जे व्यवहारातचं घेतले गेले. या फुलांचे व्यापारीकरण इतके वाढले की, येत्या काही वर्षांत, मदर्स डेच्या दिवशी पांढऱ्या कार्नेशन फुलांचा काळाबाजार व्हायला लागला. लोक जास्तीत जास्त किंमतीत ते खरेदी करण्याचा प्रयत्न करू लागले. हे पाहून अ‍ॅना संतापली आणि हा दिवस संपवण्याची मोहीम सुरू केली.

मदर्स डे वर पांढऱ्या कार्नेशन फुलांच्या विक्रीनंतर, टॉफी, चॉकलेट आणि सर्व प्रकारच्या भेटवस्तू देखील ट्रेंडमध्ये येऊ लागल्या. अशा परिस्थितीत अ‍ॅनाने लोकांना याबाबदल विरोधही केला. ती म्हणाली कि,

लोकांनी आपल्या लोभासाठी मार्केटिंग करून या दिवसाचे महत्त्व कमी केले आहे.

१९२० मध्ये तिने लोकांना ही पांढरी कार्नेशन फुलं खरेदी न करण्याचे आवाहनही केले. अ‍ॅना तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा दिवस संपवण्याच्या मोहिमेत गुंतली होती. पण तरीही हा मदर्स डे साजरा होत होता. याची ख्याती हळु- हळू अख्ख्या जगात पसरली. तिने यासाठी स्वाक्षरी मोहीमही चालवली, पण यात काही यश मिळाले नाही आणि १९४८ च्या आसपास अ‍ॅनाने या जगाला निरोप दिला.

अ‍ॅनाने मदर्स डे च्या बाजारीकरणाविरुद्ध सुरु सुरु केलेल्या मोहिमेचा परिणाम भलेही जगावर झाला नसेल. पण तिच्या कुटुंबावर मात्र झाला. तिचे कुटुंब आणि नातेवाईक आजही हा दिवस साजरा करत नाही.

काही वर्षांपूर्वी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अ‍ॅनाच्या नातेवाईक एलिझाबेथ बार यांनी सांगितले की,

आम्ही सगळ्याचं नातेवाईकांनी कधीचं  मदर्स डे साजरा केला नाही, कारण आम्ही अ‍ॅनाचा खूप आदर करतो. मार्केटींगने या स्पेशल दिवसाचा सगळं अर्थ बदलला आहे,  या अ‍ॅनाच्या भावनेवर त्यांचा खोलवर प्रभाव पडला आहे.

दरम्यान, आज कित्येक वर्षांनंतरही सगळ्या जगभरात हा मदर्स डे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. भलेही एक दिवस का असेना आपण आपल्या आईच्या त्यागाबद्दल तिचे आभार मानतो. 

हे ही  वाच भिडू :

The post आईच्या स्वप्नासाठी जिने ‘मदर्स डे’ सुरु केला, तिनेच तो बंद करण्याची मोहीम सुरु केली होती appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

रस्ते दुरुस्तीवर मुख्यमंत्री कठोर; 'त्या' अधिकारी, कंत्राटदारांवर होणार कारवाई

मुंबई: राज्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, मात्र या निधीचा विनियोग व्यवस्थित झाला नाही, कामचुकारपणा केल्याचे निदर्शनास आले तर संबंधित कंत्राटदाराची गय केली जाणार नाही. या रस्त्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यावर आहे त्यालाही जबाबदार धरून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले. ( ) वाचा: राज्यातील राष्ट्रीय व राज्य व उपाययोजनांचा बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत आढावा घेतला. यानेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम लवकर मार्गी लावण्याची सूचना देऊन मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविताना गुणवत्तेवर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाची गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. संपूर्ण रस्त्यांची कामे ही दर्जेदार झाली पाहिजेत. त्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. रस्त्यांच्या कामात गुणवत्तेवर सर्वोच्च भर देण्याबरोबरच रस्त्यांच्या कामासाठी कृती आराखडा तयार करावा, निधीची कमतरता पडू देणार नाही मात्र निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला नाही आणि कामात गुणवत्तेवर भर दिला गेला नाही तर कामचुकार अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या. वाचा: अतिवृष्टी आणि पावसामुळे राज्यातील रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यांच्या कामासाठी अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी ५० टक्के निधी ऑक्टोबरअखेर वितरित करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही मात्र रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व मुख्य अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा दररोज आढावा घेऊन व्यक्तिशः लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. राज्यातील जास्त पावसाच्या भागात डांबराऐवजी कॉंक्रिटचे रस्ते तयार केल्यास दर्जेदार आणि खड्डेविरहीत रस्ते तयार होतील यादृष्टीने भविष्यात निर्णय घेण्याचे सूतोवाचही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी केले. सध्याच्या स्थितीत राज्यातील रस्त्यांच्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग, राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण यांनी संयुक्तपणे मंत्रालयात वॉर रुम स्थापन करून रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री यांनी यावेळी दिल्या. रस्त्यांची कामे करताना आजची पूरस्थिती लक्षात घेऊन पूलांची उंची वाढवावी लागेल असे सांगून पाईपऐवजी बॉक्स स्ट्रक्चर बांधण्यासह पूरस्थितीच्या वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. रस्त्यांची कामे करताना तंत्रज्ञानाचा वापर वाढवला पाहिजे असे सांगून ज्या कंत्राटदारांनी चांगली कामे केली आहेत, अशांचा विचार करा, दर्जाहीन कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्याच्या सूचनाही चव्हाण यांनी यावेळी दिल्या. वाचा: या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री , राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार विनायक राऊत, खासदार राहुल शेवाळे, आमदार सुनील प्रभू यांचेसह मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव उल्हास देबडवार, अनिल गायकवाड यांचेसह कोकण, नाशिक, मराठवाडा, पुणे आदी विभागांचे मुख्य अभियंते, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अभियंते उपस्थित होते. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

साखर कारखान्याच्या अध्यक्षाचं थेट राष्ट्रवादीच्या आमदाराला आव्हान!

सातारा: 'वाईच्या विद्यमान आमदारांना सहकार क्षेत्रात आलेल्या अपयशाचे विलक्षण वैफल्प आहे. याच नैराश्यातून विद्यमान आमदार, त्यांचे बंधू व बगलबच्चे बेछूट आरोप करत आहेत. किसनवीर कारखान्यावर एक हजार कोटींचे कर्ज असल्याचा डांगोरा ते पिटत आहेत; परंतु त्याच्यापेक्षा निम्मे जरी कर्ज असेल तरी मी राजकारणातून निवृत्ती घेईन', असे खुले आव्हानं किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष यांनी दिले. ( ) वाचा: साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत मदन भोसले यांनी कारखाना व्यवस्थापनाचे प्रमुख या नात्याने बाजू मांडत विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. मदन भोसले म्हणाले, 'सहा तालुक्यांतील ५४० गावांमध्ये किसनवीर कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. ५२ हजार शेतकऱ्यांचे हित डोळ्यापुढे ठेवून मी निर्णय घेतलेले आहेत. माझ्याकडे चालवायला आला तेव्हा कारखान्यावर १ लाख ६९ हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. तरी देखील अतिशय कार्यक्षमपणे आम्ही कारखाना चालवला. कारखान्यावर मोठमोठे प्रकल्प उभे करण्यासाठी आर्थिक गुंतवणूक केली. प्रतापगड सहकारी साखर कारखाना अडचणीत आला असताना यांच्या सूचनेनुसार हा कारखाना चालवायला घेतला. कारखान्याची अवस्था अतिशय नाजूक होती तरीदेखील शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कारखाना भाडेतत्त्वावर चालवायला घेतला. दुष्काळी भागातील खंडाळा कारखाना देखील शेतकऱ्यांच्या मालकीचा हवा हे जाणून या कारखान्यात देखील आर्थिक गुंतवणूक केली. हे सर्व करत असताना माझा हेतु स्वच्छ होता. माझ्या मनात कोणतेही काळेबेरे कधीच नव्हते.' वाचा: मदन भोसले यांनी राष्ट्रवादीचे आमदार , त्यांचे बंधू नितीन पाटील यांच्यावर देखील निशाणा साधला. कारखान्याची निवडणूक घेऊन तो कारखाना आपल्या ताब्यात मिळत नाही म्हटल्यावर या मंडळींनी कारखान्याची बदनामी सुरू केली आहे. कारखाना चालावा म्हणून २८ हजार हेक्टरवर उसाची लागवड केली. त्यासाठी महाराष्ट्र बँकेचे कर्ज उचलण्यात आले होते मात्र या कर्ज प्रकरणांमध्ये संबंधित शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना कोर्टात जायला त्यांनी भाग पाडलं. त्यातूनही आमचे संचालक मंडळ तावून-सुलाखून बाहेर पडले. निर्दोष मुक्तता झाली. आता माझ्यावरील वैयक्तिक द्वेषापोटी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम आमदार व त्यांचे सहकारी करत आहेत, असा आरोप करताना आमदारांनी विधानसभेत कर्तबगारी दाखवावी. तिथे काही दाखवता येत नाही म्हणून आमच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. सरकार त्यांचं असल्यामुळे चौकशीचा ससेमिरा आमच्याभोवती फिरवला जातोय. यातून विरोधकांना काहीही साध्य करता येणार नाही. शेतकऱ्यांचे हित समोर ठेवून आम्ही कारखाना चालवतोय. १५ ऑक्टोबर पूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण एफआरपीची रक्कम देऊ आणि कारखान्याला गाळप परवाना मिळवू, असा विश्वास देखील मदन भोसले यांनी व्यक्त केला. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पुण्यात अतिमहत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा भेदली!; 'ते' आत आलेच कसे?

पुणे: शहरात चंदनचोरांकडून चोरीचे सत्र सुरूच असून, अतिमहत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा भेदून चोरटे चंदनाच्या झाडांची चोरी करीत असल्याचे दिसून आले आहे. भागातील परिसरासह गट क्रमांक दोन येथील ५० हजार रुपये किमतीची चंदनाची सहा झाडे चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. ( ) वाचा: भारतीय सैन्य दलात नोकरीस असणारे मनोजकुमार चौहान (वय ४५, रा. पुलगेट) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या हद्दीतील डॉ. कोयाजी रस्त्यावर असलेल्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल डेपो आवारातून चोरट्यांनी २६ ते २७ सप्टेंबर कालावधीत २२ हजार रुपये किमतीची दोन चंदनाची झाडे चोरून नेली. सुरक्षाव्यवस्था असूनही चोरट्यांनी चंदनाची झाडे चोरली. या प्रकरणी वानवडी पोलीस तपास करत आहेत. वाचा: दुसऱ्या घटनेत राज्य राखीव पोलीस दल गट (एसआरपीएफ) क्रमांक दोन मधील २६ हजार रुपये किमतीची चार चंदनाची झाडे चोरून नण्यात आली. हा प्रकार ११ ते १२ सप्टेंबरदरम्यान घडला. ‘एसआरपीएफ’ मध्ये प्रवेश करणाऱ्या ठिकाणावर व आतदेखील पोलिसांचा बंदोबस्त आहे; तरीही चोरट्यांनी येथील सुरक्षा भेदून चार चंदनाची झाडे चोरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

व्वा रे बिट्या, तुला हे कुणी सांगितलं?; पाटलांचा सोमय्यांना तीरकस सवाल

अहमदनगर: महाविकास आघाडीचे अनेक नेते सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. त्यात भाजप नेते हे रोज उठून सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी किरीट सोमय्या आणि भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्यावर सडकून टीका केली आहे. ईडीच्या नोटिसांवरून पाटील यांनी या दोन्ही भाजप नेत्यांना सवालही केला आहे. ( ) वाचा: पाटील यांनी तीरकस शब्दांत सोमय्या यांची खिल्ली उडवली. 'किरीट सोमय्या म्हणतात महाराष्ट्रातील अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल. व्वा रे बिट्या तुला हे कुणी सांगितलं?', असा सवालच पाटील यांनी केला. ईडीची नोटीस येण्याआधी किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांना कसं कळतं?, असा सवालही पाटील यांनी विचारला. पारनेर येथील मेळाव्यात पाटील बोलत होते. वाचा: महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कटकारस्थान रचलं जात आहे. मंत्र्यांचं नावं घ्या नाहीतर तुमच्यावर कारवाई करू, असे सांगून खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. भाजप चुकीची संस्कृती महाराष्ट्रात आणू पाहत आहे. ही गोष्ट आपल्याला थांबवायची आहे, असे आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केले. केंद्रीय संस्थांचा वापर करून गुंडगिरी सुरू आहे. सूडाचे राजकारण राज्यात नव्हे तर देशातही कधी झालेले नाही, मात्र भाजपकडून ऐनकेन प्रकारे असे राजकारण सुरू आहे असा आरोप पाटील यांनी केला. मोदींनी लोकांना महागाईची सवय लावली! पूर्वी चार आणे वाढले तरी आंदोलन व्हायचे. मात्र आता महागाई बेसुमार वाढूनही यावर कोणी आंदोलन करत नाही. पंतप्रधान मोदी यांनी लोकांना महागाईची एकप्रकारे सवयच लावली आहे. पक्षाच्या माध्यमातून हे विषय लक्षात आणून देण्यासाठी आंदोलन उभे केले पाहिजे, अशी भूमिका जयंत पाटील यांनी मांडली. मागील काही दिवसांपासून राज्यभरात संततधार सुरू आहे. धरणे तुडुंब भरली आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. अशावेळी शेतकरीच उरला नाही तर पाणी मिळून फायदा काय? म्हणून या अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे पूर्ण करत, पडेल ती किंमत देऊ पण शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असे पाटील यांनी स्पष्ट केले. आमदार नीलेश लंके यांनी करोना काळात न भूतो न भविष्यती असे काम केले आहे. लोकसंपर्क असलेला नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळे आज तरुण पिढीचा पक्षाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, असे गौरवोद्गार पाटील यांनी काढले. मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार नसतानाही... ज्येष्ठ नेते यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत तो मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार नाही तर दुसरीकडे मंत्री यांच्यावरही कारखान्यात पैसे जमा केले असतानाही मनी लॉन्ड्रिंगचा ठपका ठेवला गेला आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे, असे नमूद करत पाटील यांनी ईडीच्या कारवाईवर साशंकता व्यक्त केली. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

करोना: राज्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३६ हजारांवर; 'हा' मोठा दिलासा

मुंबई: राज्यात पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या कमी होऊ लागली असून सक्रिय रुग्णांची संख्याही आता ३६ हजारांवर आली आहे. राज्यात तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत असली तरी सध्याचे चित्र मात्र दिलासादायक आहे. ( ) वाचा: राज्यात संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला. त्यानंतर आता स्थिती वेगाने सुधारत आहे. वाढता असून मृत्यूंचे प्रमाणही कमी होत आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आजच्या आकडेवारीवर नजर मारल्यास गेल्या २४ तासांत राज्यात करोनाने आणखी ४९ रुग्ण दगावले आहेत. या साथीच्या विखळ्यात सापडलेल्या १ लाख ३९ हजार ११ जणांना आतापर्यंत प्राणास मुकावे लागले आहे तर एकूण ६३,६८,५३० रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. वाचा: करोनाची आजची स्थिती: - राज्यात आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. - सध्या राज्यातील २.१२ टक्के एवढा आहे. - आतापर्यंत १ लाख ३९ हजार ११ रुग्ण करोनाने दगावले. - आज राज्यात ३ हजार १८७ नवीन रुग्णांचे निदान. - दिवसभरात ३ हजार २५३ रुग्ण बरे होऊन परतले घरी. - राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६८,५३० रुग्णांची करोनावर मात. - राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२६ टक्के एवढे झाले आहे. - आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८५,८४,८१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४७,७९३ (११.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले. - राज्यात सध्या करोनाचे ३६ हजार ६७५ . - सध्या राज्यात २,५२,३०९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

एकनाथ खडसे नेमके आहेत कुठे?; कन्या रोहिणी यांनी दिली 'ही' माहिती

जळगाव: पुण्यातील येथील भूखंड खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊस व घरावर ईडीने जप्तीची कारवाई केल्याची केवळ अफवा आहे, असे स्पष्ट करतानाच एकनाथ खडसे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत, अशी माहिती खडसे यांच्या कन्या व जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन अॅड. यांनी 'मटा'शी बोलताना दिली आहे. ( ) वाचा: भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी कडून खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. खडसे यांचे जावई यांना याप्रकरणात ईडीने अटक केलेली आहे तर खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने चौकशीचे समन्स बजावले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मंदाकिनी खडसेंनी वेळ मागून घेतला आहे. दुसरीकडे, स्वतः खडसेंची देखील या प्रकरणात चौकशी झाली आहे. वाचा: याच प्रकरणात ईडीने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील खडसेंचे फार्म हाऊस व निवासस्थान सील केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. खडसे यांना ईडीने ताब्यात घेतल्याचीही वार्ता पसरली होती. याबाबत खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी माहिती दिली असून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. या बाबी निव्वळ अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नाही. शिवाय कोणतीही जप्तीची कारवाई झालेली नाही किंवा नोटीसही आलेली नाही, अशी माहिती अॅड. रोहिणी खडसे यांनी दिली. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

नाना पटोले आक्रमक; संविधानाबाबत भाजपवर केला गंभीर आरोप

पालघर: काँग्रेसचा विचार हाच देशाला, संविधानाला व सर्व जातीधर्माच्या लोकांना तारणारा आहे. काँग्रेसला इतिहास आहे व भविष्यही आहे परंतु, भारतीय जनता पक्षाकडे इतिहासही नाही आणि भविष्यही नाही. भाजपाने देश विकायला काढला असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानही बदलण्याचा घाट घातला आहे. त्यामुळेच अशा भाजपाचे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये समूळ उच्चाटन करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष यांनी केले आहे. ( ) वाचा: जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त जिल्ह्यातील प्रचार सभेत पटोले बोलत होते. पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पालघर जिल्ह्याच्या विकासाची संकल्पना मांडून जिल्हा निर्मितीचा निर्णय घेतला. त्यासाठी जादा निधीही दिला. आजही काँग्रेस पक्ष पालघरच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची आहे. सरकारच्या काळात आदिवासींसाठी असलेली खावटी योजना जाणीवपूर्वक बंद करण्यात आली होती ती सरकारने पुन्हा सुरू केली. भाजपने गरिबांना मोफत गॅस देण्याच्या नावाखाली उज्ज्वला योजना आणली आणि रॉकेल बंद केले. आता गॅस ९०० रुपये झाला आहे आणि एवढा महाग गॅस गरिबांना परवडत नाही त्यामुळे उज्ज्वला योजना ही शोभेची वस्तू बनून राहिली आहे. यापुढे ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन आहे त्यांना बीपीएल योजनेचा फायदाही घेता येणार नाही, हा भाजपचा डाव आहे. वाचा: सामान्य जनतेला स्वाभिमानाने जगता आले पाहिजे, त्यांचे हक्क व अधिकार अबाधित राहिले पाहिजेत यासाठी काँग्रेस नेहमी आदिवासी, वंचित व सामान्य जनतेच्या पाठीशी उभी रहिलेली आहे व यापुढेही उभी राहील, असे पटोले म्हणाले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, प्रदेश सरचिटणीस विजय पाटील, प्रदेश सचिव मनिष गणोरे, पालघर जिल्हा अध्यक्ष दिवाकर पाटील, पालघर जिल्हा कार्याध्यक्ष रफीक भुरे, किसान काँग्रेसचे पराग पाष्टे, पालघरचे सहप्रभारी संतोष केणे आदी उपस्थित होते. दलित पँथरचा काँग्रेसला पाठिंबा राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी दलित पँथरने काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यातील मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची असल्याने पाठिंबा देत असल्याचे दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ यांनी पाठिंबा पत्रात म्हटले आहे. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मंत्री थोरातांचे 'ते' फ्लेक्स विखेंना खटकले; विचारला 'हा' सवाल

: अहमदनगर जिल्ह्यातील धरणाच्या कालव्यांच्या कामाने आता चांगलाच वेग घेतला आहे. तर दुसरीकडे त्याचा श्रेयवादही रंगला आहे. महसूलमंत्री यांच्यासाठी हा प्रकल्प प्रतिष्ठेचा मानला जातो. पुढील वर्षीपर्यंत प्रकल्प पूर्ण होऊन कालव्यांद्वारे पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन ते कार्यक्रमांतून देत आहेत. याच आधारे लाभक्षेत्रातील गावांत कार्यकर्त्यांनी यासंबंधी आश्वासन देणारे थोरात यांच्या सहीचे फलक लावले आहेत. यावरून थोरात यांचे विरोधक भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी टीका केली आहे. ‘काहीजण स्वत:च्या सहीचे फ्लेक्सबोर्ड लावून पुढच्या वर्षी पाणी देणार असे सांगतात. मात्र, यांचे नेमके पुढचे वर्षे कोणते?’ असा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे. ( ) वाचा: एका बाजूला कालव्यांचे काम वेगाने सुरू असताना दुसरीकडे थोरात यांच्या सहीचे फ्लेक्स लाभक्षेत्रातील गावांत झळकत आहेत. त्याची चर्चा सुरू असताना विखे पाटील यांनी या निमित्ताने थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. विखे पाटील यांनी म्हटले आहे, सहकार चळवळीचे आणि हक्काच्या पाण्याचे संरक्षण करण्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे. मात्र ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते जिल्ह्यातील तिन्ही मंत्री समन्यायी पाणी वाटप कायद्यावर गप्प बसले आहेत. निळवंडे धरणाचे कालवे निधीअभावी रखडले आहेत. या कालव्यांच्या कामासाठी अडीच ते तीन हजार कोटी रुपयांची गरज असताना, सरकारने निधीची कोणतीही तरतूद केलेली नाही. अशा परिस्थितीत आम्हीच निळवंडेचे तारणहार म्हणून काहीजण स्वत:च्या सहीचे फ्लेक्सबोर्ड लावून पुढच्या वर्षी पाणी देणार असे सांगतात. स्वत:च्या सहीचे फ्लेक्सबोर्ड लावणारे नेते दुष्काळी भागाला नेमके कोणत्या वर्षी पाणी देणार? यांचे नेमके पुढचे वर्षे कोणते? जिल्ह्यातील पाण्यावर समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत बसले आहे. वास्तविक हा कायदा रद्द करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील मंत्र्यांची आहे. निळवंडे कालव्यांच्या बाबतीत हीच परिस्थिती निर्माण झाली आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले. वाचा: जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी जिल्ह्यातील जलसंपदा विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यामध्ये निळवंडे प्रकल्पाचाही समावेश आहे. २०१४ नंतर या प्रकल्पाचे काम रखडले होते. २०१९ नंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या कामाला वेग मिळाल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

स्मशानात अघोरी पूजा: पुण्यातून ६ जणांना अटक; 'ती' मुलगी बालसुधारगृहात

सातारा: वाईतील येथील स्मशानभूमीत अल्पवयीन मुलीची अंधश्रद्धेतून अघोरी पूजा केल्याप्रकरणी २४ तासांच्या आत सहा संशयितांना पुण्यातील येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ( ) वाचा: (वय २६), नितीन लक्ष्मण चांदणे (वय ३९), विशाल बाबासाहेब चोळसे (वय ३२), (वय ५०), सुशीला नितीन चोळसे (वय ३५), केसर लक्ष्मण चांदणे (वय ५५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण पुणे हडपसर येथील बाबासाहेब आंबेडकर कमानीसमोर रामटेकडी भागातील रहिवासी आहेत. या सहा जणांना वाई न्यायालयात हजर केले असता ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सुरूर येथील स्मशानभूमीत मांत्रिकाने एका अल्पवयीन मुलीसोबत बाहेरची बाधा झाली आहे, असे सांगत अघोरी पद्धतीने पूजा केली होती. स्मशानभूमीत हळदी-कुंकवाचे गोलाकार रिंगण आखून त्याशेजारी अंडे, नारळ, लिंबू, काळी बाहुली ठेवली गेली. अल्पवयीन मुलीस केस मोकळे सोडून बसवत पूजा केली गेली. तिच्या हातात कोंबडाही देण्यात आला होता. ही बाब स्थानिक तरुण व ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी या प्रकाराला अटकाव केला होता. त्यानंतर संबंधितांनी पळ काढला होता. वाचा: याप्रकरणी विवेक चव्हाण याने पोलिसांकडे तक्रार दिली होती. या घटनेची जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी गांभीर्याने दखल घेत भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे व त्यांच्या टीमला तपासाबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक निवास मोरे, तुकाराम पवार, प्रशांत शिंदे, रविराज वर्णेकर, प्रसाद दुदुस्कर आदींचे पथक हडपसर पुणे येथे गेले. भुईंज पोलिसांनी रात्री संबंधित महिला व पुरुषांसोबत त्या मुलीलाही ताब्यात घेतले होते. संबधित मुलीची चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या मार्गदर्शनाखाली पुणे येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली तर उर्वरित संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सदर मुलीची अघोरी पद्धतीने पूजा का करण्यात आली, याचे नेमके कारण आता अटकेतील आरोपींच्या तपासातून उघड होणार आहे. पोलीस सर्वांचा कसून तपास करत आहेत. वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

अमानवी! चिमुकल्याच्या गळ्याला चाकू लावून सख्या भावांनी केला विवाहितेवर बलात्कार

: तीन महिन्‍यांच्‍या चिमुकल्याच्या गळ्याला चाकू लावून विवाहितेवर तिच्‍या घरात बलात्‍कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी अंकुश प्रेमनाथ जगधने व लहू प्रेमनाथ जगधने या सख्‍ख्‍या भावांचा नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्‍यायाधीश एस. एस. भिष्‍मा यांनी फेटाळला. या प्रकरणात २५ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, विवाहितेचा पती गॅस वेल्डिंगचे काम करतो आणि २२ ऑगस्‍ट रोजी तो कांदा लागवडीसाठी शेतात गेला होता. त्‍यावेळी घरी विवाहितेसह तिचा तीन महिन्‍यांचा मुलगा होता. दुपारी दोन वाजेच्‍या सुमारास संधी साधत विवाहितेच्या घराशेजारी राहणारे अंकुश प्रेमनाथ जगधने (३६) व लहु प्रेमनाथ जगधने (३०, दोघे रा. ता. पैठण) हे आरोपी भाऊ विवाहितेच्‍या घराच्‍या पाठीमागील दरवाज्याने घरात घुसले. तसंच विवाहितेच्‍या मुलाच्‍या गळ्याला चाकू लावून आळी-पाळीने विवाहितेवर बलात्‍कार केला. कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर विवाहितेची प्रकृती खराब झाल्याने तिच्‍या पतीने तिला माहेरी सोडले. तिथे विवाहितेच्या आईने चौकशी केली असता संबंधित घटना तिने सांगितली. या प्रकरणात बीडकीन पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल होऊन आरोपींना १० सप्‍टेंबर रोजी अटक करण्‍यात आली. त्यानंतर त्‍यांची आधी पोलीस कोठडीत व नंतर न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्ज सादर केला असता, सहाय्यक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी जामिनाला विरोध करत फिर्यादीची बाजू मांडली.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Raj Thackeray: राज्यात पूरस्थिती; राज ठाकरे यांच्या राज्य सरकारकडे 'या' महत्वाच्या मागण्या

मुंबई: मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर यांनी आढावा बैठक घेत शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील या पूरस्थितीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांनी सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. ( has demanded the state government to ) महाराष्ट्राच्या काही भागात, मुख्यत: मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला असून हातातोंडाशी आलेले पीक तर गेलेच आहे, परंतु घरादाराचेही नुकसान झालेले आहे, असे सांगतानाच ही वेळ आणीबाणीची असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 'प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत द्या' अशा वेळेस पंचनाम्याचे सोपस्कार होत राहतील, परंतु त्याआधी प्रत्येक नुकसानग्रस्त घराला आणि शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत सरकारने ताबडतोब जाहीर करावी आणि प्रत्यक्षात ती द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. आधी करोना संसर्ग आणि नंतर अतिवृष्टी यामुळे शेतकरी पार कोलमडला असल्याचे सांगत, अशावेळी निव्वळ आश्वासने आणि शब्दांपेक्षा शीघर कृतीची गरज असल्याचे ठाकरे यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- 'ओला दुष्काळ जाहीर करा' प्रशासकीय पातळीवर नंतर पंचनामे होत राहतील. त्यात शेतीच्या नुकसानीबरोबरच घरांच्या व पाळीव गुरांच्या नुकसानीचाही विचार होईल आणि रितसर मदत जाईल. परंतु, मी ज्या काहींशी बोललो त्यानुसार, तोपर्यंत वाट पाहण्याएवढी ताकद आत्ता शेतकरी बांधवांकडे नाही, ह्याचा विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. राज्यातील ही स्थिती पाहता शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी पत्रकाद्वारे राज्य शासनाकडे केली आहे. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

फीमाफीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्याला महात्मा फुले महाविद्यालयाकडून बेदम मारहाण, ABVP मुळे मिळाला न्याय

पिंपरी | कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद आहेत. पण तरीही विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी आकारण्यात येत आहे आणि त्यांच्यावर फी भरण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत आहे. जर फी भरली नाही तर रिजल्ट मिळणार नाही अशा भाषेत विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जात आहे. असेच एक प्रकरण महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथून समोर आले आहे.

या महाविद्यालयातील बी.व्हॉक विभागाच्या तिसऱ्या वर्षाच्या मुलांची पिळवणूक होत होती. त्यामुळे मुलांनी महाविद्यालयात जाऊन काही दिवसांपूर्वी यासंदर्भात आवाज उठवला होता आणि फी ५० टक्के कमी करण्याची मागणी केली होती. महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांनी फी कमी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी मंजूर केली आणि एक अर्ज करण्यास सांगितला होता.

बुधवारी काही विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे अर्ज घेऊन गेले होते पण प्राचाऱ्यांनी फी माफ करण्यात साफ नकार दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. शुभम बारोठ या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने याबाबत विचारणा केली असता प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी त्याला खूप खालच्या भाषेत उत्तरे द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘तुम्हाला शिकायचे नसेल तर कॉलेज सोडून द्या, पण फी माफ होणार नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा’.

यानंतर शुभम बारोठ याने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याचे ऐकले नाही. त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मोबाईलही काढून घेतले. शुभमकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते कारण आधीच त्याचा आईने त्याच्या फीसाठी दागिने गहाण ठेवले होते आणि फी भरली होती. कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती.

प्राचार्यांनी त्याला खूप खालच्या दर्जाची भाषा वापरल्यामुळे त्याचा खूप मनस्ताप झाला होता. मग त्याने आपला मोबाईल घेतला आणि प्राचार्यांना कॅमेऱ्यामध्ये हे सर्व बोलण्यास सांगितले पण तेव्हा ते शांत बसले आणि त्यांनी शुभमला ऑफिसमध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला व दरवाजा लावून घेतला.

त्यानंतर शुभमने दरवाजा उघडण्यासाठी त्याला धडक दिली असता त्याची काच फुटली आणि त्याचा डोक्याला आणि हाताला जबर दुखापत झाली. यानंतर तेथील कॉलेज स्टाफमधील काही १५ ते २० लोकांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तो खूप ओरडत होता पण कोणीही त्याचे ऐकले नाही आणि त्याला खूप वाईट प्रकारे मारहाण केली व शिवीगाळ केली.

एवढं सगळं झालं तरी प्राचार्यांनी त्याला दवाखान्यात नेले नाही आणि बाकीच्या मुलांनाही एका खोलीत डांबून ठेवले. तो रडत होता, ओरडत होता, त्याच्या डोक्यातून आणि हातातून रक्त वाहत होते पण त्यांनी त्याला तसंच बसवून ठेवले आणि पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी सर्व मुलांना चौकीत नेले आणि बसवून ठेवले पण महाविद्यालयावर काहीच कारवाई केली नाही.

त्यानंतर मुलांनी ABVP (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) संपर्क साधला आणि त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. शुभमला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड महानगरमंत्री प्रथमेश रत्नपारखी यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना गोळा केले आणि याच्याविरोधात आवाज उठवला.

सगळ्या मुलांनी महाविद्यालयाच्या बाहेर भर पावसात आंदोलन केले आणि प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांना माफी मागायला लावली. तसेच विद्यार्थ्यांची ५० टक्के फी माफ करावी आणि शुभमला झालेल्या दुखापतीची भरपाई द्यावी याची मागणी केली. यावेळी महाविद्यालयाच्या जनरल बॉडी सदस्य आणि नगरसेवक सांजोग वाघेरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे वचन दिले व ज्या लोकांनी शुभमला मारहाण केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे प्रथमेश रत्नपारखी, पुणे विभाग संगठन मंत्री रोहित राऊत, महानगर संघटन मंत्री अशोक सैनी, गौरव वाळुंजकर, ऋत्विक देशपांडे, शुभम पोरे, संभाजी शेंडगे, अरविंद नागवी या कार्यकर्त्यांनी या भोंगळ कारभाराच्या विरोधात आवाज उठवला आणि महाविद्यालयावर व प्राचार्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी आवाज उठवल्यामुळे शुभमला न्याय मिळाला आणि सध्या त्याच्यावर वायसीएममध्ये उपचार सुरू आहेत.

प्रथमेश रत्नपारखी(ABVP) – 77739 98933

शुभम बारोठ – +91 97675 23282

महत्वाच्या बातम्या
बिग बॉस 15: रिया चक्रवर्तीवर बिग बॉस निर्माते करणार पैशांचा वर्षाव; एका आठवड्यासाठी 35 लाख रुपये मोजणार
माझी मुलं देखील मला किंमत देत नाहीत, माझ्याकडे दुर्लक्ष करतात; माधुरी झाली भावनिक
अंडरवेअरच्या जाहिरातीवरून Rashmika Mandanna संतापले लोकं, वाचा काय आहे प्रकरण..

बापरे! शेजाऱ्यांसोबत भांडण झाल्याने महिलेचा राग अनावर; रागात केले असे काही की पोलिसांना बसला धक्का…

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

bhujbal vs kande: भाई युनिर्व्हसिटीचा मी कधीच विद्यार्थी नव्हतो’,भाईगिरीवरून कांदे ,भुजबळ यांच्यात जुंपली, भाई युनिर्व्हसिटीचा प्राचार्य कोण याचा खुलासा कांदे उद्या करणार

म.टा.विशेष प्रतिनिधी,नाशिक जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून शिवसेना (MLA Suhas Kande) आणि पालकमंत्री छगन भुजबळांमधील (Chhagan Bhujbal) वाद आता ‘भाई’गिरीपर्यंत पोहचला आहे. आमदार कांदे यांनी अंडरवर्ल्ड कडून धमकी आल्याचा आरोप केल्यानंतर ‘मी कधीच भाई युनिर्व्हसिटीत गेलो नाही,अन या भाई युनिर्व्हसिटीचा मी कधीच विद्यार्थी नव्हतो’, जे भाई युनिर्व्हसिटीचे विद्यार्थी असतील त्यांची आपआपसात चर्चा होत असेल’ असा टोला भुजबळ यांनी कांदेना लगावला आहे. भुजबळांवर आरोप करून काहीजणांना प्रसिद्धी मिळते असे सांगत,अभय निकाळजेने केलेल्या खुलाशाकडेही भुजबळांनी अंगुलीनिर्देश करत,५० वर्षाची तपश्चर्या पुलाखालून वाहून जाते की काय, असे वाटायला लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. (minister criticizes ) भुजबळ आणि कांदे यांच्यात झालेल्या वादासंदर्भात नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतांना भुजबळ यांनी या वादावर प्रथमच थेट भाष्य केले आहे. भुजबळांविरोधातील खटला मागे घेण्यासाठी आपल्याला थेट छोटा राजन टोळीकडून धमक्या आल्याचा लेखी आरोप आमदार कांदेनी केला आहे. तर कांदेचे आरोप छोटा राजनचा पुतण्या अभय निकाळजे यांनी फेटाळून लावत, बुधवारी उलट कांदेनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. क्लिक करा आणि वाचा- प्रसिद्धीसाठीच काही लोकांचे उद्योग- भुजबळ त्यांसदर्भात विचारले असता भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत कांदेचा समाचार घेतला आहे. भुजबळांचे नाव घेतले की, प्रसिध्दी मिळते याकरीता काही लोक असा उद्योग करत असावेत. आमदार कांदे यांनी जे आरोप माझ्यावर लावले आहेत त्याबाबत चौकशीची मागणी मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. उगाचच खोटे आरोप लावून भुजबळांना बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. ज्या धमकीबाबत कांदेंनी तक्रार केली आहे तो प्रकार घोटी टोलनाक्यावर कांदे समर्थकांनी एका दांम्प्तयाच्या मारहाण प्रकरणाशी संबधित आहे याचा माझ्याशी कोणताही संबध नाही असा खुलासा भुजबळांनी केला आहे.या प्रकरणाचे सर्व रेकॉर्ड तपासावेत अशी मागणीही भुजबळांनी करत,कांदेनाच आता प्रतीआव्हान दिले आहे. क्लिक करा आणि वाचा- कोण प्राचार्य उद्या सांगतो - कांदे दरम्यान अभय निकाळजे आणि भुजबळ यांनी केलेल्या आरोपासंदर्भात बोलतांना कांदेनी भुजबळांवर पलटवार केला आहे.मी मुंबईत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली असून त्यांना पुरावे सादर केले आहेत.तसेच कोण भाई भाई युनिर्व्हसिटीचा प्राचार्य आणि कोण विद्यार्थी याचे पुरावेच मी गुरूवारी (३०) नाशिकच्या जनतेसमोर पत्रकार परिषद घेवून सांगणार आहे.धमकीबाबत मी तक्रार केली असून पोलिस त्याचा खरेखोटेपणा शोधतील. गुन्हा केला आहे,हे आरोपी कधीच मान्य करत नाही,ते तपासात समोर येईल असे सांगत,भुजबळांना त्यांच्या प्रश्नांची सगळी उत्तरे दिली जातील असे आव्हान कांदेनी दिले आहे. क्लिक करा आणि वाचा-

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मनोहर पर्रीकरांनी मदत करणाऱ्या मोदींची अवैध बांधकाम उद्धवस्त केली होती…

मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रिकर. अर्थात गोयंकरांचो भाई. साधेपणा आणि प्रामाणिकपणा ही पर्रिकरांची पहिली ओळख आणि गोव्याचे आयआयटीयन मुख्यमंत्री अशी त्यांची दुसरी ओळख. आपल्या साधेपणामुळे सहज कधी तरी ते मुख्यमंत्री असताना देखील स्कुटरवरुन जाताना दिसायचे. तर आपल्या प्रामाणिकपणामुळे ते कधी बँकेत कर्जासाठी मुलाखत देखील द्यायला जायचे.

त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा या गोष्टी केवळ दिखावा नव्हत्या तर त्या त्यांच्या जगण्याचा भाग होत्या.

या सगळ्या दरम्यान पर्रीकरांना निरनिराळ्या मार्गांनी लाच देऊन त्यांची प्रतिमा डागाळण्याचेही अनेक प्रयत्न झाले पण पर्रीकर कशालाच बधले नाहीत.

त्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि तत्वनिष्ठ राजकारणाचा किस्सा गोवेकर आजही सांगतात.   

मनोहर पर्रीकरांच्या धाकट्या मुलाला एकदा स्ट्रोक्सचा प्रचंड त्रास सुरू झाला. जीव वाचवायचा असेल तर तातडीने मुंबईला न्यायला हवं असं डॉक्टरांनी सांगितलं.

त्यावेळी मोदी नावाच्या एका उद्योगपतीने पर्रिकरांना मदत केली. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये माणूसकीच्या नात्याने मदत करत आहे म्हंटल्यावर पर्रिकरांनी देखील ती मदत स्विकारली. स्पेशल विमानाने मुलाला मुंबईला नेण्यात आलं. मात्र विमानातुन नेताना रुग्णाला स्ट्रेचरवरून न्यायचं असल्यामुळे विमानातील सहा सीटस् काढण्यात आल्या होत्या. ऐनवेळी त्यांचे पैसे मोदींने भरले. पर्रीकरांच्या मुलाचा जीव वाचला.

मात्र या मोदींनी वेगळाच उद्देश डोक्यात ठेवून पर्रिकरांना मदत देवू केली होती.

मोदींचे गोव्याच्या मांडवी नदीत अनेक कॅसिनो आहेत आणि तिथे त्यांनी काही अवैध बांधकामे केली होती. ती बांधकामे पाडण्याचे आदेश पर्रीकरांनी दिले होते. मात्र आता आपल्यामुळे पर्रीकरांच्या मुलाचा जीव वाचला आहे. त्यामुळे हा आदेश ते रद्द करतील अशा खात्रीने मोदी त्यांना पर्रिकरांना भेटायला गेले.

झालं, इकडे कॉंग्रेसला याची कुणकुण लागली आणि आता पर्रीकर जाळ्यात सापडणार असं त्यांना वाटू लागलं. पण झालं उलटंच. पर्रीकरांनी मोदींना स्पष्ट सांगितले की,

एक बाप या नात्याने मी तुमचे आभार मानतो पण मुख्यमंत्री म्हणून मी माझा निर्णय बदलणार नाही.

पर्रिकरांना बेकायदेशीर कामांची चीड तर होतीच. शिवाय अशा माणसाची आपण मदत घेतली याबद्दल त्यांना स्वतःचाच राग आला होता. पण त्या संध्याकाळीच मुख्यमंत्री कार्यालयातुन आदेश सुटले आणि मोदींची सर्व अवैध बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आली. एवढंच नव्हे तर पर्रिकरांनी त्या सहा सीटच्या भाड्याचे पैसे देखील मोदींना देऊन टाकले.

हे हि वाच भिडू. 

The post मनोहर पर्रीकरांनी मदत करणाऱ्या मोदींची अवैध बांधकाम उद्धवस्त केली होती… appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मराठीमधलं पहिलं छापील पुस्तक कोणतं होतं आणि कुठं छापलेलं माहीत आहे ?

भगवद्गीता म्हणजे जीवनाचं सार सांगणारा ग्रंथ. हा ग्रंथ पूर्वी देवनागरीत नव्हता पण सांगलीतल्या मिरजेमध्ये पहिल्यांदा देवनागरी भाषेत हा ग्रंथ मुद्रित करण्यात आला. तर जाणून घेऊया या मुद्रणकलेचा इतिहास आणि मिरजेतल्या देवनागरीमध्ये छापलेल्या भगवद्गीतेचा. 

महाराष्ट्रातला सांगली जिल्हा हा कलावंतांची भूमी म्हणून ओळखला जातो. पण याच सांगलीत मुद्रणकलेचा सुद्धा इतिहास आहे. सांगली जिल्ह्यातील मुद्रणकलेला २१० वर्षांचा इतिहास आहे. १८२१ साली सांगलीत चिंतामणराव पटवर्धनांच्या प्रयत्नांनी छापखाना सुरू करण्यात आला. यात धर्मग्रंथ तसेच वैद्यकीय ग्रंथ इ. छापण्यात आले होते. १८८१, १८८३ व १८९५ साली अनुक्रमे तासगाव, इस्लामपूर व तासगाव येथे अनेक वर्तमानपत्रे व मासिके छापणे सुरू झाले. १८८० सालापासून सांगली जिल्ह्यात मुद्रणकला अधिक विकसित झाली.

पूर्वीच्या काळात ही गीता हस्तलिखीत स्वरूपात होती. नंतर मुद्रणकलेचा शोध लागल्यानंतर ती अनेक भाषेत मुद्रित झाली. पूर्वी रोमन लिपीत असणारी ही गीता १८०५ मध्ये देवनागरी भाषेत मुद्रित झाली. पहिली देवनागरी भाषेतील मुद्रित गीतेची प्रत मिरजेत असून त्याला तब्बल २१५ वर्षे झाली आहेत. 

या भगवद्‌गीतेच्या शेवटच्या पानावर मुद्रणाच्या स्थळ काळाचा उल्लेख केला आहे. देशातील पहिले देवनागरी मुद्रण १८०५ मध्ये मिरज येथे झाले. या पहिल्या मुद्रणाने जिल्ह्यात मुद्रणकलेची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर जिल्ह्यात विविध भागात मुद्रणालये स्थापित झाली. भारतीय मुद्रण कलेचा अमूल्य ठेवा असणाऱ्या या ग्रंथाच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रासह जर्मनी, जापान, फ्रान्स, अमेरिका या भागातून अभ्यासक भेट देतात. मिरज इतिहास संशोधन मंडळाकडे असलेली ही दुर्मिळ प्रत यापुढेही वर्षानुवर्षे जपण्याची गरज आहे.

ही गीता १६६ पानांची असून शेवटच्या पानावर मुद्रणाच्या स्थळ काळाचा उल्लेख केला आहे. मिरजेचा उल्लेख मार्कंडेय मुनीक्षेत्रे  असा केला असून शके १७२७ क्रोधननाम संवत्सरे असा कालोल्लेख आहे. शके १७२७ म्हणजे इसवी सन १८०५ होते. दोनशे वर्षापेक्षा अधिक काळ हा अमूल्य ठेवा मिरजेत जपून ठेवला आहे.

संशोधक मानसिंग कुमठेकर हे म्हणतात की, मिरज संशोधन मंडळाकडे असलेली गीतेची ही भारतातील देवनागरी लिपीतील पहिली प्रत आहे. हा राष्ट्रीय ठेवा आहे. जगभरातील अनेक संशोधक ही प्रत पाहण्यासाठी येतात. यापुढेही अभ्यासकांना ती उपयोगी पडणार आहे. 

इसवीसन १८०५ मध्ये बंगालमध्ये श्रीरामपूर येथे विल्यम कॅरे याने देवनागरी लिपीमध्ये ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज प्रसिद्ध केले होते. याच वर्षी पुणे येथे सवाई माधवरावांच्या दरबारात असलेला इंग्रज वकील चार्लस् मॅलेट याने येथील एका तांबट कारागिराला तांब्याच्या पत्र्यावर मुद्रण करण्यास शिकविले. त्याच्याकडून त्याचवर्षी देवनागरी लिपीतून छपाईस प्रारंभ होणार होता.

हे समजल्यावर या कारागिराला मिरजेचे तत्कालीन संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन उर्फ पहिले बाळासाहेब यांनी मिरजेत बोलावून घेतले. त्याच्याकडून देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ म्हणून भगवद्गीतेची छपाई करवून घेतली. एकप्रकारे १८०५ मध्येच छपाई झालेला हा ग्रंथही देवनागरीतील पहिला मुद्रित ग्रंथ ठरला. 

मिरजमध्ये १८०५ मध्ये  श्रावण महिन्यामध्ये ब्राह्मण भिक्षुकांना दान देण्यासाठी १०० प्रती छापल्या होत्या. त्यातील ९९ प्रती नष्ट झाल्या आहेत. ( त्या प्रती कुठे आहेत त्याची कल्पना कुणालाच नाही ). त्या १०० प्रतींपैकी शेवटची भगवद्‌गीतेची प्रत सध्या मिरज इतिहास संशोधन मंडळाकडे आहे.

हे हि वाच भिडू :

The post मराठीमधलं पहिलं छापील पुस्तक कोणतं होतं आणि कुठं छापलेलं माहीत आहे ? appeared first on BolBhidu.com.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

तुमच्या मुलांना माझ्या पक्षात पाठवा, मी त्यांना मंत्री करतो : जानकर

सातारा: तुमच्या मुलांना शिक्षण देऊन उच्चपदस्थ अधिकारी करता आले नाही, तर माझ्या पक्षामध्ये पाठवा मी तुमच्या मुलांना मंत्री करतो असे वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे.

रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर एका कार्यक्रमासाठी दहिवडीत आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब जगदाळे, सुवर्णा देसाई, अरुण गोरे, माण पंचायत समितीच्या सभापती लतिका वीरकर, उपसभापती नितीन राजगे इतर मान्यवर उपस्थित होते.

शेतकऱ्याच्या पोरांनी शेतकरीच का बनावं? असा प्रश्न उपस्थित करत माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले शेतकऱ्याच्या मुलाने पंतप्रधान, उद्योगपती आणि राज्यकर्ते देखील व्हावे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी हे दोन्ही आपलेच असतील तर दोन्ही चाके व्यवस्थित चालतील. क्लार्क नको कलेक्टर पाहिजे, पोलीस नको कमिशनर पाहिजे आणि सरपंच नको खासदार पाहिजे आणि यासाठी प्रयत्न व्हावेत असे वक्तव्य महादेव जानकर यांनी गोंदवले येथील एका कार्यक्रमामध्ये केले.

पुढे बोलताना महादेव जानकर म्हणाले, इंजिनीरिंग मध्ये मी देशामध्ये तिसरा क्रमांक मिळवला होता, मला 95 टक्के गुण मिळाले होते. मी जर राजकारणामध्ये आलो नसतो तर कमिशनर होऊन या कार्यक्रमाला आलो असतो. राजकारण फार वाईट असते असा एक समज निर्माण झाला आहे परंतु जर राजकारण वाईट असते तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या नसत्या. असे देखील जानकर म्हणाले.

शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या खासदार झाल्या नसत्या. कै. गोपीनाथ मुंडे यांच्या तिन्ही मुली मंत्री झाल्या नसत्या. राजकारणामध्ये सुद्धा संधी आहे. राजकारणाकडे संधी म्हणून पहा. मोठमोठ्या उद्योजकांना कोणी सलाम करत नाही परंतु राजकारण्यांना सॅल्युट केला जातो. ही राजकारणाची ताकद आहे असे जानकर म्हणाले.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

परळीकरांच्या जंगी स्वागताने जयंत पाटील भावूक; म्हणाले माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती…

बीड। राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या तिसऱ्या पर्व सुरू झालं आहे. ही यात्रा काल (मंगळवारी) बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात आली असता जयंत पाटील यांनी परळी मतदारसंघात बैठक घेतली, मात्र कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या बैठकीचे मेळाव्यात रूपांतर झाल्याचा उल्लेखही त्यांनी केला व ते भावुक झाले.

धनंजय मुंडे प्रथम मंत्री झाल्यानंतर परळीकरांनी ज्या जल्लोषात त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले होते, अगदी त्याच जल्लोष व धो धो पडत असलेल्या पावसात प्रचंड उत्साहात परळी मतदारसंघातील प्रत्येक गावात व शहरातील रस्त्यांवर जागोजागी जयंत पाटील यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले.

“माझ्या लग्नात एवढी मोठी वरात कोणी माझी काढली नव्हती” अशी टिप्पणी करत जयंत पाटलांनी यावेळी परळीतील कार्यकर्त्यांचे आभार मानले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच जयंत पाटील यांनी बीड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा उल्लेख केला.

बीड जिल्ह्यातील नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार भक्कमपणे उभे आहे. राज्य सरकार, प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांच्या आधारे नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत करण्याचे असं आश्वासनही जयंत पाटील यांनी दिले.

तसेच धनंजय मुंडे यांच कौतुकदेखील केलं आहे. येत्या काही वर्षात परळी मतदारसंघाचा त्यांच्या हातून बारामतीसारखा विकास होईल, त्यासाठी परळीकरांनी कायम पाठीशी राहून आपल्या धनुभाऊंना पाठबळ द्यावं असे आवाहन त्यांनी केले.

तसेच धनंजय मुंडे हे अत्यंत प्रतिभावान नेते आहेत, पुढील काळात परळी मतदारसंघासह राज्यभरात त्यांच्या हातून मोठे विकासकार्य होणे अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. परळी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी परिपूर्ण असून इथे आढावा घेण्याची गरजच नाही. इथे पक्ष संघटना अगदी परिपूर्ण आहे.

पक्षाच्या आढावा बैठकीच्या बाबतीत धनुभाऊ आणि त्यांची टीम ‘पास’ झाली, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मोठ्या होणाऱ्या प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या टीका करून त्याची उंची कमी करण्याचे प्रयत्न केले जातात.

आमच्या धनु भाऊंवर देखील असेच आरोप करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु मी कायम त्यांच्या पाठीशी आहे. माझं त्यांच्यावर लहान भावाप्रमाणे प्रेम आहे व ते कायम राहील, असा विश्वास देत पाटील यांनी धनंजय मुंडेची पाठराखण केली. तसेच धनंजय भाऊ आपल्या लहान भावाप्रमाणे असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमाला अनेक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

मोठा धमाका! काँग्रेसच्या कॅप्टनला भाजप देणार केंद्रात कृषिमंत्र्याची जागा?

हार्दीक पांड्याच्या शानदार खेळीने मुंबई इंडीयन्सचा विजय; प्ले आॅफच्या आशा जिवंत

इन्कम टॅक्सच्या रेडनंतर सोनूच्या मदतीला एकही बाॅलीवूड स्टार का नाही आला? सोनूने सांगितले खरे कारण

राम कृष्ण हरी! ताजोद्दिन महाराजांनी भर किर्तनात प्राण सोडले, व्हिडीओ पाहून अवघा महाराष्ट्र रडला

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

मोठा धमाका! काँग्रेसच्या कॅप्टनला भाजप देणार केंद्रात कृषिमंत्र्याची जागा?

नवी दिल्ली। सध्या पंजाबच्या राजकारणात मोठा गोंधळ उडाला असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अचानक राजीनामा दिल्याने पंजाबमधील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली. तर आता सर्वत्र कॅप्टन अमरिंदर सिंग हे काँग्रेसला धक्का देणार असल्याची चर्चा सुरू आहे.

त्यामुळे आता पंजाबच्या राजकीय वर्तुळात धमाका होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काल (सोमवारी) ते दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. मात्र त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असूनत्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचे, सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अमरिंदर सिंग यांना केंद्रीय मंत्रिपदात स्थान मिळणार का याकडे आहे. केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांना सर्वाधिक विरोध पंजाबमधून होत आहे. कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत.

दरम्यान अमरिंदरसिंग यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाईल. त्यांच्याकडे कृषी मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान देशभरात भाजपाचा झंझावात सुरु असताना एकहाती पंजाबची सत्ता खेचून आणणाऱ्या कॅप्टन अमरिंदर सिंगांना काँग्रेसने मुख्यमंत्री पदावरून काढून टाकले.

त्यामुळे नवज्योत सिंह सिद्धूच्या खेळीवर आऊट झालेले कॅप्टन आता षटकार मारण्याचा प्रयत्नात असल्याचं सांगितलं जातं आहे. सिद्धूसोबत झालेल्या वादानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.

पक्षाचा आपल्यावर विश्वास नसल्याने आपला आपमान झाल्याचे म्हणत त्यांनी राजीनामा दिला होता.
कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले होते की, ”सिद्धूला मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्यासाठी आपण काहीही त्याग करण्यास तयार आहोत”.

पुढील विधानसभेच्या निवडणुकीत सिद्धू विरुद्ध एक दमदार उमेदवार उभा करेन. जर पंजाबमध्ये नवज्योत सिंह सिद्धू मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील तर काँग्रेस दोन जागाही जिंकेल तरी ती मोठी गोष्ट असेल. असा टोला त्यांनी लगावला होता.

अशातच कॅप्टन भाजपमध्ये आल्यास राज्यात विस्तार करण्यास पक्षाला मोठा वाव मिळेल. याचबरोबर त्यांनी केंद्रात कृषी मंत्रिपद दिल्यास पंजाबमधील शेतकऱ्यांच्या विरोधाची धारही काहीशी कमी होईल, असा भाजपचा कयास आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

पाकीस्तानी क्रिकेटर इंझमामला हार्टॲटॅक! सचिन तेंडूलकरची त्याच्यासाठी भावूक पोस्ट

मुंबई। पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक याला काल (मंगळवारी) हृदयविकाराचा झटका आला आहे. व त्यानंतर त्याला सोमवारी सायंकाळी तातडीने लाहोरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. इंझमाम-उल-हकची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली आहे.

इंझमामला गेल्या तीन दिवसांपासून छातीतील दुखण्याचा त्रास होत होता. व त्यानंतर त्याला सोमवारी हृदयविकाराचा झटका आला. इंझमामची प्रकृती सध्या स्थिर असून संपूर्ण देश तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहे. तसेच इंझमाम लवकर ठणठणीत व्हावा यासाठी क्रिकेटविश्वातून अनेक खेळाडूंनी इंझमामसाठी प्रार्थना केली.

दरम्यान भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही इंझमामसाठी प्रार्थना करून एक पोस्ट केलीय जी सध्या सर्वत्र व्हायरल होतेय. इंझमाम तू नेहमीच शांत, स्पर्धक आणि मैदानातील लढवय्या राहिला आहेस. या कठिण प्रसंगाला समर्थपणे तोंडू देऊन तू लवकरच बाहेर येथील, अशी आशा आहे, असे ट्विट सचिन तेंडूलकरने आपल्या क्रिकेट विश्वातील जुना खेळाडू सहकारी असलेल्या इंझमामबद्दल केले आहे.

इंझमामच्या करकीर्दीबद्दल बोलायचं झालचं तर क्रिकेट कारकिर्दीत ३७५ एकदिवसीय आणि ११९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

त्यावर्षी टी२० विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब प्रदर्शनानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता. याच काळात पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रशिक्षक बाॅब वूल्मर यांची हत्या करण्यात आली होती.

ईएसपीएन आणि क्रिकइन्फोने इंझमामाच्या ह्रदयविकाराच्या झटक्याबाबतचे वृत्त दिले. इंझमामला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्या जवळच्या मित्रांनी सांगितले, की सध्या इंझमामची प्रकृती स्थिर आहे.

इंझमामला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थीर असल्याचे इंझमामच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. त्यामुळे तो आता लवकर भरा व्हावा यासाठी सर्वच प्रार्थना करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक असणाऱ्या ताजूद्दीनबाबांवर अंतसंस्कार; किर्तनातच ठेवला होता देह

Flipkart sale : Realme, Vivo, Samsung आणि Iphone वर 10 हजारापर्यंत सूट

शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार; हसन मुश्रीफांची मोठी घोषणा

अंबेमातेचा आशीर्वाद घेतलाय आता महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार; किरीट सोमय्या कडाडले

Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक असणाऱ्या ताजूद्दीनबाबांवर अंतसंस्कार; किर्तनातच ठेवला होता देह

औरंगाबाद । हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले ह.भ.प. ताजुद्दीन महाराज शेख यांचे निधन झाले आहे. यामुळे त्यांच्या भक्तांना मोठा धक्का बसला आहे. कीर्तन सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी ते खाली पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचे निधन झाले होते.

आयुष्यभर त्यांनी हिंदू मुस्लिम समाजातील दरी मिटवण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी कीर्तने केली. त्यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती. त्यांच्या या आवडीमुळे त्यांना आणि कुटुंबाला त्रास ही सहन करावा लागल्याचे बालले जाते. मात्र त्यांनी त्यांचे काम आयुष्यभर सुरूच ठेवले.

राज्यासह देशात ताजुद्दीन महाराज हे कीर्तन-प्रवचनासाठी वलयांकित नाव झाले होत. त्यांचा गीता कुराणाचाही गाढा अभ्यास असून त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी वारकरी गर्दी करतानाही पहायला मिळाययचे. हिंदू- मुस्लीम धर्मामधील द्वेषाची दरी ही केवळ परस्परांची भाषा येत नसल्यामुळे अधिकच रुंदावल्याचे महाराज नेहमी सांगत.

मुस्लीमांना संस्कृत आणि हिंदूंना उर्दू-अरबी भाषा आल्यानंतर गीतेतील ही दरी कमी होईल. असा विश्वास महाराजांना वाटायचा. मूळचे घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थजवळील बोधलापुरी हे त्यांचे गाव होते. त्यांनी पैठणमध्येही एक आश्रम काढून त्यातून वारकरी सांप्रदायाचा प्रसार प्रचाराचे काम केले.

ताजोद्दीन महाराजांनी आजवर हजारो कीर्तने केली. दोन वर्षांपूर्वी आपल्याला कीर्तन करतानाच मृत्यू यावा असे एका कीर्तनादरम्यान त्यांनी म्हटले होते, आणि आता तसेच घडले आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

काल त्यांचे कीर्तन सुरू होते, त्यांच्या या कीर्तनाला नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते स्टेजवर खाली बसले. काही जण आपल्या मोबाइलमध्ये कीर्तन शूट करत होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.