हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक असणाऱ्या ताजूद्दीनबाबांवर अंतसंस्कार; किर्तनातच ठेवला होता देह

September 29, 2021 , 0 Comments

औरंगाबाद । हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले ह.भ.प. ताजुद्दीन महाराज शेख यांचे निधन झाले आहे. यामुळे त्यांच्या भक्तांना मोठा धक्का बसला आहे. कीर्तन सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यावेळी ते खाली पडले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचे निधन झाले होते.

आयुष्यभर त्यांनी हिंदू मुस्लिम समाजातील दरी मिटवण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी त्यांनी कीर्तने केली. त्यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती. त्यांच्या या आवडीमुळे त्यांना आणि कुटुंबाला त्रास ही सहन करावा लागल्याचे बालले जाते. मात्र त्यांनी त्यांचे काम आयुष्यभर सुरूच ठेवले.

राज्यासह देशात ताजुद्दीन महाराज हे कीर्तन-प्रवचनासाठी वलयांकित नाव झाले होत. त्यांचा गीता कुराणाचाही गाढा अभ्यास असून त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी वारकरी गर्दी करतानाही पहायला मिळाययचे. हिंदू- मुस्लीम धर्मामधील द्वेषाची दरी ही केवळ परस्परांची भाषा येत नसल्यामुळे अधिकच रुंदावल्याचे महाराज नेहमी सांगत.

मुस्लीमांना संस्कृत आणि हिंदूंना उर्दू-अरबी भाषा आल्यानंतर गीतेतील ही दरी कमी होईल. असा विश्वास महाराजांना वाटायचा. मूळचे घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थजवळील बोधलापुरी हे त्यांचे गाव होते. त्यांनी पैठणमध्येही एक आश्रम काढून त्यातून वारकरी सांप्रदायाचा प्रसार प्रचाराचे काम केले.

ताजोद्दीन महाराजांनी आजवर हजारो कीर्तने केली. दोन वर्षांपूर्वी आपल्याला कीर्तन करतानाच मृत्यू यावा असे एका कीर्तनादरम्यान त्यांनी म्हटले होते, आणि आता तसेच घडले आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे.

काल त्यांचे कीर्तन सुरू होते, त्यांच्या या कीर्तनाला नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते स्टेजवर खाली बसले. काही जण आपल्या मोबाइलमध्ये कीर्तन शूट करत होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: