फीमाफीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्याला महात्मा फुले महाविद्यालयाकडून बेदम मारहाण, ABVP मुळे मिळाला न्याय

September 30, 2021 , 0 Comments

पिंपरी | कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद आहेत. पण तरीही विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी आकारण्यात येत आहे आणि त्यांच्यावर फी भरण्यासाठी जबरदस्ती करण्यात येत आहे. जर फी भरली नाही तर रिजल्ट मिळणार नाही अशा भाषेत विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जात आहे. असेच एक प्रकरण महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथून समोर आले आहे.

या महाविद्यालयातील बी.व्हॉक विभागाच्या तिसऱ्या वर्षाच्या मुलांची पिळवणूक होत होती. त्यामुळे मुलांनी महाविद्यालयात जाऊन काही दिवसांपूर्वी यासंदर्भात आवाज उठवला होता आणि फी ५० टक्के कमी करण्याची मागणी केली होती. महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांनी फी कमी करण्याची विद्यार्थ्यांची मागणी मंजूर केली आणि एक अर्ज करण्यास सांगितला होता.

बुधवारी काही विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे अर्ज घेऊन गेले होते पण प्राचाऱ्यांनी फी माफ करण्यात साफ नकार दिला. त्यांनी विद्यार्थ्यांना उडवा उडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. शुभम बारोठ या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने याबाबत विचारणा केली असता प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी त्याला खूप खालच्या भाषेत उत्तरे द्यायला सुरुवात केली. ते म्हणाले की, ‘तुम्हाला शिकायचे नसेल तर कॉलेज सोडून द्या, पण फी माफ होणार नाही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा’.

यानंतर शुभम बारोठ याने त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याचे ऐकले नाही. त्यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे मोबाईलही काढून घेतले. शुभमकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते कारण आधीच त्याचा आईने त्याच्या फीसाठी दागिने गहाण ठेवले होते आणि फी भरली होती. कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती.

प्राचार्यांनी त्याला खूप खालच्या दर्जाची भाषा वापरल्यामुळे त्याचा खूप मनस्ताप झाला होता. मग त्याने आपला मोबाईल घेतला आणि प्राचार्यांना कॅमेऱ्यामध्ये हे सर्व बोलण्यास सांगितले पण तेव्हा ते शांत बसले आणि त्यांनी शुभमला ऑफिसमध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला व दरवाजा लावून घेतला.

त्यानंतर शुभमने दरवाजा उघडण्यासाठी त्याला धडक दिली असता त्याची काच फुटली आणि त्याचा डोक्याला आणि हाताला जबर दुखापत झाली. यानंतर तेथील कॉलेज स्टाफमधील काही १५ ते २० लोकांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तो खूप ओरडत होता पण कोणीही त्याचे ऐकले नाही आणि त्याला खूप वाईट प्रकारे मारहाण केली व शिवीगाळ केली.

एवढं सगळं झालं तरी प्राचार्यांनी त्याला दवाखान्यात नेले नाही आणि बाकीच्या मुलांनाही एका खोलीत डांबून ठेवले. तो रडत होता, ओरडत होता, त्याच्या डोक्यातून आणि हातातून रक्त वाहत होते पण त्यांनी त्याला तसंच बसवून ठेवले आणि पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी सर्व मुलांना चौकीत नेले आणि बसवून ठेवले पण महाविद्यालयावर काहीच कारवाई केली नाही.

त्यानंतर मुलांनी ABVP (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) संपर्क साधला आणि त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. शुभमला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आणि त्याच्यावर योग्य उपचार करण्यात आले. त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पिंपरी चिंचवड महानगरमंत्री प्रथमेश रत्नपारखी यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना गोळा केले आणि याच्याविरोधात आवाज उठवला.

सगळ्या मुलांनी महाविद्यालयाच्या बाहेर भर पावसात आंदोलन केले आणि प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांना माफी मागायला लावली. तसेच विद्यार्थ्यांची ५० टक्के फी माफ करावी आणि शुभमला झालेल्या दुखापतीची भरपाई द्यावी याची मागणी केली. यावेळी महाविद्यालयाच्या जनरल बॉडी सदस्य आणि नगरसेवक सांजोग वाघेरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे वचन दिले व ज्या लोकांनी शुभमला मारहाण केली आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचे प्रथमेश रत्नपारखी, पुणे विभाग संगठन मंत्री रोहित राऊत, महानगर संघटन मंत्री अशोक सैनी, गौरव वाळुंजकर, ऋत्विक देशपांडे, शुभम पोरे, संभाजी शेंडगे, अरविंद नागवी या कार्यकर्त्यांनी या भोंगळ कारभाराच्या विरोधात आवाज उठवला आणि महाविद्यालयावर व प्राचार्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी आवाज उठवल्यामुळे शुभमला न्याय मिळाला आणि सध्या त्याच्यावर वायसीएममध्ये उपचार सुरू आहेत.

प्रथमेश रत्नपारखी(ABVP) – 77739 98933

शुभम बारोठ – +91 97675 23282

महत्वाच्या बातम्या
बिग बॉस 15: रिया चक्रवर्तीवर बिग बॉस निर्माते करणार पैशांचा वर्षाव; एका आठवड्यासाठी 35 लाख रुपये मोजणार
माझी मुलं देखील मला किंमत देत नाहीत, माझ्याकडे दुर्लक्ष करतात; माधुरी झाली भावनिक
अंडरवेअरच्या जाहिरातीवरून Rashmika Mandanna संतापले लोकं, वाचा काय आहे प्रकरण..

बापरे! शेजाऱ्यांसोबत भांडण झाल्याने महिलेचा राग अनावर; रागात केले असे काही की पोलिसांना बसला धक्का…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: