गॅसमुळे पोट फुगल्याचे सांगत नवऱ्याला फसवत होती बायको; तपासणी केली असता नवऱ्याला बसला जबर धक्का

August 27, 2021 , 0 Comments

लग्नानंतर एखादी महिला आई होणे ही सामान्य गोष्ट आहे, पण महिला जर लग्नाआधीच आई झाली तर मात्र गोंधळ उडतो. पण उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक विचित्रच घटना समोर आली,

गाझियाबादमधील एक महिला लग्नानंतर काही महिन्यातच आई बनली आहे. लग्नानंतर काही दिवसातच पत्नीचे पोट दिसत असल्यामुळे पतीला आपल्या पत्नीवर संशय आला. त्यावर तिने गॅसमुळे पोट फुगले म्हणत पतीला गंडवले. मात्र अल्ट्रासाऊंडमध्ये तिची पोलखोल झाली आहे.

१८ मार्चला लोहियानगरमध्ये राहणाऱ्या एका मुलीचे लग्न मोहननगरमधील एका तरुणासोबत लावण्यात आले होते. लग्नाच्या काही दिवसानंतरच पत्नीचे पोट दिसायला लागले. पतीने विचारले तेव्हा ती गॅसमुळे पोट फुगल्याचे सांगत राहिली. त्यामुळे पतीनेही दुर्लक्ष केलं होतं.

एका महिन्यातच पत्नीने सांगितले की ती गर्भवती आहे. त्यामुळे पती खुप खुश झाला. कोरोनामुळे तो डॉक्टरांना व्हिडिओ कॉलवरुनच औषध विचारुन पत्नीला देत होता. असे असताना २५ जूनला डॉक्टरांनी महिलेला तपासणीसाठी बोलावले.

तपासणी केल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी जे सांगितले, त्याने पतीला धक्काच बसला. महिलेच्या पोटातील बाळ हे ८ महिन्यांपेक्षा जास्तचं आहे आणि डिलिव्हरी कोणत्याही क्षणी होऊ शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.

लग्नाला फक्त तीन महिने झाले आणि पत्नीच्या पोटात ८ महिन्यांचे बाळ त्यामुळे पती खुप संतापला आणि घरात गोंधळ घातला आहे. त्यानंतर महिलेचे आईवडिल तिला परत माहेरी घेऊन गेले आहे. २६ जून रोजी महिलेने बाळाला जन्म दिला आहे.

पत्नीने केलेल्या फसवणूकीमुळे थेट पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत महिलेवर आणि तिच्या कुटुंबियांवर फसवणूकीचे आरोप केले आहे. हे लग्न फसवणूक करुन करण्यात आले असून मला हे लग्न मान्य नसल्याचे त्याने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

पाकिस्तान आमचे दुसरे घर आहे आणि भारताने…; तालिबानी प्रवक्त्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ
लग्नात तंबाखू खाल्ल्यामुळे नवरीने नवरदेवाला चोपचोप चोपलं; व्हिडिओ झाला व्हायरल
मी कुठं नाही चालली इथंच आहे, चिमुकलीने घातला आजोबांशी वाद; व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: