पाकिस्तान आमचे दुसरे घर आहे आणि भारताने…; तालिबानी प्रवक्त्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ

August 27, 2021 , 0 Comments

तालिबानने अफगाणिस्तानावर हल्ला करुन पुर्ण देशावर कब्जा केला आहे. त्यामुळे तिथली परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. पण तालिबान्यांनी आपल्याला एखाद्या सरकारप्रमाणे सर्व देशांनी बघावे असे म्हटले आहे.

तालिबानी प्रवक्ता आपली भुमिका पत्रकार परिषदांच्या माध्ममातून मांडत आहे. अशात तालिबानने पाकिस्तानला आपले दुसरे घर असल्याचे म्हटले आहे, तालिबानी प्रवक्ताच्या या एका विधानाने एकच खळबळ उडाली आहे.

पाकिस्तान हे तालिबानचे दुसरे घर आहे. आम्हाला शेजारी असलेल्या देशाशी व्यापाराचे आणि सामाजिक संबंध चांगले ठेवायचे आहे, असे तालिबानचे प्रवक्ते झैबुल्लाह मुजाहिद यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी भारताबद्दलही भुमिका मांडली आहे.

पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीला मुजाहिद यांनी मुलाखत दिली आहे. त्यावेळी बोलताना, अफगाणिस्तानशी सीमा पाकिस्तानशी जुळलेली आहे. धर्मसुद्धा एक असून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील लोकंही एकमेकांशी लवकर मिसळतात. त्यामुळे आम्हाला पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवायचे आहे, असे मुजाहिद यांनी म्हटले आहे.

आम्ही अफगाणिस्तावर नियंत्रण मिळवले पण यावर पाकिस्तानने कोणतीही भुमिका घेतली नाही. पाकिस्तानने त्यांच्या अंतर्गत प्रश्नात कधीही हस्तक्षेप घेतला नाही, असेही मुजाहिद यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी भारतावरही आपली भुमिका मांडली आहे.

भारत हा एक महत्वाचा भाग आहे. भारतासोबत दुसऱ्या देशांशीही आम्हाला चांगले संबध ठेवायचे आहे. आमची फक्त एकच इच्छा आहे की भारताने आपली धोरणं अफगाण लोकांच्या हितानुसार ठरवावीत, असेही मुजाहिद यांनी म्हटले आहे.

तसेच भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे हे आम्हाला माहित आहे. त्या प्रश्नावर त्यांनी बसून तोडगा काढायला हवा. तसेच भारताने काश्मीरबाबत सकारात्मक भुमिका घेण्याची गरज आहे असा सल्लाही भारताला मुजाहिद यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

लग्नात तंबाखू खाल्ल्यामुळे नवरीने नवरदेवाला चोपचोप चोपलं; व्हिडिओ झाला व्हायरल
मोठी बातमी! तालिबान विमानतळावर आत्मघाती हल्ला; १५ जण जागीच ठार, ४ अमेरिकन सैन्यांचा समावेश
मांसाहारी लोकांमुळे पर्यावरणाला आहे धोका, शाकाहारी असण्याचे हे आहेत आश्चर्यकारक फायदे


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: