जन आशीर्वाद यात्रेचा उद्यापासुन पुन्हा श्रीगणेशा, नारायण राणेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष
गेले काही दिवस महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापलेले दिसून आले. नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुध्द केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे त्यानंतर त्यांची अटक आणि त्यानंतर जामीन अशा अनेक नाट्यमय घटना संपूर्ण महाराष्ट्राने पहिल्या.
नारायण राणे यांचा जामीन मंजूर झाल्यानंतर पुन्हा आता नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा श्रीगणेशा उद्या पासुन होणार आहे. मुंबई मधून सुरू झालेल्या जन आशीर्वाद यात्रेचा हा तिसरा टप्पा असून पुढचे ३ दिवस ही यात्रा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात असणार आहे.
नारायण राणेंसाठी कोकण त्यातल्या त्यात सिंधुदुर्ग हा बालेकिल्ला मानला. राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेमुळे पुन्हा एकदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत शिवसेना विरूद्ध नारायण राणे संघर्ष होण्याची चिन्हं असली तरी नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग हा बालेकिल्ला आहे हे शिवसेनेला विसरून चालणार नाही.
नाट्यमय अश्या अटक आणि जामीनानंतर राणे जन आशीर्वाद यात्रेमध्ये काय बोलतात आणि काय भूमिका मांडतात. याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागून आहे. ३ दिवस चालणाऱ्या या यात्रेची तोफ सिंधुदुर्गात शांत होऊन तिथेच यात्रेचा शेवट होणार आहे.
नारायण राणे यांना जामीन मिळाला नसता तर भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला गालबोट लागले असते. पोलिसांनी नारायण राणे यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला मात्र शेवटी नारायण राणे यांचा जामीन मंजूर करण्यात आला.
सिंधुदुर्गमध्ये यात्रा नेऊन तिथे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा भाजपचा मनसुबा आहे. त्यामुळे आता हा संघर्ष पुढे कोणते वळण घेईल हे सांगणे कठीण आहे. उद्यापासून पुढचे ३ दिवस महाराष्ट्रातील राजकारणाचे नारायण राणे हे केंद्रबिंदू असतील हे मात्र निश्चित.
महत्वाच्या बातम्या
पाकिस्तान आमचे दुसरे घर आहे आणि भारताने…; तालिबानी प्रवक्त्याच्या वक्तव्याने उडाली खळबळ
लग्नात तंबाखू खाल्ल्यामुळे नवरीने नवरदेवाला चोपचोप चोपलं; व्हिडिओ झाला व्हायरल
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा प्रायव्हेट व्हिडिओ झाला लिक, सोशल मीडियावर धुमाकूळ, पहा व्हिडिओ
बोंबला! पत्नीसाठी चांगले घर घेण्यासाठी खात्यात जमवले ३९ लाख; पत्नी पैसे घेऊन प्रियकरासोबत झाली फरार
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: