अफगाणिस्तानचे मंत्री पिझ्झा डिलिव्हरीचं काम करतायेत

August 26, 2021 , 0 Comments

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी पूर्णपणे आपला कब्जा केल्यानंतर देशाचे पंतप्रधान अशरफ गनी यांनी देशातून पळ काढत अमेरिकेची वाट धरली. पंतप्रधानांसोबत देशातले अनेक मंत्री, मोठं – मोठ्या नेतेमंडळींनी सुद्धा मिळेल त्या विमानानं देश सोडलाय आणि दुसऱ्या देशात आपला उदर्निवाह शोधायला सुरुवात केलीये.

त्यातलंच एक नाव म्हणजे सय्यद अहमद शाह सादात. जे सध्या जर्मनीमध्ये पिझ्झा डिलीव्हरी बॉयचं काम  करतायेत.

सय्यद अहमद शाह सादात अफगाणिस्तानातील एक माजी मंत्री आहे. त्यांनी अफगाणिस्तानात दळणवळण आणि तंत्रज्ञान मंत्री म्हणून काम केलंय. पण तालिबान्यांच्या सत्त्तेत तिथं राहणं सुरक्षित नाही म्हणून आपला देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक झालेत.

जर्मनीतल्या लिपझिंगमध्ये राहणाऱ्या सादात यांचे पिझ्झा डिलिव्हर करतानाचे फोटो ट्विटरवर मोठ्या प्रमाणात होतायेत.

सादात २०१८ मध्ये  अश्रफ घनी यांच्या मंत्रिमंडळात सामील झाले, पण २०२० मध्ये पंतप्रधानांशी मतभेद झाल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनतर डिसेंबर २०२० मध्ये ते अफगाणिस्तान सोडून जर्मनीला पोहोचले.

एका वृत्तसंस्थेने जेव्हा त्यांना या फोटो बद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी हे फोटो आपलेच असल्याचे सांगितले. ते म्हणाले कि, माझ्या जवळचे होते तेवढे सगळे पैसे संपले. ज्यामुळे त्यांनी जर्मन कंपनी लिवरांडोसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतायेत.

एकेकाळी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या घोळक्यात सूट-बूट घालून असलेले सादात गेल्या दोन महिन्यांपासून सायकलवरून पिझ्झा डिलिव्हर करतायेत.

सादात यांच्या पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झालं तर त्यांच्याकडे दोन मास्टर डिग्री आहेत. त्यातली एक ऑक्सफर्ड विद्यापीठाची कम्युनिकेशन्स आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंगची आहे. सोबतच त्यांनी  १३ देशांमध्ये २० पेक्षा जास्त कंपन्यांशी कम्युनिकेशन फिल्डमध्ये २३ वर्ष काम केलंय.

आपल्या इतक्या वर्षांच्या अनुभवात सादात यांनी २२०५  ते २०१३  पर्यंत अफगाणिस्तानच्या संवाद आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे तांत्रिक सल्लागार म्हणून काम पाहिलंय. तसेच २०१६ पासून ते २०१७  पर्यंत त्यांनी लंडनमध्ये एरियाना टेलिकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केलेय.

आपल्या या अनुभवामुळे सादात यांची इच्छा होती की, त्यांना एका टेलीकॉम कंपनीत काम करण्याची इच्छा होती. त्यांनी बऱ्याचं ठिकाणी नोकरीसाठी अप्लाय देखील केले. मात्र सादात त्यांच्या हाती काहीच लागलं नाही, ज्यामूळे त्यांना डिलीव्हरी बॉयची नोकरी लागली.

सादात यांनी सांगितले कि, ते जर्मनीमध्ये खुश आहेत आणि सुरक्षित आहेत. येथे आपल्या कुटुंबासोबत जीवन जगतायेत.

सादात यांना एखादा जर्मन कोर्स करून पुढे शिकण्याचीही  इच्छा आहे.

अफगाणिस्तानमधील घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त करताना सादात यांनी म्हंटल कि, आपल्या देशातलं अशरफ गनी सरकार इतक्या लवकर पडेल अशी अपेक्षाही नव्हती.

हे ही वाचं भिडू :

The post अफगाणिस्तानचे मंत्री पिझ्झा डिलिव्हरीचं काम करतायेत appeared first on BolBhidu.com.



Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: