VIDEO: बॉयफ्रेंडच्या भरोशावर तरुणीने मारली झाडावरुन उडी अन्…; पहा पुढे काय झालं

August 26, 2021 , 0 Comments

नात्यामध्ये विश्वास हा खुप महत्वाचा असतो. विश्वासावर नातं टिकत असतं. त्यामुळे अनेकदा काही लोक विश्वास किती आहे हे तपासण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येतात. काहीजण तर चॅलेंजही आपल्या पार्टनरला करताना दिसतात.

कपलच्या अशा गेम आणि चॅलेंजचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आताही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रेम सिद्ध करण्यासाठी अनेक परीक्षा दिलेल्या तुम्ही बघितल्या असतील, त्यासाठी अनेकजण आपल्या पार्टनरसाठी आपला जीव धोक्यात घालत असतात.

प्रेमासाठी काही पण करणाऱ्या अशाच एका कपलचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये एका तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडवर विश्वास ठेवून एका उंच झाडावरुन उडी मारली आहे. पण त्यानंतर जे झालं ते पाहून सगळेचजण हैराण झाले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक कपल ट्रस्ट गेम खेळत आहे. त्यासाठी एक तरुणी झाडाच्या एका फांदीवर चढली आहे. तर तिचा बॉयफ्रेंड झाडाच्या खाली उभा आहे. कारण त्या तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडला झेलायचे आहे.

ती तरुणी पाठ करुन बिंधास्त स्वत: खाली झोकून देते. त्याचवेळी खाली असलेला तिचा बॉयफ्रेंड तिला बरोबर आपल्या दोन हातामध्ये झेलतो. खुप उंचीवरुन ती उडी मारत असल्यामुळे झेलताना तरुणाचा बॅलेन्स बिघडतो, पण तो काही तिला पडू देत नाही.

तो तरुण बरोबर तिला झेलतो आणि ट्रस्ट टेस्टमध्ये पास होतो. यावेळी त्याचा जेव्हा बॅलेन्स बिघडतो, तेव्हा तरुणी चांगलीच घाबरते पण तो तिला खाली पडू देत नाही आणि बरोबर वाचवतो. अशावेळी तरुणाचा थोडा जरी बॅलेन्स बिघडला असता, तर त्यांना गंभीर दुखापत झाली असती. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

भाजपने मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यातील ‘त्या’ व्हिडिओ शोधल्या; उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
धक्कादायक! सुनेला भाडेकरुसोबत आपत्तीजनक अवस्थेत पकडले; त्यानंतर सासऱ्याने जे केलं त्याने पोलिसही हादरले
केवळ ७८ धावांमध्ये भारतीय संघ तंबूत, इंग्लंडच्या संघासमोर भारतीय संघाची केविलवाणी अवस्था


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: