भाजपने मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यातील ‘त्या’ व्हिडिओ शोधल्या; उद्धव ठाकरेंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

August 26, 2021 , 0 Comments

मंगळवारी दिवसभर राज्याच्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांना संगमेश्वर पोलिसांनी अटक केली होती.

त्यानंतर नारायण राणे यांना घेऊन पोलिस महाड येथे दाखल झाले होते. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला होता. नारायण राणेंना जामीन मिळाल्यानंतर सर्व भाजपरक्ते जल्लोष करत होते.

मंगळवारी दिवसभरात शिवसैनिक आंदोलन करत होते, तसेच आक्रमक होऊन काही शिवसैनिकांनी भाजपची कार्यलयेही फोडली. आता भाजपनेही शिवसेनेला सडेतोड उत्तर देण्याचे ठरवले आहे. दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरुन भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करणार आहे.

तसेच दसरा मेळाव्यातील त्या वक्तव्यांचे व्हिडिओही भाजपने शोधले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ५ पोलिस ठाण्यात भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्या आहे. याबाबतची माहिती भाजपाचे यवतमाळ जिल्ह्याध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

दरम्यान, शिवरायांना राज्याभिषेक करताना तिथून इथे गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला. हा योगी आला. अशी टरटरुन कसलं काय नुसतं. म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसतं फक्त गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे.

आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला. सरळ चपला घालून, असं वाटलं त्याच चपला घ्याव्या आणि त्याचं थोबाड फोडावं. लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहण्याची, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. याच वक्तव्यावरुन भाजपने तक्रार दाखल केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! सुनेला भाडेकरुसोबत आपत्तीजनक अवस्थेत पकडले; त्यानंतर सासऱ्याने जे केलं त्याने पोलिसही हादरले
अरे वा! टाटा मोटर्स लाँच करणारा सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किती असेल किंमत
२४ तासांच्या आत अनिल परबांवर गुन्हा दाखल करा, नाहीतर… ; भाजप आमदाराचा रत्नागिरी पोलिसांना इशारा


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: