‘मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ असं प्रेयसीने म्हटल्यानं प्रियकराची फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या
कल्याण। आजकाल प्रेमात लोक आंधळे असतात. अनेकजण आपलं प्रेम मिळवण्यासाठी कोणत्या थराला जातील हे देखील सांगता येत नाही. मात्र बऱ्याचदा प्रियकर व प्रियसीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे भांडण होत असत.
त्यामुळे काहीजण आपले प्रेमसंबंध बंद करतात. तर भांडण झाल्यानं प्रियकर प्रियसी हे एकमेकांना त्रास करून घेत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र सध्या अशी एक घटना समोर येत आहे जी ऐकून तुमची पाया खालची जमीन सरकेल.
एका तरुणानं ‘मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ अस प्रेयसीने बोलताच फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली आहे. या तरुणानं फेसबुक लाईव्ह करताच मित्रांनी पाहताच क्षणी त्याच्या घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. अंकुश पवार असे या तरुणाचं नाव असून तो कल्याण पश्चिम बेतुरकर पाडा येथील साईकृपा इमारतीमध्ये राहत होता.
बऱ्याचदा अनेक मुलं आपलं नोकरीच स्वप्न घेऊन मुंबईत येतात यापैकीच एक अंकुश होता. तो चार वर्षांपूर्वी जालन्यातून मुंबई मधील कल्याण या ठिकाणी राहायला आला होता. एका खाजगी रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून तो काम करत होता. या दरम्यान त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले मात्र काही कारणामुळे या दोघांमध्ये वाद झाले होते.
वाद झाल्याने प्रियसीनं अंकुशला सुनावले व त्यामुळे अंकुश दुःखी झाला. व याच भावनेतून अंकुशने गुरुवारी सकाळी साडे सातच्या सुमारास काही मिनिटांत फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केली. अंकुशचा व्हिडिओ पाहून त्याच्या मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
या तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली होती. त्यानंतर आता महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. मात्र अंकुशचा जाण्यानं मित्र व कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: