लोकसंख्या ३५ हजार, ऑलिम्पिकमध्ये ५ खेळाडू आले आणि ३ पदकं जिंकून गेले; जाणून घ्या, ‘या’ देशाची कहाणी..
सध्या टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. असे असताना अनेक देश मोठी कामगिरी करताना दिसत आहेत. अनेक छोटे छोटे देश सुध्दा मोठी कामगिरी करत आहेत. या स्पर्धेत जगभरातील देश सहभागी झाले होते. यामध्ये लहान देशांपैकी एक सॅन मारिनो. या देशाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये तीन पदके जिंकली आहेत. त्यांच्याकडे एक रौप्य आणि दोन कांस्यपदके आहेत.
या देशाने केवळ ५ खेळाडूंना टोकियो ऑलिम्पिकसाठी पाठवले होते. तसेच दोन मिश्र खेळांमध्ये भाग घेतला होता. मात्र त्यांनी जोरदार कामगिरी केली आहे. यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. सॅन मारिनोने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकासह आपले खाते उघडले. यामुळे त्यांच्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
तसेच एलसेंड्रा पेरिलीने महिला ट्रॅप स्पर्धेत कांस्य जिंकले. सॅन मारिनोच्या इतिहासातील हे पहिले ऑलिम्पिक पदक ठरले. यामुळे संपूर्ण देशात आनंद साजरा करण्यात आला. यानंतर एलसेंड्रा पेरिली आणि जियान मार्को बेरेट्टीने नेमबाजी मिश्र संघ स्पर्धेचे रौप्य पदक पटकावले होते.
तसेच कुस्तीपटू माइल्स अमीनने कांस्य जिंकले. त्याने भारताच्या दीपक पुनियाला हरवले होते. यामुळे भारताची मात्र निराशा झाली होती. यासह या देशावर अजून एक इतिहास नोंदवला गेला. सॅन मारिनो हा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा जगातील सर्वात लहान देश ठरला आहे. यामुळे ही देखील नोंद त्यांच्या नावावर झाली.
फक्त ३४ हजार लोकसंख्या असलेला हा देश सगळीकडे गाजत आहे. युरोप खंडातील इटलीच्या मध्यभागी हा देश वसला आहे. सॅन मारिनोने १९६० मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळांमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर त्यांच्या नऊ खेळाडूंनी सायकलिंग, नेमबाजी आणि कुस्ती यांसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.
ताज्या बातम्या
एका कपड्याच्या खेळावरुन भांडायला लागले वऱ्हाडी, अचानक पडले नवरीच्या अंगावर अन्…; पहा व्हिडिओ
cm uddhav thackery LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जनतेच्या संवादातील महत्वाचे मुद्दे
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: