पदक सहज मिळत नाही, नीरज चोप्रावर सरकारने किती करोडोंचा खर्च केलाय, जाणून घ्या..
नवी दिल्ली । टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. यामुळे सर्व देशात त्याचे कौतुक केले जात आहे. असे असताना आता त्याने घेतलेली मेहनत, सरकारने त्याच्यावर केलेला खर्च याची चर्चा सुरू झाली आहे. नीरज चोप्राचा विजय हा ऐतिहासिक होता. याआधी भारताने ऑलिम्पिकमध्ये कधीच सात पदकांची कमाई केली नव्हती.
भारत सरकारने २०१९ पासून नीरजच्या ट्रेनिंग आणि परदेशी प्रशिक्षकावर मोठा खर्च केला आहे. नीरजने परदेशी प्रशिक्षक क्लाऊस बार्ट्रोनिट्झ यांच्या हाताखाली सराव केला. यावेळी त्याला सर्वसुविधा देण्यात आल्या होत्या. त्याने दक्षिण आफ्रिका, पोलंड, तुर्की, फिनलँड प्रशिक्षण शिबिरे आणि विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. यासाठी त्याला सरकारकडून निधी देण्यात आला होता.
त्याला २०१६ ते २०२१ पर्यंत सरकारने मोठी मदत केली आहे. यामध्ये परदेशी प्रशिक्षण आणि स्पर्धा 4, 85, 39, 639 रुपये, प्रशिक्षकांचा पगार 1, 22, 24, 880 रुपये, उपकरणे 4, 35, 000 रुपये असे मिळून एकूण 6, 11, 99, 518 रुपये एवढा मोठा खर्च त्याच्यावर करण्यात आला आहे. याचा फायदा करत त्याने मेडल जिंकले आहे.
तसेच त्याला टोकियो ऑलिम्पिकपर्यंतच्या २६ आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी आर्थिक मदत. बायो-मेकॅनिस्ट तज्ज्ञाकडून राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र निधी वाटप, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या एक महिन्यानंतर नीरजच्या उजव्या हाताच्या कोपरात अस्वस्थता जाणवू लागली.
त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे तो मैदानापासून बरेच दिवस लांब राहिला होता. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पोटचेफस्ट्रूम येथे झालेल्या स्पर्धेत त्याने ८७.८६ मीटर अंतरावर भाला फेकला होता. आणि आपले टोकियो ऑलिम्पिकचे तिकीटही पक्के केले होते.
मेडल मिळाल्यानंतर अनेकजण खेळाडूंचे कौतुक करत असतात. मात्र त्यामागे मोठे कष्ट आणि मोठ्या प्रमाणावर पैसे देखील खर्च केलले असतात. निरजने यासाठी मोठे कष्ट देखील घेतले आहेत.
ताज्या बातम्या
एका कपड्याच्या खेळावरुन भांडायला लागले वऱ्हाडी, अचानक पडले नवरीच्या अंगावर अन्…; पहा व्हिडिओ
VIDEO: महापौरांच्या कार्यालयात भुत? महापौरांनीच शेअर केला भयानक व्हिडिओ
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: