नारायण राणे-हितेंद्र ठाकूर भेटीनंतर मोठं वादळ; भाजप जिल्हाध्यक्ष आक्रमक

August 24, 2021 0 Comments

ठाणे: केंद्रीय मंत्री यांनी जन आशीर्वाद यात्रेदरम्यान येथे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आणि आमदार यांच्या कार्यालयाला भेट दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. राणे-ठाकूर भेटीवेळीच घोषणा देत कार्यकर्त्यांनी उघड विरोध केल्यानंतर भाजपचे वसई विरार जिल्हाध्यक्ष यांनीही थेट शब्दांत निशाणा साधला आहे. ( ) वाचा: वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचं वर्चस्व आहे. येथील ठाकूर यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी भाजपसह सर्वच इतर पक्षांनी सातत्याने मोर्चेबांधणी केलेली आहे. वसई विरार महापालिका निवडणूक लवकरच होणार असल्याने सध्या येथे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. अशावेळी नारायण राणे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विरोध डावलून थेट हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. वाचा: विरार येथील विवा महाविद्यालयात असलेल्या कार्यालयात राणे यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. राणे यांचं कार्यालयात जोरदार स्वागत करण्यात आलं. हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आमदार क्षितिज यांनी यावेळी राणे यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर राणे यांच्या नेतृत्वाचे हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर कौतुक केले. जवळपास अर्धा तास राणे हे ठाकूर यांच्या कार्यालयात होते. यादरम्यान, बाहेर भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती. त्यात जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्याकडूनही उघडपणे विरोध करण्यात येत होते. वाचा: 'नारायण राणे आणि हितेंद्र ठाकूर यांच्यात मैत्रीचे संबंध असतीलही पण अशाप्रकारे राणे यांनी ठाकूर यांना भेटणे योग्य नाही. राणे यांची जन आशीर्वाद यात्रा हा पक्षाचा कार्यक्रम आहे. या यात्रेदरम्यान राणे हे ठाकूर यांना भेटल्याने वेगळा संदेश गेला आहे. या भेटीचा उपयोग बहुजन विकास आघाडीकडून येणाऱ्या निवडणुकीत करून घेतला जाईल. त्याचा फटका ठाकूर यांच्या विरोधात लढताना भाजपला बसेल', अशा शब्दांत राजन नाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांच्याविरोधात पक्षाला लढायचे आहे त्यांच्याच मांडीला मांडी लावून आमचे नेते बसत असतील तर वसई विरारमध्ये पक्षाला भवितव्य काय असणार?, असा सवालही काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: