राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल ईडी कार्यालयात; नेमकं कारण जाणून घ्या
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हे आज मुंबई येथील सक्तवसुली संचालनालय कार्यालयात हजर झाले. इक्बाल मिर्ची प्रकरणात ईडीच्या समन्सवरून त्यांनी ही हजेरी लावली होती. काही कागदपत्रांवर स्वाक्षरी करायची होती. त्यामुळे आपण कार्यालयात आलो होतो, असे नंतर प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ( ) वाचा: राज्यातील महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडी आणि सीबीआयच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर तर गेल्या काही दिवसांपासून अटकेची टांगती तलवार आहे. त्यातच आज प्रफुल्ल पटेल मुंबईतील ईडी कार्यालयात दाखल झाल्याने सर्वांच्याच नजरा तिकडे वळल्या. पटेल हे आज दुपारी ईडी कार्यालयात आले होते. त्यानंतर काही वेळातच ते तिथून निघाले. कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या अनुषंगाने पटेल हे ईडी कार्यालयात आल्याचे नंतर स्पष्ट झाले. वाचा: ईडी कार्यालयातून पटेल बाहेर पडताच त्यांना माध्यम प्रतिनिधींनी गाठले. त्यांना विचारणा करण्यात आली असता, इक्बाल मिर्ची प्रकरणात काही कागदपत्रांवर माझी स्वाक्षरी हवी होती. त्यासाठी मी ईडी कार्यालयात आलो होतो, असे पटेल यांनी स्पष्ट केले. त्यांनी अधिक तपशील मात्र दिला नाही. नेमकं काय आहे प्रकरण? इक्बाल मिर्ची आणि त्याच्या पत्नीविरोधात ईडीने सप्टेंबर २०१९ मध्ये मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सीजे हाऊस, साहिल बंगला, राबिया हवेली, मरियम लॉज आणि सी व्ह्यू या मालमत्तांबाबत मिर्ची आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी जो व्यवहार केला आहे तो ईडीच्या रडारवर आहे. यात सीजे हाऊसची जी जागा आहे त्याची किंमत ७६ कोटी इतकी आहे तर अन्य मालमत्तांची किंमत सुमारे ५०० कोटी इतकी आहे. यात लोणावळा येथील पाच एकर जमिनीचाही समावेश आहे. सीजे हाऊस ही १५ मजली इमारत असून ती पटेल यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या मिलेनियम डेव्हलपर्स कंपनीने उभारली आहे. त्यामुळेच या प्रकरणात पटेल यांचे नाव आले होते. वाचा: इक्बाल मिर्चीची ७९८ कोटींची मालमत्ता जप्त इक्बाल मिर्ची मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने आतापर्यंत , धीरज वाधवान आणि हुमायू मर्चंट यांच्यासह आणखी काही जणांना अटक केली आहे. डिसेंबर २०१९ मध्ये विशेष पीएमएलए कोर्टात याप्रकरणी आरोपपत्रही दाखल करण्यात आलेले आहे. पीएमएलएतील तरतुदींनुसार इक्बाल मिर्ची आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मलकीची भारतातील आणि विदेशातील ७९८ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात ईडीला यश आले आहे. मिर्ची याची पत्नी आणि दोन मुलांना फरारही घोषित करण्यात आलेले आहे. इक्बाल मिर्चीचा मृत्यू ऑगस्ट २०१३ मध्ये लंडनमध्ये झाला होता. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: