धक्कादायक: बापाने ९ वर्षांच्या सावत्र मुलीला पंचगंगा नदीत फेकले आणि...

August 24, 2021 0 Comments

कोल्हापूर: पत्नीशी होणाऱ्या सततच्या वादातून एका इसमाने रागाच्या भरात आपल्या सावत्र मुलीलाच नदीत फेकून देण्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील येथे घडला. दरम्यान, मुलीला नदीत फेकल्याची कबुली आरोपीने दिली असून पोलीस मुलीचा शोध घेत आहेत. असे या आरोपीचे नाव आहे. ( ) वाचा: याबाबत अधिक माहिती अशी की, यळगुड येथील युवराज साळुंखे हा चांदी कारागीर आहे. त्याची यापूर्वी दोन लग्ने झाले असून सध्या तिसऱ्या बायकोसोबत तो राहतो. या तिसऱ्या बायकोचा पूर्वी विवाह झाला होता. तिला एक मुलगी आहे. या मुलगीला स्वीकारत साळुंखे याने तिच्याशी लग्न केले. तिचे नाव प्रणाली असून ती सध्या नऊ वर्षाची आहे. यळगुड येथील कन्या विद्यालयात ती चौथीच्या वर्गात शिकत आहे. वाचा: घरात रोज पती-पत्नीमध्ये विविध कारणावरून वाद होत असल्याने साळुंखे याची मानसिकता बिघडली होती. त्यातूनच रविवारी रात्री त्याने मुलीला फिरायला नेले व इचलकरंजी येथे पंचगंगा नदीत फेकून दिले. त्यानंतर त्याने आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार ठाण्यात दिली. तक्रार दिल्यानंतर सतत पाठपुरावा करत पोलिसांशी तो संपर्क साधू लागल्याने त्याच्यावरच पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी आज साळुंखेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मुलीला नदीत टाकल्याची कबुली दिली. रविवारी रात्रीपासून या मुलीचा पोलीस शोध घेत आहेत. नदीच्या काठावर तिचे चप्पल सापडले असून अन्य काही साहित्यही मिळाले आहे. याप्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात युवराज साळुंखेविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक हे अधिक तपास करत आहेत. गेल्या आठवड्यात शिरोळ तालुक्यातील एका बापाने मुलगी ऐकत नाही म्हणून तिला नदीत फेकून दिले होते, आज हा दुसरा प्रकार उघड झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: