निशा रावल आणि करण मेहरा घेतायेत घटस्पोट, निशाने पोटगी म्हणून पैशांव्यातिरिक्त मागितली ही मोठी गोष्ट..
मनोरंजन सृष्टीतील प्रत्येक कलाकार कोणत्या न कोणत्या कारणासाठी चर्चेत असलेले पाहायला मिळतात. अनेक कलाकरांचे बाह्य सबंध असल्याच्या चर्चेला उधान आलेलं पाहायला मिळत. कधी कलाकार त्यांच्या प्रेमामुळे चर्चेत असतात तर कधी त्यांच्या भांडणांमुळे चर्चेत असतात.
मागील काही दिवसांपासून अभिनेता करण मेहरा आणि निशा रावल यांच्या संबंधीच्या अनेक चर्चा आपल्याला ऐकायला मिळाल्या. अनेक आरोप प्रत्यारोप लावल्यानंतर सध्या ही जोडी त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहचली आहे.
‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहरा आता घटस्पोटाच्या कचाट्यात अडकला आहे. अनेक दिवस एकमेकांना जाणून घेतल्यानंतर २०१२ मध्ये करण आणि निशाने विवाह केला. तसेच २०१७ मध्ये त्यांनी एका बाळाला जन्म दिला. परंतु सध्या त्या दोघांचे पटत नसल्याने त्यांनी घटस्पोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
निशाने पती करण मेहरावर कौटुंबिक अत्याचार आणि विवाहबाह्य सबंध असल्याचा आरोप केले आहे. तसेच पोलिसात तक्रार करून त्याच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. त्याला ३१ मेला पोलिसांनी अटक देखील केली होती पण १ जूनला जामिनाच्या आधाराव त्याची सुटका देखील झाली.
त्यानंतर कारणने त्याच्या पत्नीने त्याच्याकडे पोटगीसाठी मोठी रक्कम मागितल्याचा आरोप केला आहे. त्याच्या या आरोपावर निशाने एका वृतपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितल कि, मला करणकडून एका रुपयाचीही अपेक्षा नाही. मी एक स्वतंत्र महिला आहे. मला माझा सांभाळ करता येतो. मला माझ्या मुलाचा ताबा द्या.
निशा आणि करणच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस होता. त्यावेळी करणने त्याच्यासाठी घेतलेल्या गिफ्टचा फोटो सोशल मिडीयावर शेअर केला होता. परंतु निशाच अस म्हणणं आहे की, त्याचे गिफ्ट देखील पोहचलं नाही आणि त्याने मुलाला फोन देखील केला नाही.
निशाच म्हणणं आहे की, करणला आपल्या मुलाची जराही काळजी नाही, तो त्याचा नीट सांभाळ करू शकत नाही. त्यामुळे तिने मुलाचा ताबा स्वतःकडे मागितला आहे. तसेच करणला वाटेल तेव्हा तो मुलाला भेटायला येऊ शकतो अस स्पष्ट केलं आहे.
याव्यतिरिक्त निशाने सांगितले की, करणने माझ्या लग्नाचे दागिने आणि माझ्याकडे जे काही होते ते घेतले. माझ्या आईच्या प्रॉपर्टीची कागदपत्रेही तिच्याकडे पडलेली आहेत. यावर करणने निशाचे सर्व आरोप सरळ फेटाळले आहेत.
हे ही वाचा-
मोठी बातमी! देशातील कोट्यवधी लोक बौद्ध धम्माच्या वाटेवर, मोठा सोहळा होणार संपन्न
विनाशापासून भारत टिकू शकतो पण त्याला एखाद्या मोठ्या नेत्याची गरज नोम चोमस्की यांचा दावा
हॉटनेसचा तडका लावत तरुणींनी सुरु केलं युट्युब चॅनेल; फक्त ५ व्हिडिओ अन् लाखो लोकांनी केलं सबस्क्राईब
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: