“कोणती नशा करून तुम्ही मालिका लिहिता?” स्वीटू आणि मोहितच्या लग्नामुळे प्रेक्षक भडकले

August 24, 2021 , 0 Comments

छोट्या पड्यावरील मालिका “येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेने कमी वेळात अनेक लोकांची मने जिंकली. नुकताच उरकलेल्या ओम आणि स्वीटूचा साखरपुडा झालेला प्रेक्षकांनी पाहिलं. नलू मावशीनेही लग्नाला परवानगी दिल्यानंतर त्यांच्या लग्न सोहळ्याचा विशेष २ तासांचा भाग दाखवण्यात येणार होता. इतक्या कठीण परिस्थितींना तोंड देऊन ओम आणि स्वीटू आनंदी आहेत.

पण मालिकेने एक वेगळेच वळण घेतले आहे. मालिकेत ओम आणि स्वीटूच्या लग्नाचं कथानक सुरु असताना स्वीटूच लग्न ओमसोबत न होता मोहितसह होतं. त्यातही नवरदेव कुठे आहे. ह्याचा कोणालाही थांगपत्ता नसतो.

दुसरीकडे मोहितही स्वीटूसोबत लग्नासाठी होकार देतो. मालिकेचा असा भाग प्रेक्षकांना अपेक्षित नसून मालिकेला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. खरंतर प्रेक्षक ओम आणि स्वीटूच्या लग्नाचा २ तासांचा भाग पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरले होते. पण अशा कथानकामुळे मालिकेला घेऊन प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

याआधीही मागचा पुढचा संदर्भ नसताना मालिका वाढवायची म्हणून वेळोवेळी दाखवण्यात येणाऱ्या मालिकेला प्रेक्षकांनी ट्रोल केलं. परंतु स्वीटू आणि मोहितच्या लग्नामुळे प्रेक्षक भडकले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर मालिकेला पुन्हा एकदा ट्रोल केलं जातंय.

yeu kashi tashi mi nandayla actor

या भागात ओम आणि स्वीटूचं लग्न होणार असत पण मालिकेत ओम लग्न सोडून दादांना शोधायला जाताना दाखवला आणि इकडे लग्न मंडपात स्वीटू मोहितसोबत स्वतःचे लग्न उरकून घेते. प्रोमोमध्ये दाखवला जाणारा ट्विस्ट प्रेक्षकांना कुठेच पाहायला मिळालेला नाही. ओम आणि स्वीटूचं लग्न होईल या आशेने दोन तासांच एपिसोड निराशाजनक ठरला. आणि लेखकाने मालिकेला अगदी वेगळ्या वळणावर नेऊन सोडले.

एकीकडे ह्या भागाचे अनेक मिम्स देखील व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे प्रेक्षक ह्या भागावर राग व्यक्त करत आहेत. एका युझर्सने प्रतिक्रिया देत, “कोणती नशा करून तुम्ही मालिका लिहिता?” तर दुसऱ्या प्रेक्षकाने लिहलं की “हा निव्वळ फालतूपणा दाखवला गेला आहे. प्रेक्षकांना मुर्ख समजून काहीही दाखवतायत.” अजून यूझरने लिहलं, “मालिका वाढवायची म्हणून काहीही दाखवायचं. त्यापेक्षा मालिका बंद करा.” अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

हे ही वाचा-

दिर भावजयीची जोडी अशी अडकली लग्न बंधनात; जाणून घ्या राम कपूरची खास लव्हस्टोरी

कॉलेजने मोकळे केस ठेवण्यास बंदी घालताच विद्यार्थिनिंनकडून नियमांची तालिबानी कायद्याशी तुलना

वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त रितेश देशमुखने बोलून दाखवली मनातील इच्छा; म्हणाला काश


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: