मोठी बातमी! नारायण राणे यांना अटक करण्याचे आदेश, पोलिस पथक रवाना..
मुंबई । भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सध्या जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे. यामुळे आता त्यांच्यावर टीका केली जात आहे. मुख्यमंत्र्यांना कानशिलात लावण्याच्या वादग्रस्त विधानाप्रकरणी नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामुळे नारायण राणे यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना कार्यकर्ते यामुळे आक्रमक झाले आहेत. यामुळे आता राणे विरुद्ध शिवसेना हा वाद अजून वाढणार आहे. रायगडमधील महाड येथील पत्रकार परिषदेत राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली होती.
याबाबत नाशिक पोलिसांनी अटकेचे आदेश दिले आहेत. नाशिक पोलिसांचे एक पथक चिपळूनकडे गेल्याचेही समजते. यामुळे आता राणे यांना अटक करण्यात येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राणे यांना अटक करून कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले होते की, ‘ज्यांना स्वातंत्र्यदिनाबद्दल माहित नाही त्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती. यावरून आता शिवसैनिक संतप्त झाले आहेत.
या विधानाप्रकरणी नाशिक शहराचे शिवसेनेचे शहर अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दाखल केली आहे. यामुळे नारायण राणे यांच्यावर नाशिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकार, द्वेषभाव निर्माण करणारी विधाने करून समाजामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण होईल, असे विधान केले असल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. नारायण राणे यांच्यावर भादवि कलम ५००, ५००(२), १५३-ब (१)(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जणआशीर्वाद यात्रेचा आज सहावा दिवस आहे. या यात्रेदरम्यान नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नारायण राणे यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे.
ताज्या बातम्या
कुत्री भुंकतात, तुम्ही लक्ष देऊ नका, इंदुरीकरांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ भडकल्या, म्हणाल्या..
हॉटनेसचा तडका लावत तरुणींनी सुरु केलं युट्युब चॅनेल; फक्त ५ व्हिडिओ अन् लाखो लोकांनी केलं सबस्क्राईब
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: