चिमुकलीने ‘या’ छोट्याशा कारणासाठी घातला आजोबांशी वाद; सोशल मीडियावर व्हायरल झाला मजेदार व्हिडिओ

August 27, 2021 , 0 Comments

सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण सर्वात जास्त पसंती चिमुकल्यांच्या व्हिडिओंना मिळत असते. चिमुकल्यांचा संवाद हा आपल्या मनाला एक वेगळाच आनंद देत असतो. त्यांच्या निरागस संवादामुळे अनेकदा आपल्याला हसूही येते.

तर काहीवेळा चिमुकल्यांचा अगावूपणाही आपल्याला दिसून येत असतो. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक चिमुकली आपल्या हट्टासाठी आपल्या आजोबांशीच भांडण करताना दिसून येत आहे.

हा व्हिडिओ ९ वर्षांपुर्वीचा असला तरी सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दिसून येते की चिमुकलीला पायऱ्यांवरुन घराच्या छतावर जायचे आहे. तर तिचे आजाबो तिला वर जाण्यापासून अडवत आहे.

आपल्याला थांबवत असल्यामुळे चिमुकली आपल्या आजोबांसोबतच वाद घालत आहे. बरं पण ती इतकी छोटी आहे की तिचे शब्दही काही कळेनासे झाले आहे. तिचे आजोबा जरी तिला वर चढू नको असे सांगत असले तरी तिने मात्र वर जाण्याचे ठरवलेच आहे.

त्यामुळे आजोबाशी भांडण करत ती एक पाऊल वर टाकते, त्यानंतर लगेचच तिचे आजोबा तिला थांबवतात, पण त्यानंतर ती लगेच दुसरे पाऊल पुढे टाकते. तिच्या अशा वागण्याने आजोबांनाच नाही, तर व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकालाच हसू येईल, असे वागणे या चिमुकलीचे दिसून येते.

आजोबा जेव्हा पण थांबवतात, तेव्हा चिमुकलीचं एक उत्तर ठाम असते ते म्हणजे मी कुठं नाही चालली इथंच आहे. पण तिचे पाऊल मात्र पायऱ्यांकडे वळत असताना दिसतात. इतकेच नाही, तर ती आजोबांशी बोलता बोलता एकासोबत दोन पायऱ्या चढते. शेवटी आजोबाही तिच्या हट्टापायी हार मानताना दिसतात.

महत्वाच्या बातम्या-

जन आशीर्वाद यात्रेचा उद्यापासुन पुन्हा श्रीगणेशा, नारायण राणेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष
गॅसमुळे पोट फुगल्याचे सांगत नवऱ्याला फसवत होती बायको; तपासणी केली असता नवऱ्याला बसला जबर धक्का
लग्नात तंबाखू खाल्ल्यामुळे नवरीने नवरदेवाला चोपचोप चोपलं; व्हिडिओ झाला व्हायरल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: