“शेतकरी मरतोय, MPSC केलेला तरुण मारतोय, अरे जगतय कोण मग? राजकारणी?”

July 05, 2021 , 0 Comments

पुणे । काल MPSC ची मुख्य परीक्षा पास झालेला विद्यार्थी स्वप्निल लोणकर याने आत्महत्या केली आहे. यानंतर समाजातील सर्वच स्तरातून या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आता मराठी अभिनेता प्रवीण तरडेने देखील यावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे.

प्रवीण तरडे म्हणाले, आपण एमपीएससीचे विद्यार्थी होतो, तेव्हा विद्यार्थ्यांची स्थिती काय असते हे पाहिले आहे. परिक्षा झाल्या कधी, तो पास झाला कधी, त्याने किती कर्ज काढले. २ वर्ष त्याला का नाही जॉब मिळाला? नक्की कुठल्या याच्यात सत्ता गुंतलीये? राजकारणी नक्की कशांत गुंतलेत. शेतकरी मरतोय, एमपीएसी केलेला तरुण मरतोय. अरे जगतंय कोण मग? राजकारणी?

असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. एकवेळचे मेसचे जेवण जेवायला ज्या पोरांकडे पैसे नसतात त्यांना जावून विचारा. आणि आज ज्या कष्टाने त्यांनी आपल्या पोरांना वाढलेले ते नाहक गेलयं., याचा अभ्यास आपण करत नाही. कारण या आत्महत्येचा अभ्यास करण्याआधी दुसरं कोणीतरी आत्महत्या करणार आहे. दुसरा आत्महत्या करण्याआधी तिसरा कोणीतरी आत्महत्या करणार आहे.

फुटपाथच्या कामातून पैसे खाणाऱ्या, त्यासाठी पैसे उकरणाऱ्या माणसांना आपण देशाचे आणि राज्याचे आयडॉल करून बसलोय. मग असेच तरुण मरणार. असेही यावेळी ते म्हणाले. त्यांनी या संपुर्ण प्रक्रियेवर जोरदार टीका केली आहे.

तसेच ते म्हणाले, येवून बघा मी एस पी कॉलेजला राहायचो. चार जणांच्या कॉट बेसीसवर राहायचो. सगळे एमपीएसी करणारे होते. एक दिवस जर परीक्षा पुढे जर गेल्या ना तर ढसाढसा रडताना पोरांना आम्ही पाहिलेलं आहे. का माहितये का?
प्रवीण तरडे यांनी एमपीएससी प्रशासन आणि सर्व राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली आहे.

विद्यार्थी कधी जबाबदार नव्हता. स्वप्निल आज आपल्यात नाही याला जबाबदार कोण? म्हणजे तरुणांनी आत्महत्या करु नये. मुलांनी आई-वडिलांना जपा , त्यांची स्वप्न पहा, हे सांगण फार सोप आहे. माझ्याही मनात असा कित्येकवेळा विचार आलेला आहे, असेही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर MPSC विद्यार्थ्यांसाठी अमित ठाकरे मैदानात; सरकारला खडे बोल सुनावत म्हणाले..

“माझा तळतळाट आहे की एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी. तेव्हा सरकारला जाग येईल”

महिला सैनिकांच्या परेड दरम्यान घडला हा विचित्र प्रकार; विरोधी पक्षाकडून जोरदार टीका


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: