स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर MPSC विद्यार्थ्यांसाठी अमित ठाकरे मैदानात; सरकारला खडे बोल सुनावत म्हणाले..

July 05, 2021 , 0 Comments

मुंबई । काल राज्यात एक धक्कादायक घटना घडली. MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने पुण्यात एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. स्वप्नील लोणकर असे या तरुणाचे नाव आहे. आता यावर अनेक राजकीय नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आता मनसेचे नेते, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. एमपीएससी’ची परीक्षा प्रक्रिया रखडल्यामुळे स्वप्नील लोणकर या हुशार तरुणाने आत्महत्या केल्यामुळे अवघा महाराष्ट्र हळहळत आहे. यावर आता त्यांनी देखील उडी मारली आहे. त्यांनी एक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, भरपूर अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनून महाराष्ट्राची सेवा करू इच्छिणाऱ्या स्वप्नीलसारखा एक संवेदनशील तरुण जर ‘एमपीएससी हे मायाजाल आहे. असे म्हणत आत्महत्या करत असेल, तर त्याच्या या म्हणण्याला सर्वांनीच अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे.

परीक्षा दिरंगाई, निकाल दिरंगाई आणि नियुक्ती दिरंगाई हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे तीन आवडते उद्योग आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षं लाखो तरुण-तरुणींच्या आयुष्याचे कधीही भरुन न येणारे नुकसान होत आहे. साहजिकच ‘एमपीएससी’ परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये संताप खदखदत आहे.

स्वप्नीलच्या दुर्दैवी घटनेतून महाराष्ट्र लोकसेवा आयोग योग्य तो बोध घेईल आणि आपला ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवेल, हीच अपेक्षा. असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यामुळे सरकार आता तरी जागे होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येनंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. ही आत्महत्या नव्हे तर हा खून आहे, अशी तीव्र भावना विद्यार्थी व्यक्त करत आहेत. स्वप्निलने तर जीव दिला, आणखी किती जणांनी जीव द्यावा म्हणजे सरकारला जाग येईल, असा सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षेवरून अनेक वाद सध्या सुरू आहेत.

ताज्या बातम्या

“माझा तळतळाट आहे की एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी. तेव्हा सरकारला जाग येईल”

आमिर खान आणि किरण राव घेणार घटस्फोट; व्यवसायिक नाते तसेच ठेवणार आणि मुलाचे पालन पोषणसोबत करणार

माहेरी चालले म्हणून गावाला गेलेल्या बायकोने नवऱ्याला दिला धोका; आपल्याच सासऱ्यासोबत तरुणीने…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: