पहिली पत्नी रिनासोबत घटस्फोट घेण्यासाठी आमिरने तिला तब्बल एवढे कोटी दिले होते, जाणून घ्या..

July 05, 2021 , 0 Comments

मुंबई । बॉलिवूड अभिनेता आमिर खान त्याच्या वैवाहिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असतो. नुकतेच पत्नी किरण रावसह आमिर खानने घटस्फोट झाल्याचे जाहीर करताच सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्यादा संसार मोडल्यामुळे आमिरच्या पहिल्या पत्नीची जोरदार चर्चा होत आहे. यामुळे तो काही दिवसांपासून चर्चेत आला आहे.

आमिरचे पहिले लग्न रिना दत्तासोबत झाले होते. याबाबत अनेकांना माहिती नाही. बॉलिवूडमध्ये येण्याआधी आमिर खान रिनाच्या प्रेमात पडला होता. रिना आणि आमिरचा धर्म वेगळा असल्याने लग्नात अनेक अडचणीही आल्या होत्या. मात्र त्यांनी सगळ्यांच्या विरोधात जात लग्न केले.

आमिर आणि रिनाने १९८६ साली लग्न करत सुखी संसाराला सुरुवात केली होती. त्यांना इरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. रिना दत्ता आणि आमिर खानचा संसार फार काळ काही टिकला नाही. २००२ मध्ये रिना आणि आमिर यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेत वेगळे झाले होते.

आमिर आणि रिनाचा त्यावेळचा बॉलीवूडमधला सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता. आमिरने रिनाला ५० कोटी रुपये पोटगीच्या रुपात दिल्याचे बोलले जाते. पहिल्या पत्नीसह घटस्फोटानंतरही दोघांमध्ये मैत्री कायम आहे. मात्र त्यावेळी सुध्दा याची मोठी चर्चा झाली होती.

किरणसह रिना दत्ताची चांगली मैत्री आहे. अनेकदा कामानिमित्त तिघेही एकत्र दिसून येतात. आमिरच्या पानी फॉऊंडेशन या एनजीओची सीईओ त्याची पहिली बायको रिना दत्ता असतानाही किरण राव हिने सत्यमेव जयते वॉटर कप या कॅम्पेनसाठी काम केले.

अमीर खानने किरण रावसोबत घटस्फोट घेतला. यामुळे त्याच्या पहिल्या पत्नीच्या घटस्फोटावर देखील सध्या चर्चा सुरू आहे. आमिर खान आता अजून कोणासोबत लग्न करणार या याकडे आता त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

“शेतकरी मारतोय, MPSC केलेला तरुण मारतोय, अरे जगतय कोण मग? राजकारणी?”

स्वप्नीलच्या आत्महत्येनंतर MPSC विद्यार्थ्यांसाठी अमित ठाकरे मैदानात; सरकारला खडे बोल सुनावत म्हणाले..

महिला सैनिकांच्या परेड दरम्यान घडला हा विचित्र प्रकार; विरोधी पक्षाकडून जोरदार टीका


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: