मोठी बातमी! कोरोना लस आता मिळणार गोळीच्या स्वरूपात, लसीकरणाला येणार वेग

July 27, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली । कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे. यावर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. लसीकरणाचा देखील मोठा तुटवडा जाणवत आहे. आता स्वीडनमधील सर्वात मोठ्या सायन्स पार्कमध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ एन्जेमो एंडरसन यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाची लस ही गोळीच्या रुपात तयार करण्यात येत आहे. यावर संशोधन सुरु आहे.

यामुळे आता लवकरच बाजारात कोरोनावरील गोळ्या आणि इन्हेलर उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या या पावडर स्वरुपातील लसीच्या चाचण्या सुरू असून लवकरच त्याचे निष्कर्ष येतील, अशी अपेक्षा आहे. यामुळे अनेक अडचणी कमी होणार आहेत.

या लसींना कोल्ड चेन मेंटेन करण्याचा प्रश्न नसल्यामुळे अनेक गरीब देशांपर्यंत त्या सहज पोहोचवणे शक्य होईल. देशांनाही या लसींचे वितरण करणे तुलनेने सोपे होणार आहे. लसीचे वितरण करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सर्वसामान्य नागरिक मेडिकलमधून एका पावडरच्या स्वरुपात असलेली लस घरी आणू शकतील. या इन्हेलरच्या वरच्या भागात बसवण्यात आलेली कुपी फोडल्यानंतर ते ऍक्टिव्हेट होईल. हे आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने घेता येईल.

नाकावाटे हे इन्हेलर खेचल्यानंतर ते नाक, घसा आणि तोंडामार्फेत शरीरात प्रवेश करेल आणि कोरोनाविरोधातील अँटिबॉडिज वाढवायला मदत करेल, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. आता जी लस इंजेक्शनच्या स्वरूपात दिले जात आहे, त्यावर मोठी अडचण निर्माण होत आहे. यामुळे लसीकरणाचा वेग काहीसा कमी आहे.

ताज्या बातम्या

‘ठाकरे सरकार आल्यापासून वादळं काय, पाऊस काय, कोरोना काय… सगळं चालूच आहे’ नारायण राणेंनी केली बोचरी टीका

पावसाळ्यात घरात ओलावा येतो का?, करा हे घरगुती उपाय होतील अनेक फायदे

पतीच्या निधनानंतर मुलाने दिली आईची साथ, आई बनली सोशल मीडियाची स्टार आई..


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: