'महापूर…पाण्याचा, नुकसानीचा अन् न थांबणाऱ्या अश्रूंचाही'; कोल्हापूरला तब्बल एक हजार कोटींचा दणका?

July 27, 2021 0 Comments

: चार महिने जिल्ह्यात करोनाचा कहर सुरू आहे, राज्यभर त्याचा संसर्ग कमी होत असताना कोल्हापूरचा विळखा मात्र घट्ट आहे. रुग्णसंख्या आणि मृत्यूदर तर राज्यात नव्हे तर देशात सर्वाधिक. शिवाय सलगच्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यापासून व्यापारी-व्यावसायिकापर्यंत सारेच मेटाकुटीला आलेले. लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता येत असताना निसर्गाने कोल्हापूरकरांची आणखी एक परीक्षा घेतली. सलग तीन दिवस ५०० मिमीपेक्षा अधिक पाऊस कोसळला आणि महापुराचा मोठा फटका संपूर्ण जिल्ह्याला बसला. एकीकडे महापुराचे गावागावात आणि गल्लीबोळात घुसलेले पाणी अन दुसरीकडे त्या नुकसानीने डोळ्यांत आलेला अश्रूंचा महापूर असे काळीज पिळवटून टाकणारे चित्र निर्माण झाले आहे. शेतीप्रधान, उद्यमशील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरकरांच्या दु:खाला अंत राहिला नाही. अतिवृष्टी आणि महापुराच्या धडकीइतकेच नुकसानीचा आकडा धास्ती भरवणारा आहे. गेल्या तीन वर्षात लागोपाठ संकटाची मालिका मागे राहिल्याने सर्वसामान्य लोक धास्तावले आहेत. महापुरामुळे वित्तहानीचा सरकारी आकडा २५० कोटी रुपयांच्या घरात असला तरी प्रत्यक्षात मात्र किमान हजार कोटींचा दणका जिल्ह्याला बसला. सगळ्याच घटकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या आपत्तीतून आता सावरायचे कसे ? असा प्रश्न पडला आहे. दोनच वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ ला कोल्हापूर जिल्ह्याने महापुराचे रौद्ररूप अनुभवले. तेव्हाही अर्धे शहर आणि पाचशेहून अधिक गावे पुराच्या पाण्याने वेढली होती. त्या आपत्तीत किमान दोन हजार कोटींचे नुकसान झाले होते. त्यानंतर मागील वर्षापासून करोना संसर्गाचा पाठलाग सुरू आहे. करोनाची महामारी आणि लॉकडाऊन यामुळे आर्थिक चक्रच अक्षरश: गारठले. मागील वर्षी सहा महिने तर यंदा शंभर दिवस व्यापार बंद, यामुळे सर्वांचेच आर्थिक गणित बिघडले. बँकेचे कर्ज, आणि सरकारी कर यामुळे जीव मेटाकुटीला आला आहे अशी व्यावसायिकांची भावना झाली आहे. यंदाच्या करोनाच्या संसर्गात रोज जिल्ह्यात दीड हजारावर बाधित आढळत असल्याने भीती वाढत गेली. घरातून बाहेर पडण्यावर बंधने, खरेदी विक्री बंद, व्यवसाय ठप्प. यामुळे लोकांचे अतोनात हाल झाले. करोनाविरोधात लढाई सुरू असताना महापुराने तीन दिवस धुमाकूळ घातला. पंचगंगा नदीचे पाणी ५६ फुटावर गेले आणि जिल्ह्याला महापुराचा विळखा घट्ट झाला. दोन दिवसात बघता बघता ४०० पेक्षा अधिक गावे पूरबाधित झाली. करोना संसर्गाच्या भीतीच्या छायेत वावरत असताना महापूराने डोळ्यात अश्रूंचा पूर आणला. नजरेसमोर अनेकांची घरे बुडाली. सारा संसार चिखलात बुडाला. दुकानात, कार्यालयात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. शेतकरीवर्गही भरडला. वेळेत पाऊस आल्याने पीके चांगली होती. ती पाण्यात बुडाली. भाजीपाला, फळे कुजून गेली. उभा ऊस आडवा झाला. उद्योगधंदे बंद पडले. वाहने पाण्यात बुडाल्याने त्याच्या दुरूस्तीचा मोठा खर्च आ वासून उभा आहे. यामुळे जिल्ह्याला किमान हजार कोटींचा दणका बसला आहे. तीन वर्षात दोनदा महापुराची आपत्ती कोसळल्याने आर्थिक कंबरडेच मोडले आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नाहीत. अतिवृष्टी आणि महापुराने रस्त्यांची चाळण झाली. भेगा पडल्याने, दरड कोसळल्याने रस्त्यांची वाट लागली आहे. त्याच्या दुरूस्तीसाठी शेकडो कोटी रूपये खर्च येणार आहे. महावितरणलाही या महापुराने २३ कोटीचा दणका बसला आहे. 'राज्य सरकारने प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला तातडीने १५ हजारांची मदत करावी, घरांच्या नुकसानीसाठी ५० हजार रुपये द्यावेत, तर व्यापारी-विक्रेत्यांना नुकसानीच्या २५ टक्के रक्कम द्यावी,' अशी मागणी माजी खासदार आणि भाजप प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी केली आहे. 'महामारीच्या संकटामुळे व्यापारी कोलमडून पडला आहे. त्याची आर्थिक घडी आधीच विस्कटलेली आहे. महापुराने त्याला आणखी रस्त्यावर आणले आहे. यामुळे त्यांना सरकारने तात्काळ नुकसानभरपाई देऊन, पुन्हा व्यापार सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा उपलब्ध करावा,' असं वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी म्हटलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: