दुर्दैवी! मित्रांसोबत जेवताना श्वसन नलिकेत अन्न अडकल्याने पोलिसाचा मृत्यू, मित्रांसोबतचे जेवण ठरले अखेरचे..

July 27, 2021 , 0 Comments

नालासोपारा येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथे एका पोलीस अंमलदाराचा मृत्यू झाला. यामुळे त्यांच्या मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जेवण करत असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. ते एकदम शांत स्वभावाचे मनमिळावू असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

महेंद्र मस्के वय ३४ असे या पोलीस अंमलदाराचे नाव असून नालासोपारा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रात्री पोलीस कर्मचारी, शिपाई मित्रांसोबत कामण येथील हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. यावेळी जेवत असताना श्वसन नलिकेत अन्न अडकल्याने श्वास घेण्यास त्रास झाल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे मित्रांना एकच धक्का बसला.

त्यांनी लगेच त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. त्यांच्या पश्चात दोन लहान मुली, पत्नी असा परिवार आहे. मस्के यांच्या अचानक जाण्यामुळे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मित्रांना रडू आवरले नाही. बोलता बोलता त्यांचा मित्र त्यांच्यातून निघून गेला.

शांत, सदैव हसरा आणि मनमिळावू असा त्यांच्या स्वभाव होता. आपल्या कामाशी संबंधित व्यक्तींसोबत ते अतिशय नम्रपणे बोलत असत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांचे वय फक्त ३४ वर्ष होते. रविवारी रात्री ही घटना घडली.

रात्री त्यांचा मृतदेह कोल्ड स्टोरेजनध्ये ठेवण्यात आला आहे. त्यांच्या जळगाव येथील मूळ गावी अंतिम संस्कार केले जाणार आहेत. ही बातमी त्यांच्या घरच्यांना समजताच त्यांना एकच धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी! कोरोना लस आता मिळणार गोळीच्या स्वरूपात, लसीकरणाला येणार वेग

‘ठाकरे सरकार आल्यापासून वादळं काय, पाऊस काय, कोरोना काय… सगळं चालूच आहे’ नारायण राणेंनी केली बोचरी टीका

केंद्र सरकारकडे सारखीच मदत मागायची असेल, तर राज्य सरकार कशाला आहे? – नारायण राणे


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: