सारेगमप चे परीक्षक ओव्हर ॲक्टींगमुळे ट्रोल होत असताना आता मृण्मयीचे सडेतोड उत्तर, म्हणाली…

July 05, 2021 , 0 Comments

सध्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ हा शो ट्रोल केला जात आहे. याला कारण देखील तसेच आहे. या शोमधील कार्तिकी गायकवाड इतर स्पर्धक रोहित राऊत मुग्धा वैशंपायन प्रथमेश लघाटे आणि आर्या आंबेकर या परिक्षकांना शोमधील त्यांच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगमुळे सध्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे. यामुळे आता ते चर्चेत आले आहेत.

आता मात्र या परिक्षकांना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सला आता ‘शो’ची सूत्रसंचालिका मृण्मयी देशपांडेने सडेतोड उत्तर दिले आहे. यामुळे पुन्हा चर्चा रंगू लागली आहे. नुकताच मृण्मयीला एका ट्रोलरने ‘सारेगमप’च्या परिक्षकांना ट्रोल करत कमेंट केली, ‘समोर असलेले जज आणि अँकर खूपच आरडा ओरडा करतात.’ यावर मृण्मयीने चांगलेच उत्तर दिले आहे.

‘तुम्ही या मुलांचे गाणं ऐकून काय केले असते? हाताची घडी घालून शांत बसला असतात का?’ मृण्मयीने या ट्रोलरला दिलेल्या या सडेतोड उत्तराचे अनेकजण समर्थन करत आहेत. यामुळे या ट्रोलर्सची बोलती बंद झाली आहे. यामध्ये कार्तिकी गायकवाडची तुलना गायिका नेहा कक्करसोबत केली जात आहे.

त्यामुळे सध्या सोशल मीडियावर नेहा आणि कार्तिकीचे मीम्स व्हायरल होताना दिसत आहेत. शोमधील मेंटॉर प्रथमेश लघाटेला ‘महेश काळे यांची कॉपी करत आहे’ असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. तसेच आर्या आंबेकर आणि रोहित राऊतच्या परिक्षणावरील अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

यामुळे सध्या याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. एखाद्या स्टेज शोमध्ये सुरुवातीच्या स्पर्धकांना नंतरच्या पर्वात परीक्षक म्हणून घेण्यात आले आहे. आणि त्यातच कॉपी करण्याची स्पर्धा दिसू लागल्याने वाहिनी वरील हा कार्यक्रम पाहणाऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवण्यात सुरुवात केली आहे.

हे जरा अतीच होते असे सांगत नेटकरी या सर्वावर तुटून पडले आहेत. अशा अनेक स्वरूपाच्या मीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत. आर्या आंबेकर आणि कार्तिकी गायकवाड यांना नेहा कक्कर ची कॉपी करणाऱ्या म्हणून मीम्स तयार करण्यात आलेल्या आहेत.

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री साहेब, तुमचा मुलगा मंत्री होतो, पण आमच्या नियुक्त्यांचे काय? MPSC च्या विद्यार्थ्यांचा आक्रोश

पुढील 5 दिवस ‘या’ जिल्ह्यामध्ये पडणार मुसळधार पाऊस

माहेरी चालले म्हणून गावाला गेलेल्या बायकोने नवऱ्याला दिला धोका; आपल्याच सासऱ्यासोबत तरुणीने…


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: