मुख्यमंत्री साहेब, तुमचा मुलगा मंत्री होतो, पण आमच्या नियुक्त्यांचे काय? MPSC च्या विद्यार्थ्यांचा आक्रोश

July 05, 2021 , 0 Comments

पुणे । पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर हा MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊनही पुढे काय होत नाही यामुळे टेन्शनमध्ये होता. यामुळे त्याने आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलाखतच झाली नसल्यामुळे तो प्रचंड तणावाखाली होता.

त्यामुळे त्याने आत्महत्या केली आहे. या आत्महत्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. आता त्याने आत्महत्या केल्यानंतर राज्यातील इतर स्पर्धा परीक्षा देणारी मुलं थेट सरकारला जाब विचारू लागली आहेत. पुण्यातील काही मुलांनी सांगितलें की, राजकीय नेत्यांना सर्वसामान्य कुटुंबातील मुलांचे काही देणेघेणे नाही.

या नेत्यांना केवळ स्वतःची मुलं सेट झाली पाहिजेत. एवढेच त्यांचे लक्ष आहे. मुख्यमंत्री साहेब, तुमचा २८ वर्षाचा मुलगा मंत्री होतो. पण आमच्या नियुक्त्याचे यांचं काय?,असा गंभीर प्रश्न या मुलानी विचारला आहे. यामुळे अनेक विद्यार्थी निराश झालेले दिसून येत आहे.

मागील काही वर्षात MPSC ची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शासन आणि आयोग कोणत्याही प्रकारचे निर्णय घेत नाही. परीक्षेच्या तारखे पासून ते नियुक्त्या जाहीर करेपर्यंत आजवर गोंधळ पाहण्यास मिळाला आहे. याचा फटका सर्व कुटुंबातील तरुणांना बसला आहे. परीक्षा देत-देत वय निघून गेलंय. कोणी लग्नासाठी मुलगी देत नाही.

एवढे शिक्षण घेऊन आमच्या वाट्याला अपयश आणि नैराश्य आले आहे. आम्ही कसं जगायचं आणि शेतात राबणाऱ्या बापाला काय उत्तर द्यायचे? असा गंभीर सवाल हे परीक्षार्थी आता विचारू लागले आहेत.

ताज्या बातम्या

..तर भाजप विचार करेल; संजय राऊत-आशिष शेलारांच्या भेटीनंतर भाजपच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

झाडाला लाथ मारणं तरुणाला पडलं भारी, झाडानंच दिलं जोरदार प्रत्युत्तर, व्हिडीओ व्हायरल

VIDEO: महिला बॉटलवर उभी राहून करत होती योगा, पण नंतर जे झालं ते पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

[contact-form]
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: