राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता

July 05, 2021 , 0 Comments

मान्सूनने वेळेत दाखल झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. विदर्भात काही प्रमाणात दडी मारल्याची स्थिती होती. राज्यात जून महिन्यात सरासरीच्या २०७.६ मिलिमीटरपैकी २७२.९ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरीच्या तुलनेत ३१ टक्के अधिक पाऊस पडला. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक ८३ टक्के अधिक, तर अकोला जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजे उणे ५१ टक्के पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून मान्सूनचे ढग पुढे सरकत नसल्याचे दिसून आले आहे. पश्चिमेकडून जोरदार वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे पूर्वेकडून वाहणाऱ्या मान्सूनच्या थंड वाऱ्यांना पुढे सरकण्यात अडथळे येत असल्याचं हवामान तज्ज्ञ सांगतात. पश्चिमेकडून येणारे वारे हे मान्सूनला पुढे सरकण्यात अडथळा निर्माण करतात आणि त्यांचा प्रभावही कमी करत असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी ट्विट करुन येत्या पावसात राज्यातील पावसाची स्थिती काय राहणार याविषयी माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात मान्सून 8 ते 9 जुलै नंतर सक्रिय होऊ शकतो, असे देखील सांगितले आहे.

या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस 7 आणि 8 जुलै रोजी हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दोन दिवशी महाराष्ट्रात ढगांच्या गडगडाटासह राज्यात पाऊस हजेरी लाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या पुढील अपडेटस घेत राहावे, असे देखील सांगण्यात आले आहे.

हवामान विभागाने राज्यातील काही भागात 7 आणि 8 जुलैला पाऊस हजेरी लावेल, असा अंदाज वर्तवला आहे. त्या अंदाजानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

 


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: