वर्दी उतरव चिरून टाकेन, पोलिसाला दम देणाऱ्याला पोलिसाने दाखवला इंगा, लागला रडू, पहा व्हिडिओ..
मुंबई । कोरोनाच्या काळात पोलिस आपल्या जीवाची पर्वा न करता आपले काम इमानदारीने करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसाला एका दाम्पत्याने धमकी देण्याचा व्हिडीओ समोर आला आहे. नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडीला जॅमर लावल्याचा राग आल्याने वाहतूक पोलिसाला थेट वर्दी उतरव, चिरून टाकेन.
पोलिसांना विकून गाडी दुरुस्त करू अश्या प्रकारे पोलिसाला धमक्या देत गोंधळ घालणाऱ्या दाम्पत्यास पोलिसांनी अटक केली. मात्र त्यानंतर त्यांचीच मस्ती उतरून तो चक्क ढसाढसा रडायला लागला आहे. मीरारोड मध्ये गुरुवारी दुपारी ही घटना घडली.
Here is the video pic.twitter.com/0WBu0s1VwO
— पर्यावरण प्रेमी, समीर 19 वर्ष (@SameerSam2001) July 9, 2021
वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई कृष्णत दबडे हे नो पार्किंग मधील गाड्यांवर कारवाई करत होते. दुपारी अडीचच्या सुमारास मीरारोड येथील छत्रपती शिवाजी महाराज मुख्य रस्त्यावर नो पार्किंग क्षेत्रात मोटार उभी केली होती. त्या ठिकाणी वाहन चालक दिसून न आल्याने त्यांनी जॅमर लावला.
मग तेथील एका दुकानातून अरुण रतन सिंग व त्याची पत्नी मीना रा. साई अंगण, रामदेव पार्क, मीरारोड हे दोघे बाहेर आले. गाडीला जॅमर लावल्याचे पाहून दोघेही पोलिसावर भडकले. वाट्टेल तशा धमक्या देऊ लागले. शिवीगाळ, मुजोरी आणि पैशांची मस्ती दाखवून तेथेच तमाशा करू लागले.
जेल में हेकड़ी निकल गयी pic.twitter.com/9DK64pwg1Q
— Sanjay Kishore (@saintkishore) July 9, 2021
अखेर नया नगरचे पोलीस आल्यावर दोघांना ताब्यात घेण्यात आले. दबडे यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अरुण व मीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला. रस्त्यावर हिरोगीरी करणाऱ्या अरुणला पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यात अटक करताच तो ढसाढसा रडू लागला.
त्याचा रडतानाचा आणि पोलिसांवर दांडगाई करतानाचा असे दोन्ही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. वाहुतक पोलीस भर उन्हात आपले काम पूर्ण इमानदारीने करत असतात. त्यांच्यावर अशाप्रकारे वागणूक करणे योग्य नाही. अशा अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.
ताज्या बातम्या
पुन्हा त्याच अदा आणि तोच जोश, शिल्पा शेट्टीचे ‘चुरा के दिल मेरा २.०’ गाणे रिलीज, पहा व्हिडीओ
मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाहीत, देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: