Shirdi: अडलेली रेशनकार्ड ची कामे मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन करू - सचिन शिंदे
Shirdi: शिरडी शहर तसेच राहाता तालुक्यातील रेशनकार्ड धारकांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2019 मधे राज्यात पथदर्शी ठरेल असा शासन आपल्यादारी हा प्रकल्प आपल्या मतदारसंघात राबविला यामधे प्रत्येक गावात आणि शिरडी शहरातील प्रत्येक वार्ड मधे जाऊन नविन रेशनकार्ड बनविणे, नाव समाविष्ट करणे, कमी करणे, रेशनकार्ड विभागनी करणे आदि कामे प्रामुख्याने करण्यात आली.
दुर्दैवाने त्यानंतर राज्यात महाआघाड़ी चे सरकार आले आणि काही तांत्रिक कामे अपूर्ण राहिली असे जरी असले तरी रेशनकार्ड चे काम ज्या विभागामार्फत केले जाते त्या महसूल विभागाला आपल्याच जिल्ह्यातील कार्यक्षम मंत्री लाभलेले आहेत याचा विसर पडलेल्यांना शिरडी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गरीबांच्या नावाने कळवळा आला आहे परंतु त्यांना हे माहित आहे का की कोविडच्या पहिल्या आणि आता दुसऱ्या लाटेत याच विखे पाटलांच्या केंद्र सरकारने मोफत रेशन वाटप केले होते आणि अजूनही करत आहे
त्यामुळे ही आंदोलनाची भाषा न वापरता आपले सत्ताधारी पक्षातील वजन वापरून तांत्रिक दुरुस्ती करून आणावी आणि महाआघाडी सरकार आल्यापासुन गरीबांचे लटकावून ठेवलेले रेशन मुक्त करा नाहीतर भारतीय जनता पार्टी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा भारतीय जनता पार्टी चे शिरडी शहर अध्यक्ष सचिन निवृत्ती शिंदे यांनी दिला आहे
0 Comments: