संकटांची मालिका सुरुच! कोरोनानंतर झिका विषाणूची एंट्री, १३ रुग्ण सापडल्याने उडाली खळबळ

July 09, 2021 , 0 Comments

देशात सध्या कोरोना ने हाहाकार उडवला आहे पहिल्या लाटे पेक्षा दुसऱ्या लाटेमध्ये लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले यामुळे अनेक रुग्णांचे मृत्यू झाले. अनेकांना बेड सुध्दा उपलब्ध होत नव्हते. औषधांचा देखील मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला होता. आता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे.

असे असताना मात्र आता झिका विषाणूने एंट्री घेतली आहे. केरळमध्ये आतापर्यंत १३ जणांना झिकाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये एका गर्भवतीचा समावेश आहे. तिरुअनंतपुरमधून घेण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये पाठवण्यात आले आहेत.

या बातमीने एकच खळबळ उडाली आहे. अजून देश कोरोनातून सावरलेला नसताना हा नवीन रोग आल्याने चिंता वाढली आहे. तिरुअनंतपुरममधल्या खासगी रुग्णालयात एका २४ वर्षीय गर्भवतीला दाखल करण्यात आले. या महिलेला ताप, डोकेदुखी, शरीरावर लाल चट्टे अशा स्वरुपाचा त्रास होत होता.

झिकाची लक्षने असल्याने पुण्यातील प्रयोगशाळेत नमुने तपासण्यात आले. झिकाची लागण झालेल्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. यामुळे आता यावर अभ्यास सुरू आहे. हा रोग पसरू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

याची लक्षणे दिसायला ३ ते १४ दिवस लागतात. बहुतांश लोकांमध्ये लक्षणंदेखील दिसत नाहीत. ताप, शरीरावर चट्टे, डोकेदुखी, मांसपेशी आणि सांधेदुखीची समस्या जाणवते. ही प्राथमिक लक्षणे याची आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार युगांडात पहिल्यांदा १९४७ मध्ये माकडांमध्ये झिका विषाणू सापडला. यानंतर अनेक ठिकाणी हे रुग्ण आढळून आले आहेत. आता मात्र भारतात हे रुग्ण आढळण्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

कोरोनानंतर पहिलीच मोठी भरती, राज्यात शिक्षक सेवकांची ६१०० रिक्त पदे भरणार, जाणून घ्या..

“भागवत कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव”

लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी झाली बेशुद्ध; नवऱ्यासोबत जे घडले ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: