शेतकऱ्यांना मोदींचा मोठा दिलासा! बाजार समित्यांमधून शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख कोटी रुपये

July 09, 2021 , 0 Comments

नवी दिल्ली। मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्या बैठकीत मोदी सरकारने नव्या मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीत 30 मंत्री सामील झाले होते. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजार समित्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक लाख कोटी रुपये दिले जाणार आहेत. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसर्‍याच दिवशीच हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

बैठक संपन्न झाल्यानंतर माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया, कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यामध्ये संबोधित करताना कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले की, मोदी सरकार सतत शेतकच्यां हिताची पावलं उचलत आहे.

आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना सांगायचे आहे की नवीन कृषी कायदामुळे बाजार समित्या संपतील हे पुन्हा पुन्हा सांगितले जाते. पण अर्थसंकल्पात असे स्पष्टपणे सांगितले गेले होते की बाजार समित्या संपणार नाहीत, तर त्या अधिक बळकट केल्या जातील. आज एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) कृषी पायाभूत सुविधा निधी वापरण्यास सक्षम होईल असा निर्णय घेण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘कृषी पायाभूत निधी’ अंतर्गत, वित्तीय सुविधा विषयक केंद्रीय क्षेत्रीय योजनेत सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली.

जगभरात नारळ व्यवसाय वाढवण्यावर भर दिला जाईल. यासह नारळ मंडळामध्ये सीईओची नेमणूक केली जाईल. एपीएमसी मंडई आणखी मजबूत करण्यात येतील. कृषी बाजारपेठेस अधिक संसाधने दिली जातील. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, असे तोमर म्हणाले.

सोबतच आरोग्यमंत्री मनसुख मांडवीयांनी देखील जगभरात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य करत ते म्हणाले की, कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आरोग्य आपत्कालीन परिस्थितीसाठी 23 हजार कोटींचे पॅकेज दिले जाणार आहेत.

यामध्ये 15 हजार कोटी केंद्र सरकार देईल, तर 8 हजार कोटी राज्य सरकारांकडून उभे केली जातील. कोरोनाच्या संभाव्य धोक्यात लहान मुलांना या पॅकेजमधून सहाय्य केलं जाईल. अशा प्रकारे मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या
कोरोनानंतर पहिलीच मोठी भरती, राज्यात शिक्षक सेवकांची ६१०० रिक्त पदे भरणार, जाणून घ्या..
“भागवत कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडेंना खतम करण्याचा डाव”
तरुणाने शोधला मायलेज वाढवण्याचा भन्नाट उपाय; जाणून घ्या कसा वाढवतो गाडीचा मायलेज
लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरी झाली बेशुद्ध; नवऱ्यासोबत जे घडले ते ऐकून पायाखालची जमीन सरकेल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: