राज कुंद्राने आम्हाला पॉर्न क्लिप डिलीट करायला लावल्या, तपासात धक्कादायक माहिती आली समोर

July 28, 2021 , 0 Comments

मुंबई । पॉर्न व्हिडिओ प्रकरणी सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अटकेत आहे. त्याचे चार कर्मचारी सध्या साक्षीदार झाले आहेत. त्यांनी आता महत्वाची माहिती दिली आहे. यामुळे आता हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे. राज कुंद्राच्या अडचणीत वाढ झाली आहे.

राज कुंद्राने आपल्याला पॉर्न क्लिप डिलीट करण्यास सांगितले होते असे या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यांनी या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. राज कुंद्राच्या अँपद्वारे या व्हिडिओ अपलोड करण्यात आल्या होत्या.

हे अँप गुगल स्टोअर आणि आयओएसवरुन काढून टाकण्यात आले आहे. यामुळे या आरोपींनी Bollyfame नावाचे दुसरे अँप लाँच केले होते. अशीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याला अटक केल्यानंतर डेटा डिलीट करण्यात आला आहे.

यश ठाकूरने आयबीमधील एका अधिकाऱ्यासोबत मैत्री केली होती. जेणेकरुन हे अँप सुरु करुन त्यावरुन पॉर्नचे स्ट्रिमिंग करता येईल. तो सध्या फरार झाला आहे. व्हिडीओमध्ये काहीही आक्षेपार्ह लैंगिक कृत्य नसल्याचे राज कुंद्राने सांगितले आहे. राज कुंद्राच्या विरोधात पोलिसांना अनेक पुरावे सापडले आहेत.

त्याच्या घरी एक गुप्त कपाटही सापडल्याचे कळत आहे. शिल्पा शेट्टीने पोलिसांना आपण राज कुंद्रा चालवत असलेल्या अँपमध्ये नेमका कोणता कंटेंट आहे याची कल्पना नसल्याचे सांगितले आहे. यावेळी तिने एरॉटिका आणि पॉर्नोग्राफीत फरक असून आपला पती पॉर्न कंटेटंची निर्मिती करत नव्हता, असे म्हटले आहे.

या प्रकरणी शिल्पाला देखील अटक होण्याची शक्यता आहे. चौकशीवेळी शिल्पा राजवर भडकली, आपल्याकडे सगळं काही आहे, मग हे सर्व करायची काय गरज होती, असे शिल्पा शेट्टी राज कुंद्राला विचारत होती. यावेळी ती रडत देखील होती.

ताज्या बातम्या

“ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलो तरच भारतीय, नाहीतर चायनीज, नेपाळी म्हणून आम्हाला हिणवतात लोकं”

शिल्पाचा आईला मेसेज, मी राज कुंद्राला घटस्फोट देत आहे…

…म्हणून मी पुरग्रस्त भागाचा दौरा करत नाही आणि ‘त्या’ नेत्यांनीही करु नये- शरद पवार


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: