“ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलो तरच भारतीय, नाहीतर चायनीज, नेपाळी म्हणून आम्हाला हिणवतात लोकं”

July 28, 2021 , 0 Comments

देशातील पहिला पुरुष सुपर मॉडेल म्हणून अभिनेता मिलिंद सोमनने ओळख बनवली आहे. मिलिंद सोमन जितका सोशल मीडियावर ऍक्टीव्ह असतो, तितकीच त्याची पत्नी अंकीता कोनवारही ऍक्टीव्ह असते.

सोशल मीडियावर ऍक्टीव्ह असणारी अंकीता वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडत असते. त्यामुळे ती चर्चेत येत असते. आताही तिने वक्तव्य केल्याने ती चर्चेत आली आहे. ईशान्य भारतातील लोकांना भारतातील लोक कशी वागणूक देतात, यावर तिने भाष्य केले आहे.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मीराबाई चानूने पदक जिंकले आहे, ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. त्यानंतर आता अंकीताने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. ईशान्य भारतातील लोकांनी मेडल जिंकल्यानंतरच त्यांना भारतीय म्हटलं जातं, नाहीतर चिंकी, चिनी, चायनीज, कोरोना असे म्हटले जाते, असे अंकीताने पोस्ट शेअर करत म्हटले आहे.

तुम्ही जर ईशान्य भारतातले असाल आणि तुम्ही भारतासाठी पदक जिंकलं तरच तुम्ही भारतीय म्हणून ओळखले जाऊ शकतात. नाही तर आपण सगळे चिंकी, चिनी, किंवा मग कोरोनाचा एखादा प्रकार म्हणून ओळखले जातो.

भारत देश जातिवादानेच नाही, तर वर्णभेदानेही ग्रासलेला आहे, असे अंकीताने पोस्ट शेअर करत म्हटले आहे. यावेळी तिने #hyprocrites हा हॅशटॅग वापरत लोकांना ढोंगीही म्हटले आहे. अंकीता सुद्धा ईशान्य भारतातलीच आहे.

दरम्यान, मीराबाई चानूने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर ती चांगलीच चर्चेत आली होती. तिला अनेक लोकांनी पदक जिंकल्यामुळे शुभेच्छा दिल्या होत्या, त्यानंतर अंकीताने ही पोस्ट शेअर केली आहे. मीराबाई चानूदेखील ईशान्य भारतातल्या आसाममधली आहे.

महत्वाच्या बातम्या-

शिल्पाचा आईला मेसेज, मी राज कुंद्राला घटस्फोट देत आहे…
शेतकऱ्याने आपल्या बंगल्याला दिलेल्या नावाने लोकंही चक्रावले; आता बंगल्याला संशोधकांनीच दिली भेट
काँग्रेसला ना चर्चेत रस आहे, ना संसदेचे काम चालू देण्यात; पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर केला संताप व्यक्त


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: