“उद्धव ठाकरेंमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, तो दिवस लवकरच उगवेल”

July 28, 2021 , 0 Comments

मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त त्यांना अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. अशात शिवसेना नेते संजय राऊत यांनीही ट्विट करत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहे. राऊतांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. तो दिवस लवकरच उगवेल, असे ट्विट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

अखंड साथ, अतुट नाते. राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आहे. तो दिवस लवकरच उगवेल. आपणास वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा, असे संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यावेळी त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.

संजय राऊतांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचे काही क्षण दाखवण्यात आलेले आहे. त्यामध्ये संजय राऊतांनी केलेले भाष्य पण आहे. आता आम्हाला कोणी इंद्राचे आसन दिले, तरी आम्हाला नको. देश की जनता देखेगी महाराष्ट्र के मुख्यमंत्रीपदपर शिवसेना का एक शिवसैनिक विराजमान होगा, असे या व्हिडिओमध्ये संजय राऊतांनी म्हटले आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता, त्यावेळीही त्यांनी मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येकालाच आपले कुटुंब प्रमुख वाटतात. हे त्यांच्या नेतृत्वाचं यश आहे, असे संजय राऊतांनी म्हटले होते.

तसेच घरातला माणूस नेतृत्व करतो, असे प्रत्येकाला वाटते. हे नेतृत्व प्रदीर्घ काळ टीकेल. राष्ट्रालाही त्यांच्या संयमी, प्रखर राष्ट्रवादी आणि हिंदूत्ववादी नेतृत्वाची गरज आहे. ते देशाला नेतृत्व देतील, अशा शुभेच्छा मी शुभेच्छा त्यांना देतो, असे संजय राऊतांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या-

“ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकलो तरच भारतीय, नाहीतर चायनीज, नेपाळी म्हणून आम्हाला हिणवतात लोकं”
शिल्पाचा आईला मेसेज, मी राज कुंद्राला घटस्फोट देत आहे…
महाराष्ट्रातून रचले जात होते झारखंड सरकार पाडण्याचे षडयंत्र; भाजपच्या दोन नेत्यांची नावे आली समोर


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: