IPL नंतर आता घरी पोहोचला हा खेळाडू, प्रेग्नंट गर्लफ्रेंडला मिठी मारत ढसाढसा रडला, आणि..

June 01, 2021 , 0 Comments

कोरोनाच्या काळात देखील आयपीएल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र काही सामने झाल्यानंतर अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. हा आकडा वाढू लागल्याने खबरदारी म्हणून आयपीएलची स्पर्धा रद्द करण्यात आली. यामुळे सर्व खेळाडू आपल्या देशात आपल्या कुटुंबाकडे परतले.

काही देशात मात्र कोरोनाचे वेगळे नियम होते. यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या देशातल्या कडक निर्बंधांमुळे स्वत:च्या घरी पोहोचू शकले नाहीत. ४ मे रोजी आयपीएल स्थगित झाल्यानंतर खेळाडूंना काही काळ मालदीवमध्ये घालवावा लागला. त्याठिकाणी त्यांची सोय करण्यात आली होती.

आता काही दिवसांपूर्वी हे खेळाडू घरी परतले, पण घरी परतल्यानंतरही त्यांना दोन आठवडे क्वारंटाईन राहावे लागले. त्यानंतर आता त्यांना घरी परतण्याची परवानगी मिळाली आहे. आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या चेहेऱ्यावर मोठा आंनद बघायला मिळाला.

यामध्ये ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पॅट कमिन्स या खेळाडूंमध्ये होता. तो क्वारंटाईन सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर पॅट कमिन्सने आपल्या गरोदर गर्लफ्रेंडला मिठी मारली आणि तो ढसाढसा रडायला लागला. अनेक दिवसांनंतर तो तीला भेटला. आणि तो रडायला लागला.

आयपीएलसाठी तो तब्बल आठ आठवडे घराबाहेर राहिल्यानंतर पॅट कमिन्स अखेर हॉटेल क्वारंटाईनमधून बाहेर पडला. तो पहिल्यांदा आपल्या गर्भवती गर्लफ्रेंड बेकीला भेटला. यावेळी त्याचा आनंद गगनाला मावत होता. कडक नियमांमुळे त्यांना अनेक दिवस हॉटेलमध्ये राहावे लागले.

या क्षणाचा व्हिडिओ ऑस्ट्रेलियन क्रीडा पत्रकार अमांडा बेली यांनी ट्विटरवर शेयर केला आहे. यामध्ये ते दोघे एकामेकांना मिठी मारताना किस करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ते आता त्यांच्या नव्या घरात राहायला जाणार आहेत.

सध्या आयपीएल देखील पुन्हा घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. दुबईमध्ये राहिलेले सामने खेळवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे आयपीएलचा थरार पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी आनंदात आहेत.

ताज्या बातम्या

रणबीरची बायको म्हणून आलिया भट्ट नाही, तर ‘ही’ व्यक्ती होती वडील ऋषी कपूर यांना पसंत

मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल, जाणून घ्या अभिनेत्री मृण्मयी आणि तिच्या नवऱ्याविषयी; जो आहे प्रसिद्ध उद्योगपती

वीकेंडला शिक्षिकेने माजी विद्यार्थ्यासोबत वारंवार बनवले शरीरसंबंध, १७ वर्षीय विद्यार्थी म्हणाला..


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: