जेव्हा ऐश्वर्याची मुलगी अभिषेक सोडून भलत्याच अभिनेत्याला बोलते बाबा; पहा अभिषेकची रिॲक्शन..

June 01, 2021 , 0 Comments

मुंबई | गेले वर्षभर देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे सरकारकडून कडक लॉकडाउन करण्यात आले आहे. याच लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांनी कोरोनामुळे आपले प्राणही गमावले. अशातच कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी ज्या ठिकाणी गर्दी होते अशी सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली.

त्यामुळे कोरोनाचा जोरदार फटका चित्रीकरणालादेखील बसला. चित्रीकरण बंद असल्याने अनेक सेलिब्रेटींज आपला दिवसभराचा वेळ हा आपल्या फॅमिली सोबत तसेच मित्र मैत्रीणींसोबत घालवत आहेत.अनेक सेलिब्रेटींज घरी राहून आपल्या आठवणींना उजाळा देत आहेत. काहीजण सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत आहेत. तर काही स्टोरी-किस्से, थ्रोबॅक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.

अशातच बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचा एका मुलाखती दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिने आपल्या मुलीबद्दलच्या काही आश्चर्यकारक गोष्टी शेअर केल्या आहेत. नक्की काय बोलली ऐश्वर्या पाहुयात.

करण जोहर दिगदर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व अभिनेता रणबीर कपूर यांची सुपरहिट जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्या सिनेमाच्या शुटिंगदरम्यानचा एक किस्सा तिने शेअर केला आहे. सिनेमाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्यासोबत मुलगी आराध्या देखील होती. त्यावेळी आराध्याने रणबीरच्या दिशेने धाव घेत रणबीरला कशी मिठी मारली हे सांगितले आहे.

ऐश्वर्या सांगते आम्ही ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमाचे शूट करत असताना आराध्याही माझ्याबरोबर होती. त्या दिवशी रणबीरने आराध्याचे वडील अभिषेक बच्चन यांच्यासारखे कपडे घातले होते. तिला ते वडील वाटले आणि तिने धाव घेत रणबीरला मिठी मारली आणि त्याच्या मांडीवर बसली. जेव्हा आराध्याने रणबीरचा चेहरा पाहिला तेव्हा तिला धक्का बसला.

जेव्हा ऐश्वर्याने आराध्याला विचारले कि ते तुला ते वडील वाटले?, तेव्हा ती हो म्हणाली. तेव्हापासून जेव्हा जेव्हा ती रणबीरच्या समोर येते तेव्हा ती थोडीशी लाजते. ऐश्वर्यानेही रणबीर आणि आराध्याची मैत्री खूप मजेदार असल्याचे सांगितले होते. आराध्याने रणबीरला आरके म्हटले आहे. दोघांनीही एकत्र खूप मजा केली असे ऐश्वर्या म्हणाली.


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: