सलमान खानच्या जुडवा चित्रपटापासून चर्चेत आली होती रंभा, आता अभिनय सोडून करते ‘हे’ काम
सिनेमा जगतात अशा अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी चित्रपटांमधील अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आणि नंतर इंडस्ट्रीमधून त्या गायब झाल्या. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुंदर अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत.
जिने सुपरस्टार सलमान खानबरोबर चित्रपटात काम केले आणि नंतर स्वत: ला कायमच चित्रपटाच्या जगातून दूर केले. आम्ही अभिनेत्री रंभाबद्दल बोलत आहोत. अभिनेत्री रंभाला कोणत्याही ओळखीची गरज नाही.
भलेही रंभाने करिअरची सुरुवात तेलुगू चित्रपटांद्वारे केली होती पण ९० च्या दशकात ती बॉलिवूडमधील सर्वोच्च नायिकांपैकी एक होती आणि सर्वांच्या आवडीची होती. बॉलिवूडमधील लोकांनी तिला दिव्या भारतीची डुप्लिकेट म्हणूनही ओळखायला सुरूवात केली होती.
पण काही हिट फिल्म्स दिल्यानंतर रंभाची बॉलिवूड कारकीर्द ढासळू लागली आणि तिच्या हातात फक्त छोट्या छोट्या भूमिका राहिल्या. रंभाचे खरे नाव विजयलक्ष्मी आहे. १९९२ सालच्या तेलुगू फिल्म ‘ओ ओकट्टी अडक्कू’ या चित्रपटाद्वारे तिने डेब्यू केला होता.
१७ बॉलिवूड आणि १०० हून अधिक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम करणारी रंभा सध्या ग्लॅमरच्या दुनियेपासून मुलांना वाढविण्यात व्यस्त आहेत. रंभा २०१२ मध्ये पेन सिंगम या तामिळ चित्रपटात दिसली होती.
यानंतर, तिने स्वत: ला फिल्मी जगापासून दूर केले आणि २०१० मध्ये ८ एप्रिल रोजी कॅनेडियन व्यावसायिक इंद्रन पद्मनाथनशी लग्न केले. यानंतर रंभा कॅनडाला शिफ्ट झाली. रंभाचा विचार असा होता की चित्रपटांपासून दूर राहून ती स्वत: च्या घरात लक्ष केंद्रित करेल पण उलट घडलं.
लग्नाच्या काही वर्षानंतर रंभा आणि तिचा नवरा यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या आल्या आणि ते दोघेही वेगळे झाले. अशी बातमीही आली होती की रंभाशी लग्न करण्याच्या आधी तिचा नवरा विवाहित होता आणि नंतर ते रंभापासून लपवले गेले होते.
एवढेच नव्हे तर सासरच्या लोकांनीही रंभाला खूप त्रास दिला आणि मुलींना भेटण्यासही बंदी घातली. लग्नाच्या एक वर्षानंतर, रंभाने जानेवारी २०११ मध्ये ज्येष्ठ कन्या लान्याला जन्म दिला. यानंतर मार्च २०१५ मध्ये तिची लहान मुलगी साशाचा जन्म झाला.
२३ सप्टेंबर २०१८ रोजी म्हणून एका मुलाला जन्म दिला. २००८ साली रंभा जेव्हा तिच्या आत्महत्या केल्याच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा ती चर्चेत आली. असे घडले की रंभा बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल झाली होती.
या घटनेनंतर रंभाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बातमी मीडियामध्ये पसरली. यानंतर या बातम्या खोट्या आहेत असे सांगत रंभाने म्हटले होते की मी कधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नाही. माझ्या घरी लक्ष्मीपूजन होते आणि मी दिवसभर कठोर उपोषण केले होते, यामुळे हे घडले.
रंभाचे नाव अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी तरुण वयात डेब्यू केला होता. जेव्हा ती १६ वर्षांची होती, तेव्हा तिने ‘सरगम’ या मल्याळम चित्रपटातून प्रवेश केला. १९९५ मध्ये ‘जल्लाद’ चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली होती.
पहिल्याच चित्रपटातून रंभाने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने लोकांची मने जिंकली आणि तिला बर्याच चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर रंभाने सलमान खानच्या ‘जुडवा’ या सुपरहिट चित्रपटात काम केले.
सलमानबरोबर रंभाची जोडी चांगलीच गाजली होती. सलमानबरोबर ‘बंधन’ या चित्रपटात रंभादेखील दिसली. यानंतर त्यांनी सजना, मैं तेरे प्यार में पागल, क्रोध, बेटी नंबर १, घरवाली बहारवाली, क्योंकी मैं झुट नहीं बोलता, जानी दुश्मन: एक अनोखी कहाणी असे अनेक चित्रपट केले.
रंभाचा शेवटचा हिंदी चित्रपट दुकान-पिल्ला हाऊस होता. रंभाने २०१७ च्या टीव्ही शो किंग्ज ऑफ कॉमेडी ज्युनियरमध्ये काम केले आहे. रंभाने स्वत:ला चित्रपटांपासून दूर केले आणि ती आपल्या कुटूंबासह टोरोंटोमध्ये गेली.
रंभाला दोन मुली आणि एक मुलगा आहे, ज्याबरोबर ती बर्याचदा सोशल मीडियावर फोटो शेअर करते. ९० च्या दशकात रंभा चित्रपटसृष्टीचा लोकप्रिय चेहरा होता, पण सध्या रंभा बराच काळ प्रसिद्धीपासून दूर आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.
महत्वाच्या बातम्या
ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आता बनणार भारताचा जावई, ‘या’ मुलीशी थाटणार संसार
नवी मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय, ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना रिचार्जसाठी मिळणार ‘एवढे’ पैसे
मित्रांना लग्नाला बोलावताय तर सावधान! आधी हा व्हिडिओ बघा तरच मित्रांना निमंत्रण द्या
मुळशीच्या उरवडे औद्योगिक वसाहतीत केमिकल कंपनीला भीषण आग, १७ कर्मचाऱ्यांचा मृत्यू
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: