ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आता बनणार भारताचा जावई, ‘या’ मुलीशी थाटणार संसार
क्रिकेटविश्वात अनेक खेळाडूंनी परदेशातील मुलींशी लग्न करून आपले संसार थाटले आहेत. यामध्ये आता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने काही महिन्यांपूर्वी तो भारतीय मुलीच्या प्रेमात असल्याचा खुलासा केला होता. यामुळे तो चर्चेत आला होता. आता तो लग्न करणार असल्याचे त्याने सांगितले आहे.
त्याने मागील वर्षी त्याची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमनसोबत भारतीय पद्धतीने साखरपुडा केला आहे. आता लवकरच ग्लेन मॅक्सवेल भारताचा जावई होणार आहे. त्यांनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा उरकला होता. आता तो कुठे लग्न करणार याबाबत चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
त्यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात जवळचे काही मित्रपरिवार आणि कुटुंब यांचा सहभाग होता. यामध्ये त्याने हिरव्या रंगाची शेरवानी घातली होती. आणि विनी रमणनेही गडद हिरव्या रंगाचा लेहंगा घातला होता. काही दिवसांपूर्वी ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते.
आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१९ मध्ये मॅक्सवेलने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. कारण तो मानसिकदृष्ट्या खूप खचला होता. मॅक्सवेलने सांगितले की, विनी रमन आहे, तिनेच मला या सगळ्यातून बाहेर काढला आहे. मॅक्सवेल मानसिकदृष्ट्या खूप थकला होता.
चार वर्षांपासून मॅक्सवेल आणि विनी रमन एकमेकांना डेट करत आहेत. काही महिन्यांपूर्वीच हे दोघे युरोपला गेले होते. मूळ भारतीय असलेली विनी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरामध्ये राहते. आता ते लवकरच लग्न करणार आहेत.
ऑस्ट्रेलियाचा मॅक्सवेल हा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू होणार आहे जो भारताचा जावई होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज शॉन टेटने भारतीय असलेल्या मासूम सिंघासोबत विवाह केला आहे. शॉन आणि मासूम हे पहिल्यांदा आयपीएलमध्ये भेटले होते. त्यांनतर ते एकमेकांच्या प्रेमात होते आणि नंतर त्यांनी लग्नही केले.
ताज्या बातम्या
मुंबईत हा ‘नियम’ पाळून सलून आणि पार्लर सेवा सुरू, किशोरी पेडणेकरांची घोषणा
काय सांगता! ‘या’ आंब्यासाठी वर्षभर आधीच करावे लागते बुकींग, किंमत ऐकून बसेल धक्का
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: