इंडिअन आयडल १२: गीतकार जावेद अख्तर घेणार अरुणीताची परीक्षा, अरुणीताच्या करियरवर होईल याचा परिणाम

June 28, 2021 , 0 Comments

‘इंडिअन आयडल १२’ हा रियालिटी शो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असलेला पहायला मिळतोय. या शो मध्ये आता सात स्पर्धक उरले आहेत. या सर्वच स्पर्धकांनी आपल्या आवाजामुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

या कार्यक्रमात अनेक दिग्गज पाहुण्यांनी भेट दिलेली पाहायला मिळते. तसेच पाहुण्यांनी देखील या सर्व स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले आहे. या आठवड्या अखेरीस प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या भागामध्ये ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर  प्रमुख पाहुणे म्हणून दिसणार आहेत.

इंडियन आयडल १२ च्या या भागात कधीही न घडलेली घटना घडली. प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या जावेद अख्तर यांनी खास अरुणितासाठी एक गाणे लिहून आणले आहे. तसेच या गाण्याला अनु मलिक यांनी संगीत दिले.

एक प्रकारे हे दोन्ही दिग्गज कलाकार अरुणीताची परीक्षाच घेणार आहे. या गोष्टीला घेऊन  चाहत्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या दोघांच्या परीक्षेमध्ये अरुणिता यशस्वी ठरणार की नाही हे लवकरच आपल्याला पाहायला मिळेल.

सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आगामी भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. प्रोमोमध्ये अरुणिताचे गाणे ऐकल्यानंतर जावेदजी म्हणतात, अरुणितासाठी एक गाणे लिहियला हवे. जावेद यांचे हे म्हणणे ऐकून अनु मलिक त्यांना सहमत होतात.

त्यानंतर जावेदजी लगेचच एक नवीन गाणे लिहितात. तर अनु मलिक त्या गाण्याला संगीत देतात.  त्यानंतर अनु मलिक ते गाणे अरुनिताला ऐकवतात आणि तिला गायला सांगतात. आता त्यांच्या या परीक्षेत अरुणीता पास होईल की नाही हे लवकरच पाहायला मिळेल.

खर पाहता या दोन दिग्गजांनी तयार केलेले गाणे गाण्याची संधी अरुणिताला मिळाल्याने ती खूपच आनंदीत झाली. याबद्दल सांगताना ती म्हणाली, ‘अशी संधी आयुष्यात एकदाच मिळते’. मी इंडियन आयडलची खूप आभारी आहे.

ती पुढे म्हणते की, जावेद अख्तर सरांचीदेखील मी खूप ऋणी आहे त्यांनी मला गाणे गाण्याची संधी दिली. तसेच अनु मलिक सरांचीदेखील आभारी आहे. मला आता असे वाटते आहे की मी जीवनात आता सगळे काही मिळवले आहे. असे म्हणून ती सगळ्यांचेच आभार मानते.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: