ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला, आता वडेट्टीवारांचे धक्कादायक विधान, म्हणाले ओबीसी असल्याने..

June 28, 2021 , 0 Comments

मुंबई । राज्यात ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण तापले आहे. याप्रकरणी भाजपने राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढला आहे. यातच मंत्रिमंडळातील मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आता सरकारला घरचा आहेर देत धक्कादायक विधान केले आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रात ३ दिवस फिरलो, तरी २५ लाखांची सभा होईल. ‘झुकती है दुनिया झुकाने वाले चाहिये’. मला ओबीसीचे खातं भेटले तेव्हा चपरासी देखील नव्हता. मी उधारीवर हे खातं चालवतो. समाज कल्याणच्या भरवशावर ओबीसी खातं चालवतोय. ओबीसी खात्यात जागा भरण्यासाठी पैसे नाही म्हणतात.

तसेच कार्यालयालाही जागा नाही. काही दिवस रुसलो होतो, मग वाटले चुकी झाली. असेही ते म्हणाले. तसेच ओबीसीचे नेतृत्व करतो. मला वाटले महसूल खातं मिळेल, पण हे खातं भेटले. कारण मी ओबीसी आहे ना. असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच ते म्हणाले पंकजा मुंडे यांनाही ग्रामविकास खातं मिळाले. निवडणुका झाल्या, कोरोना वाढला तर निवडणूक आयोगाला जबाबदार धरा. गरज भासल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. हे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे.

तसेच ते म्हणाले, मला रोज धमक्या येतात, धमक्या देणाऱ्यांनो, आम्ही तुमच्या विरोधात नाही. माझे काय होईल ते होईल, पण ओबीसींच्या मुद्यावर मी शांत बसणार नाही. आपले अडले, तर सगळ्यांनाच बाप म्हणावे लागते. फडणवीस साहेबांना घेऊन जाऊ. वेळ पडली तर पंतप्रधानांच्या पाया पडू. असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच ते म्हणाले, मी गोपीनाथ मुंडे यांचा शिष्य आहे. पंकजा मुंडे आणि मी गुरुबंधू आहे. ओबीसींवर अन्याय झालाय. एकत्र आलो तर हा अन्याय दूर होईल. प्रस्थापितांच्या विरोधात लढणे सोपं नाही. बावनकुळे साहेब, माझा नेता ओबीसी आहे, त्यामुळे मला तिकीटाची भिती नाही. मी समाजासाठी झुकायला आणि वाकायला तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

इंडिअन आयडल १२: गीतकार जावेद अख्तर घेणार अरुणीताची परीक्षा, अरुणीताच्या करियरवर होईल याचा परिणाम

इंडिअन आयडल १२ आणि अनुपमा मध्ये चढाओढ; पहा कोण आहे एक नंबरला

..म्हणून श्रीदेवीने बोनी कपूरला त्यांची पहीली पत्नी आणि मुलांपासून केले होते दुर


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: