मराठी सिनेसृष्टीतील क्युट कपल, जाणून घ्या अभिनेत्री मृण्मयी आणि तिच्या नवऱ्याविषयी; जो आहे प्रसिद्ध उद्योगपती

June 01, 2021 , 0 Comments

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनं तिच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘कुंकू’, ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून मृण्मयी घराघरात पोहचली. मृण्मयीचा मालिकांपासून सुरु झालेला प्रवास चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचला. ‘मोकळा श्वास’, ‘नटसम्राट’, ‘शिकारी’, ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली.

मृण्मयीने केवळ चित्रपट, मालिकांपूरताच तिचा प्रवास मर्यादित न ठेवता ती दिग्दर्शकीय क्षेत्रात उतरली. ‘मन फकीरा’ या चित्रपटाचं मृण्मयीने पहिल्यांदाच दिग्दर्शन केलं आहे.अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. मृण्मयीने शनिवार २९ मे रोजी तिचा ३३ वा वाढदिवस साजरा केला.

मृण्मयीचा जन्म पुण्यात झाला असून तिचे बालपणही पुण्यात गेले. अभिनयाची आवड असल्याने तिने पुण्यातून मुंबईला स्थलांतर केले आणि तिथूनच तिच्या नव्या आयुष्याची सुरवात झाली. मृण्मयीच लग्न झाल असून मृण्मयी आणि तिचा पती स्वप्नील राव हे मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे.

मृण्मयी आणि स्वप्नील यांचा विवाह ३ डिसेंबर २०१६ रोजी झाल. स्वप्नील आणि मृण्मयी याचं अरेंज मरेज झाल आहे. परंतु त्यांचे सोशल मिडीयावरचे त्यांचे रोमांटिक आणि मजेशीर फोटोज पाहून यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. स्वप्नील एक व्यावसायिकआहे.

स्वप्नीलच्या वडलांना मृण्मयी आपल्या मुलासाठी पसंद पडली होती. त्यांनीच स्वप्नीलला सांगितले की, मृण्मयी दिसायला सुंदर,समंजस  आणि चांगल्या घरातील मुलगी आहे. लग्नासाठी तिचा विचार करायला हरकत नाही.

स्वप्नीलने मृण्मयी फोन नंबर घेतला, दोघे अनेक दिवस फोनवर बोलत होते. त्यांच्यातील संवाद मजबूत झाल्यानंतर त्यांनी एकमेकांना भेटण्याचा निर्णय घेतला. एकमेकांना भेटल्यानंतर त्याच्या सवयी, आवडीनिवडी जुळल्या आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मृण्मयी ही अनेकांची चाहती अभिनेत्री असून तिने अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. मृण्मयीने मराठी सोबतच हिंदी मालिकांत देखील काम केल आहे. मराठीतील तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहे.

हे ही वाचा-

भविष्यात माझी जागा कोणीही घेऊ शकतो, गरज नाही की त्याचे आडनाव टाटाच हवे! असं का म्हणाले रतन टाटा? वाचा सविस्तर

तेव्हा मला दोन पावलं चालणंही अवघड झालं होतं; मलाईकाने सांगीतला तो धक्कादायक अनुभव

कोरोना नियम पायदळी तुडवत भाजप आमदाराचा मुलीच्या मांडव टहाळीत तुफान डान्स; आमदारासह पन्नास जणांवर गुन्हा दाखल

 


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: