तेव्हा भाजपचे अतुल भातखळकर माझ्याकडे तिकीट मागायला आले होते, राज यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

June 02, 2021 , 0 Comments

मुंबई । राजकारणात कधी काय होईल हे कोण सांगू शकत नाही. अनेकदा एकाच दिवसात एक व्यक्ती अनेक पक्षात प्रवेश करून पुन्हा आपल्याच पक्षातून निवडणूक लढवतो. तसेच निवडणूक झाल्यावर देखील तो पक्षांतर करतो. अशा अनेकदा घटना घडल्या आहेत.

आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २००९ मधील विधानसभा निवडणुकीवेळचा असाच एक किस्सा
सांगितला आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकरांविषयी राज ठाकरे यांनी गौप्यस्फोट केला. आमदार अतुल भातखळकर हे माझ्याकडे तिकीट मागायला आले होते, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

मात्र मी तेव्हा नितीन गडकरींना फोन केला आणि त्यांना भाजपात राहायला सांगितले होते, असेही राज ठाकरे म्हणाले. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर आपले रोखठोक मत मांडले.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत अतुल भातखळकर माझ्याकडे विधानसभेचे तिकीट मागायला आले होते. भाजपाचेच एक लोखंडे म्हणून होते, तेही माझ्याकडे तिकीटासाठी आले होते. मी नितीन गडकरींना फोन केला होता. त्या दोघांनाही मी सांगितले की, आहात तिथंच रहा, हा वेडपटपणा करू नका.

अजून दोन माणसं तिथे होती. शिवसेनेच्या सुरूवातीच्या काळातही अनेक लोक सोडून गेले. सोडून जातात तेव्हा ते एकटे असतात. जे सोडून गेले त्यांच्याबरोबर माझा महाराष्ट्र सैनिक नाही गेला, असे राज ठाकरे म्हणाले.

तुमच्याबरोबरची अनेक माणसं सोडून गेली, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे म्हणाले. जे सोडून गेले, त्यांची एक दिवसांची बातमी होते. जे सोडून गेले, त्यांच्याबद्दल वाईटही वाटतं. माझ्यासाठी आले, पण स्थानिक गोष्टींसाठी सोडून गेले.

मात्र ते सर्वच पक्षात होत असते, असा एकतरी राजकीय पक्ष आहे का? की ज्या पक्षातून कोण बाहेर पडले नाही शिवसेना असो, भाजपा असो कुणीही, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक मोठे खुळासे केले. लोकसत्ताच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

ताज्या बातम्या

विशाल ददलानीने ‘इंडियन आयडल १२’ मध्ये पुन्हा येण्यास दिला नकार; आदित्य नारायणे सांगितले त्यामागचे कारण

पाकिस्तान कर्णधाराने केला बहिणीशी साखरपुडा; काही दिवसांपूर्वीच झाले होते लैंगिक शोषणाचे आरोप

या समाजात मृतदेहासोबत नाचतात लोक, पुढे जे करतात ते वाचून धक्का बसेल


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: